Kesari 2 : मराठीसह हिंदीतील या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट!

Samay Raina च्या India’s Got Latent शोवर साइबर पोलिसांची मोठी कारवाई; सर्व एपिसोड होणार डिलीट
India’s Got Latent: यूट्यूबर रणवीर अल्लाबादिया आणि समय रैना यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहियेत. नुकताच रणवीर अल्लाबादिया ने समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमादरम्यान त्याने आई-वडिलांविषयी एक विनोद केला होता, ज्यामुळे त्याच्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. याप्रकरणी सायबर पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. पोलिसांनी समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोचे आतापर्यंत प्रसारित झालेले सर्व १८ भाग काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.(India’s Got Latent)

‘इंडियाज गॉट लेटेंट‘ या शोच्या वादात ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटी कायद्याच्या कलम ६७ आणि बीएनएसच्या संबंधित कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शोच्या पहिल्या भागापासून ते सहाव्या भागापर्यंत सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी युट्युबला पत्र लिहिले आहे. ‘ इंडियाज गॉट लेटेंट ‘चे सर्व १८ आक्षेपार्ह भाग युट्युबवरून तात्काळ हटवावेत आणि चॅनेलवर कारवाई करावी, अशी विनंती पोलिसांनी या पत्रात केली आहे. तसेच युट्युबला ही सर्व सामग्री तपासून डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिस या प्रकरणी अत्यंत कडक कारवाई करताना दिसत आहेत.

एफआयआरमध्ये नाव असलेल्या सर्वांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. प्रत्येकाला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाणार आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननेही याबाबत कडक कारवाई केली आहे. एआयसीडब्ल्यूएने इंडियाज गॉट लेटेंटशी संबंधित सर्व व्यक्तींना भारतीय चित्रपट सृष्टीत काम करण्यास बंदी घातली आहे. त्यांच्यासोबत कोणतेही बॉलिवूड किंवा प्रादेशिक चित्रपट निर्मिती संस्था काम करणार नाही.(India’s Got Latent)
=============================
=============================
एनसीडब्ल्यूने एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे. एनसीडब्ल्यूने रणवीर अल्लाबाडिया, समय रैना आणि इतरांना त्यांच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल समन्स बजावले आहे आणि सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे.