Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल

Vicky Kaushal : ‘छावा ‘ओटीटीवर कुठे आणि कधी पाहाल?
‘स्त्री २’ (Stree 2) नंतर खरंच कोणत्या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं असेल तर तो आहे ‘छावा’. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची गौरवगाथा मांडण्यात आली आहे. विकी कौशल अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजांच जीवन जगला आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २५ दिवसात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘बाहुबली २’, ‘जवान’, ‘स्त्री २’ या चित्रपटांना मागे टाकत नवे रेकॉर्ड ‘छावा‘ चित्रपटाने रचले आहेत. चित्रपटगृहात प्रेक्षकांना वेड लावल्यानंतर आता छावा ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. (Bollywood update)

तर, मिळालेल्या माहितीनुसार छावा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर रिलीज होणार असे सांगण्यात येत आहे, दरम्यान, थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ८ आठवड्यानंतर कोणताही चित्रपट स्ट्रिमिंग पार्टनर असलेल्या ओटीटी वाहिनीवर रिलीज केला जाऊ शकतो. त्यामुळे लवकरच छावा प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. (Chhaava box office collection)
===========
हे देखील वाचा : Indian Cinema : शुटींगसाठी लागली २३ वर्ष; वर्ल्ड रेकॉर्ड आणि बरंच काही….
===========
‘छावा’ (Chhabra) चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर २६ दिवसांत चित्रपटाने नेट कलेक्शन ५३०.८ कोटी केले आहे. तर वर्ल्डवाईड या चित्रपटाने ७१८.५ कोटी कमावले आहेत. भारताचं ग्रॉस कलेक्शन ६३३.२५ कोटी झालं आहे. २८ मार्च २०२५ रोजी सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदाना यांचा ‘सिकंदर’ (Sikandar) हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी छावा चित्रपटाला रान मोकळं आहे. दरम्यान, ‘सिकंदर’ हा २०२५ मधला रश्मिकाचा (Rashmika Mandana) ‘छावा’ नंतर हा दुसरा हिंदी चित्रपट असणार आहे. (Sikandar Film)