Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Chandrashekhar : सुबहा न आयी शाम न आयी जिस दिन तेरी याद न आयी याद न आयी….
काही काही कलाकारांची फिल्मी एन्ट्री खूप अनपेक्षित पण इंटरेस्टिंग अशी असते. खरंतर या कलाकाराला चित्रपटात काम करायचं नव्हतं. पण आयुष्यात अशा काही घटना घडल्या की त्यांना चित्रपटात यावच लागलं. हा किस्सा आहे पन्नास आणि साठ च्या दशकातील अभिनेता चंद्रशेखर यांच्याबाबतचा. ‘चंद्रशेखर वैद्य’ खरंतर हे मराठी नाव असलेला कलाकार जन्माला आला होता हैदराबादला. हा चंद्रशेखर यांची आठवण कुणालाही असण्याची सुतराम शक्यता नाही पण पन्नास आणि साठच्या दशकामध्ये त्यांनी अनेक संगीतमय चित्रपटात भूमिका केल्या होत्या. (Bollywood movies)
‘काली टोपी लाल रुमाल’, ‘वसंत बहार’, ‘चाचाचा’ ,‘स्ट्रीट सिंगर’…. नंतर मात्र त्यांच्या नावाची जादू कमी होत गेली आणि सत्तर आणि ऐंशी च्या दशकामध्ये त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या. तसा फारशी कुठलीही छाप सोडून जावी असा चित्रपट त्यांनी केला नाही पण अहिंदी भाषिक टप्प्यात जन्माला येऊन देखील त्यांनी हिंदी सिनेमा जवळपास दीडशे हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. चंद्रशेखर यांच्यावर चित्रित गाणी मात्र अफलातून होती. जबरदस्त लोकप्रिय गाणी झाली होती. कदाचित ही गाणी वाचताना तुमच्या डोळ्यापुढे त्यांचा चेहरा येईल. (Indian cinema)

सुबहा न आये शाम न आये जिस दिन तेरी याद न आये (चा चा चा), लागी छुटे ना अब तो सनम (काली टोपी लाल रुमाल) केतकी गुलाब जुही (बसंत बहार), तसवीर बनाता हू तसवीर नाही बनती (बारादरी) चंद्रशेखर यांचा चित्रपटातील प्रवेश हा खूप अनपेक्षित रित्या झाला. साधारणत: १९४२ मध्ये हैदराबाद च्या निजामाच्याविरुद्ध आर्य समाजाने आंदोलन सुरू केलं होतं. हा एक प्रकारचा स्वातंत्र्य लढाच होता. या लढ्यात अग्रेसर होते चंद्रशेखर. त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्षे होते. तेव्हा तरुण होते. अन्यायाविरुद्ध बंड करण्याची ताकद होती. रक्त सळसळत होतं. त्यामुळे ते निजामाच्या विरुद्ध उघडपणे संघर्ष करू लागले. (Entertainment news)
याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांच्याविरुद्ध पोलिसाचे अटक वॉरंट निघाले आणि चंद्रशेखर यांना हैदराबाद सोडून पळून जावे लागले. ते पळून गेले ते थेट बेंगलोर मध्ये. आता पोटापाण्याचा काहीतरी व्यवसाय सुरू करायला लागेल म्हणून त्यांनी चित्रपटात काम करण्याची इच्छा जाहीर केली. हैदराबाद मध्ये राहिल्यामुळे त्यांची हिंदी आणि उर्दू वर चांगली कमांड होती.

बेंगलोरच्या अनेक स्टुडिओ पालथी घातल्यानंतर तिथल्या निर्मात्यांनी त्यांना सांगितलं की,” इथे सर्व कन्नड चित्रपट बनतात. तुम्ही मुंबईमध्ये जाऊन तिथे ट्राय करा. तिथे हिंदी सिनेमाची निर्मिती होते आणि तिथे तुमच्या प्रतिभेला चांगली किंमत मिळेल.” चंद्रशेखर यांना अभिनयाची काहीही जाण नव्हती. लहानपणी त्यांना कुस्त्यांचा शोक होता. संगीतकार शंकर जयकिशन यांच्यापैकी शंकर हे हैदराबादचे. ते देखील पैलवान होते आणि कुस्त्यांचा त्यांना देखील नाद होता. (Mix masala)
===========
हे देखील वाचा : Shahu Modak : या खिश्चन कलावंताने २९ वेळा श्रीकृष्णाची भूमिका साकारली!
