
Vicky Kaushal : दक्षिण भारतातही ‘छावा’ चित्रपटाची हवा!
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ५०० कोटीं क्लबमध्ये एन्ट्री केली असून अनेक हिंदी चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडीत काढून छावा लवकरच ६०० कोटींचा पल्ला गाठेल असं दिसून येत आहे. हिंदीत मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून छावा चित्रपट तेलुगू भाषेत ७ मार्चला रिलीज केला गेला असून तिथेही चित्रपटाने तुफान प्रतिसाद मिळवला आहे. दरम्यान, प्रेक्षकांच्या काय भावना आहेत त्याचा खास व्हिडिओ अभिनेता संतोष जुवेकर याने शेअर केला आहे. (Chhaava movie)
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, विकी कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना अभिनित ‘छावा’ (Chhaava) हा चित्रपट बॉलिवूडनंतर आता टॉलिवूड गाजवत आहे. संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात दाक्षिण भारतातील छावाच्या प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. “७ मार्चला तेलगू भाषेत ‘छावा’ प्रदर्शित झाला. तिकडच्या प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया इथे तुमच्यासोबत शेअर करतोय. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे…!” असं कॅप्शन देत त्याने व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर दक्षिण भारतात ‘छावा’ची हवा, इथे भाषा नाहीतर भावना सर्वकाही सांगून जातात. असं लिहिण्यात आलं आहे. (Bollywood movie box office collection)

‘छावा’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १८०..२५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.०५ कोटी, तर तेलुगू भाषेत ८ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ५१९.८ कोटींची कमाई केली आहे. सध्या सलमान खान याच्या ‘सिकंदर’ (Sikander) चित्रपटाव्यतिरिक्त कोणताही मोठा चित्रपट ‘छावा’ समोर प्रदर्शित होणार नसल्यामुळे हा चित्रपट लवकरच ६०० कोटींचा गल्ला जमवेल असा अंदाज बांधला जात आहे. (Bollywood upate)
===========
हे देखील वाचा : Chhaava Box Office : हर हर महादेव! ‘छावा’ची ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री
===========