
Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल उडवणार!
२०२४ मध्ये करिना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘क्रु’ (Crew) चित्रपट रिलीज झाला होता… female centric असणाऱ्या या चित्रपटात एक वेगळी कथा दाखवण्यात आली होती… तिघींचा अभिनय प्रेक्षकांना विशेष आवडला होता.. आता लवकरच ‘क्रु २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं सांगण्यात येत आहे… (Crew 2 movie)

मिळालेल्या माहितीनुसार, लोकांच्या आग्रहाखातर चित्रपटाच्या निर्मात्या एकता कपूर यांनी लवकरच क्रु २ आणण्याचा निर्णय घेतला आहे… दुसऱ्या भागात करिना कपूरची पुन्हा एकदा वर्णी लागल्याचं समजतंय. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘क्रू’ फ्रँचायझीचा सीक्वल येण्याची पूर्ण शक्यता असून या चित्रपटाचे मेकर्स बऱ्याच काळापासून पुढील भागाच्या कथेवर चर्चा करत होते…(Entertainment news)
====================================
हे देखील वाचा : Hera Pheri आहे ‘या’ चित्रपटाची हुबेहुब कॉपी; दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिली कबूली!
====================================
तसेच, क्रु २ मध्ये करिना कपूर (Kareena Kapoor) तर फिक्स आहेच पण बाकी स्टारकास्ट काय असणार? क्रिती आणि तब्बू दुसऱ्या भागातही दिसणार का याबदद्ल अद्याप काहीच सांगितले नाही आहे…रिपोर्ट्सनुसार, फ्रँचायझीने या वेळी तीन ए लिस्ट अभिनेत्रींना चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता क्रु २ कधी येणार? करिना कपूर सोबत झळकणाऱ्या आणखी २ अभिनेत्री कोण असणार? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील अशी अपेक्षा आहे…(Kareena Kapoor movie)