===========
चंद्रशेखर आणि शंकर यांनी अनेक कुस्त्या लढल्या होत्या. त्यांच्यात चांगली मैत्री देखील होतो. या मैत्रीच्या भरवशावर ते मुंबईत दाखल झाले. सुरुवातीला स्ट्रगल केल्यानंतर १९५३ सालच्या व्ही शांताराम यांच्या ‘सुरंग’ या चित्रपटापासून ते नायक बनले. रुबाबदार व्यक्तिमत्व यामुळे लवकर लोकप्रिय झाले. यानंतर अनेक चित्रपट त्यांनी हिरो म्हणून केले पण यश मात्र फार कमी चित्रपटांना मिळाले. शांताराम बापूंचे ते लाडके कलाकार होते. सुरंग, कवी या सिनेमात ते नायक होते.
साठच्या दशकात त्यांनी स्वतः निर्माता होण्याचे ठरवले. त्यांनी दोन चित्रपट निर्माण आणि दिग्दर्शित केले. ‘चाचाचा’ आणि ‘स्ट्रीट सिंगर’ . ‘चाचाचा’ ला संगीत इकबाल कुरेशी यांचं होतं. हा चित्रपट चंद्रशेखर यांचा सुपरहिट सिनेमा ठरला. उत्साहात त्यांनी लगेच ‘स्ट्रीट सिंगर’ ती तयारी सुरु केली. त्यांची इच्छा अशी होती की आपल्या चित्रपटाला शंकर यानी संगीत द्यावे. त्या पद्धतीने त्यांनी चाचाच्या नंतर स्ट्रीट सिंगर या चित्रपटाची निर्मिती सुरू केली आणि या चित्रपटाला संगीत शंकर जय किशन यांनी द्यावे अशी विनंती त्यांना केली. शंकर जयकिशन म्हणाले की,” मला चित्रपटाला संगीत द्यायला नक्कीच आवडलं असतं. पण माझ्यावर काही बंधने आहेत’. (Entertainment tadaka)
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
त्यावेळी चंद्रशेखर यांनी एक आयडिया त्यांना दिली ते म्हणाले ,” या चित्रपटाला संगीत तुम्हीच द्या फक्त नाव बदलून द्या.” स्ट्रीट सिंगर या चित्रपटाला संगीतकार शंकर जयकिशन (खरं तर फक्त शंकर ने) यांनी संगीत दिले पण पण संगीतकार म्हणून सुरज यांचे नाव देण्यात आले. पण हा सिनेमा सुपर फ्लॉप झाला. चंद्रशेखर यांची होती नव्हती ती सर्व संपत्ती संपून गेली. नंतर त्यांनी चरित्र भूमिका करायला सुरुवात केली. पण त्यांच्यातील कलावंत शांत बसत नव्हता. गुलजार यांच्यासोबत त्यांनी दिग्दर्शनात सहाय्य करायला सुरुवात केली. सत्तरच्या दशकातील गुलजार सर्व चित्रपटांचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते. रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत त्यांनी सुमंत ची भूमिका केली होती.(Bollywood update)
चंद्रशेखर यांनी चित्रपटात काम करतानाच छोट्या मोठ्या भूमिका करणाऱ्या कलावंतांच्या मदती साठी एक संस्था स्थापन केली. सिंटा या संस्थेचे ते अध्यक्ष होते . किरकोळ भूमिका करणाऱ्या कलावंताच्या हक्कासाठी ते कायम लढत होते. या कलाकारांचा आरोग्यासाठी विमा उतरवणे, उतारवयात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे , त्यांना आर्थिक मदत करणे अशा अनेक प्रकारची कार्य त्यांनी या संस्थेमार्फत केली. सिनेमाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांच्या पदाधिकारी पदावर त्यांनी काम केले.