‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पिंजर सारख्या उत्तम चित्रपटाकडे जेव्हा दुर्लक्ष केलं जातं तेव्हा…
मनोज बाजपेयी हे इंडस्ट्रीतलं एक उत्तम आणि टॅलेंटेड नाव आहे, उत्तम अभिनयासोबतच स्वतःच पॉवरहाउस असणाऱ्या या अभिनेत्याने आज पर्यंत सगळ्यांच्या स्मरणात राहतील आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या असूनही प्रशंसा आणि शाबासकीची मोजदात बघता त्याच्या वाटेला अजून अपेक्षित कौतुक आलेलं दिसत नाही.
हिंदुस्थान टाइम्सला मुलाखत देत असताना, त्यांनी सांगितलं कि, कशाप्रकारे पुरस्कार सोहळ्यात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि प्रेक्षकांनीही त्यांच्या फिल्मवर विशेष लक्ष दिलं नाही, त्यांनी मुलाखतीदरम्यान स्पष्ट सांगितलं कि, “२००३ साली आलेला पिंजर सारखा उत्कृष्ट सिनेमा थिएटर मध्ये लागला असताना लोकांची त्यासाठी गर्दी होत नाही, किंवा कोणत्याही मानाच्या आणि प्रकाश झोतातल्या पुरस्कार सोहळ्या साठी या चित्रपटाची निवड होत नाही, अशावेळी माझी अगदीच निराशा झाली असे नाही; पण या सगळ्यामुळे अनेक गोष्टींमागची सच्चाई माझ्या डोळ्यासमोर आली.”
पुढे ते म्हणाले, “मी जे काही करेन, किंवा मी काय करण्याचा प्रयत्न करीत आहे याची लोकांना पर्वा नाही. ते लोक कदाचित मला पुरस्कार देणार नाहीत किंवा ओळखणारही नाहीत, प्रेक्षकांना कदाचित माझे सिनेमे बघण्यात फारसा रस वाटत नसेलही, पण मी जे करेन ते माझ्यासाठी करेन.”
आपल्या करिअरची उतरती बाजू चालू असतानाच्या गोष्टींचा उल्लेख करताना ते पुढे म्हणतात, “ मी खाली घसरलो आहे हे मला दिसत होतं. पण मी कधीच निराशेच्या अधीन होण्या एवढा खाली घसरलो नाही. त्या पडत्या काळात मी मला सुधारण्याचा प्रयत्न केला, माझ्यातली हस्तकला अभिनय या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्ष ज्या गोष्टी माझ्याकडून करायच्या राहून गेल्या होत्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. काही वेळा फक्त पोटा-पाण्यासाठी मी काही चुकीच्या फिल्म्स केल्या पण तो माझा नाईलाज होता. असा एक काळ होता जेव्हा माझाय्कडे काम येत नवत पण त्याकाळात मी स्वतःला सुधारण्यासाठी १००% प्रयत्न केला.”
पुढे ते सांगतात, “पूर्वी, मी स्क्रिप्ट विचारली असता, ते माझ्याकडे बघून हसायचे, आश्चर्यचकितपणे ‘हा माणूस कोठून आला आहे?’ असं म्हणायचे. पण आता मात्र लगेच करारावर सही केली जाते, मानधनाचे चेक रेडी ठेवले जातात. शूटिंग सहसा वेळेवरच सुरू होते आणि वेळेवरही संपते. लोक बजेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न करतात.पण अजूनही काही गोष्टी बदलल्या नाहीत. अजूनही स्वतंत्र फिल्म्स साठी बजेट नाही.
१९९४ मध्ये शेखर कपूरच्या बंदीत क्वीन पासून करिअर सुरु झालेला मनोज यांचा प्रवास या नंतर दाउद, सत्य, शूल, पिंजर, अक्स, गँग्स ऑफ वासेपुर, सत्याग्रह, रजनीती आणि भोसले यासारख्या चित्रपटातून आपल्यासमोर वेगवगेळ्या भूमिकांतून समोर आला.