लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

पठाणवर बायकॉट ट्रेंडची सावट…
शाहरुख खान आणि दिपिका पादुकोण यांच्या पठाण (Pathan) या चित्रपटामधील अतिशय बोल्ड असे बेशरम रंग हे गाणं काल परवा सोशल मिडियावर दाखल झालं. त्यातला दीपिकाचा बोल्ड अवतार बघता, त्यावर वाद होणं अपेक्षित होतंच. तसंच दीपिकानं बेशरम रंग गाण्यात घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीवरुन सध्या धुमाकूळ सुरु झालाय आणि बायकॉट ट्रेंडचं सावटही पठाणवर (Pathan) दाटून आलं आहे. अगदी शाहरुख खान वैष्णोदेवीच्या चरणी गेला तरी शाहरूख खानचा पठाण प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोव-यात सापडला आहे. आता पठाणच्या बेशरम रंग या गाण्यावर चोरीचा आरोपही करण्यात येत आहे. हे गाणे कॉपी असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या गाण्याची तुलना फ्रेंच गायक जैनच्या माकिबा या गाण्या बरोबर होत आहे. कुछ कुछ मकिबा या गाण्यातून बेशरम रंगाची बीट चोरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांचा बहुचर्चित पठाण (Pathan) हा चित्रपट नव्या वर्षात म्हणजेच 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या आधी चित्रपटातील बेशरम रंग हे बोल्ड गाणे गेल्या आठवड्यात सोशल मिडीयावर रिलीज झाले. यातील दीपिका पादुकोणचे बोल्ड सिन आणि शाहरूख खानच्या सिक्सपॅक लूकनं एकच खळबळ उडवलीय. गाणं रिलीज झाल्या पाठोपाठ त्यावर ट्रोलरर्सची नाराजी तूटून पडली. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे, त्यावर नाराजी व्यक्त होत आहे. शाहरुख, दीपिका आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेला पठाण २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. शाहरूख खानसाठी हा मोठा चित्रपट असणार आहे. कारण गेल्या काही वर्षात शाहरूख खान हे नाव जरी चालत असलं तरी त्याच्या चित्रपटांना मात्र बॉक्स ऑफीसवर फारसं यश मिळालं नाही.
त्यात शाहरूखन पठाणसाठी (Pathan) 100 करोडचं मानधन घेतल्याचं वृत्तसमोर आलं आहे. पठाणसाठी शाहरूखनं सिक्सपॅक बॉडी केली. त्यासाठी अनेक महिने जिममध्ये मेहनत घेतली आहे. शाहरूख खानच्या मानानं दीपिका आणि जॉन अब्राहिम यांना फक्त 15 कोटी रुपये मानधन मिळाले आहेत. शिवाय पठाणच्या (Pathan) शुटींगसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षात शाहरूख खानवर होत असलेल्या टिकेचा परिणाम पठाणवर होऊ नये म्हणून प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच शाहरूखनं कधी नव्हे ते वैष्णोदेवीच्या चरणी जाऊन प्रार्थाना केली. त्याच्या या देवीदर्शनावरही टिका करण्यात आली. आता पठाणमधील (Pathan) बेशरम रंग हे गाणं प्रदर्शित झाल्यावर त्यात दीपिकाच्या बिकनी सूटच्या रंगानं वादात भर घातली आहे. या सर्वात भर म्हणजे बेशरम रंग हे गाणं चोरल्याचाही आरोप होतोय. फ्रेंच गायक जैनच्या माकिबा या मूळ गाण्यापासून बेशरम रंगमधील बीट चोरल्यात आल्याची टिका सोशल मिडीयावर करण्यात येत आहे. तसे व्हिडोओही शेअर करत शहारुख खानला ट्रोल करण्यात आलं आहे.
======
हे देखील वाचा : अक्षयनंही ठेवलं फॅशनच्या जगात पाऊल
=====
अर्थात तरीही या गाण्याच्या व्हूजची संख्या वाढत असून बेशरम रंगला दोन दिवसांत 3 कोटी 20 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. ‘हमें तो लुट लिया मिलके इश्क वाले ने..’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे शाहरुखने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. शिल्पा राव, कारलिसा मॉन्टेरियो आणि विशाल शेखर यांनी हे गाणे गायले आहे. त्याचे बोल विशाल ददलानी यांनी तयार केले आहेत. संगीत विशाल-शेखर यांनी दिले असून नृत्यदिग्दर्शन वैभवी मर्चंट यांनी केले आहे. पठाण (Pathan) चित्रपटाचे दिग्दर्शन अॅक्शन-दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. सिद्धार्थ आनंद वॉर आणि बँग बँग सारखे चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जातो. पठाण मधून शाहरुख तब्बल चार वर्षांनंतर मुख्य भूमिकेत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. यशराज बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाकडून शाहरुखला खूप आशा आहेत. बेशरम रंग गाण्यातील दीपिकाची बिकिनी स्टाईल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यातही तिच्या भगव्या रंगाच्या बिकीनीनं वाद ओढावून घेतला आहे. मध्यप्रदेशमध्ये या गाण्यावर तिव्र प्रतिक्रीया उमटल्या असून अशा अश्लिल गाण्यांना परवानगी कशी मिळते असा सवाल गृहमत्र्यांनी व्यक्त केला आहे.
पठाण (Pathan) हिंदीसोबतच दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दक्षिणेत असा अश्लिल बाजार चालत नाही, अशी टिकाही काही प्रेक्षकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली आहे. पठाणमध्ये (Pathan) जॉन खलनायक आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट वॉर अँड मार्व्हल्सची कॉपी असल्याचाही आता नवा आरोप होत आहे. त्यात शहारुख खाननं वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाऊन चाहत्यांचा आणखी रोष ओढवून घेतला आहे. देवीचे दर्शन घ्यायचे आणि चित्रपटात बिभित्स संस्कृतीचे दर्शन घडवायचे असा आरोप त्याच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत आहे. एकूण शहारुखच्या पठाणवर बायकॉटचे सावट अधिक गडद झाले आहे.
सई बने