Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

डेकोरेशन देते मुव्हीजचा फिल…
भर दुपारी एक वाजताची वेळ. अतिशय कडक उन्हात वरळीतील ( की लोअर परेल) पीव्हीआर मल्टीप्लेक्सीमधील जेम्स कॅमेरुन दिग्दर्शित महाखर्चिक व महाचर्चित ‘अवतार द वे ऑफ वाॅटर’चा आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचा शो पाहायला जातो. तोच मल या मल्टीप्लेक्सच्या प्रांगणात कमालीचा सुखद धक्का बसतो. चित्रपटाच्या थीमनुसार आकाशी रंगातील अतिशय आकर्षक आणि आपण त्यासह सेल्फी अथवा फोटो काढण्याचा मोह आवरता येऊ नये, असे भव्य दिमाखदार डेकोरेशन. अनेक जण हे देखणे डेकोरेशन पाहता क्षणीच आपल्या मोबाईलच्या कॅमेर्याकडे वळले. हा एकूणच माहौल या चित्रपटासाठीचा मूड आणखीन बिल्ड अप करणारा होता.(Theater Decorations)

रसिकांना चित्रपटाकडे अधिकाधिक प्रमाणात आकर्षित करणारा एक महत्वाचा फंडा म्हणजे हे थिएटरवरचे डेकोरेशन. मल्टीप्लेक्स युगात ते असे क्वचितच अनुभवायला येतेय. अन्यथा सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहांच्या काळात तो हुकमी फंडा होता. मागची पिढी त्याला देखावा म्हणायची. इतकेच नव्हे तर ‘थिएटर देखाव्या’च्या गोष्टीही एका पिढीतून पुढील अनेक पिढ्यांत जात राहिल्यात. आतल्या देशात चित्रपट पाहणे म्हणजे फक्त आणि फक्त पडद्यावर काय काय दाखवलयं, प्रतिकात्मक दृश्ये कशी होती?, ‘येथे दिग्दर्शक दिसला’ असे म्हणण्याची संधी कधी मिळाली? हे इतकेच नसते तर, अनेक फिल्म दीवान्यांसाठी ‘पिक्चर एन्जाॅय करणे’ म्हणजे एक प्रकारचा सण असतो. आणि त्याची सुरुवात थिएटरवर पिक्चर पाहायला गेल्यावर डेकोरेशन (Theater Decorations) पाहून त्यावर फिदा होण्यातून होते. त्या वातावरणात एक प्रकारे चित्रपट दिसू लागतो.
जुने संदर्भ चाळताना लक्षात येते की, आमच्या गिरगावातील सेन्ट्रल थिएटरमध्ये प्रभात फिल्म कंपनीचा ‘संत तुकाराम ‘ ( १९३६) झळकला तेव्हा थिएटरवरचे डेकोरेशन पाहायलाही गर्दी होई. हेदेखील चित्रपटाचे एक प्रकारचे यशच असते. माझी मागची पिढी आम्हाला मराठा मंदिर थिएटरवर के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ ( प्रदर्शन ५ ऑगस्ट १९६०) साठी लावलेल्या अतिशय भव्य अशा डेकोरेशनला पाहण्यासाठीही गर्दी होई आणि एक म्हणजे ते पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी दूरदूरवरुन फिल्म दीवाने येत इतकेच नव्हे तर, पिक्चरला येतानाही खास डेकोरेशन पाहण्यासाठी अर्धा तास लवकर येत अशी मागची पिढी आम्हाला सांगे.

गिरगावात मी लहानाचा मोठा होताना त्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटर्सवरच्या डेकोरेशनचा मी अनेकदा ‘ऑखो देखा हाल ‘ लाईव्ह अनुभव घेतलाय. आमच्या खोताची वाडीसमोरच असलेल्या मॅजेस्टीक थिएटरवर अशा देखाव्याना भारी स्कोप होता. आम्ही जातो अमुच्या गावा, दाम करी काम अशा कौटुंबिक मराठी चित्रपटाचेही देखावे आकर्षक होते. श्रीकृष्ण लीला, बलराम श्रीकृष्ण अशा पौराणिक चित्रपटाचे देखावे म्हणजे देवभक्तांनाही पर्वणी. आपल्या देशात चित्रपट रुजण्यास कधी काळी पौराणिक आणि संतपटांचा मोठाच वाटा होता आणि त्यात या थिएटर्स डेकोरेशनची भरपूर सपोर्ट सिस्टीम मिळाली.
प्रेक्षक म्हणून माझ्या आठवणीतील थिएटर्स डेकोरेशन सांगायची तर ऑपेरा हाऊसवरचे शोर, अमर अकबर अन्थनी यांचे, इंपिरियल थिएटर्सवरचे जंजीर, दुनिया का मेला, बुलंदी यांचे, मिनर्व्हावरचे शोले, शान यांचे डेकोरेशन आजही आठवतेय. इंपिरियल थिएटरच्या भिंतीवर रंगवलेला राजकुमारचा संवाद वाचताच ‘बुलंदी’चे तिकीट काढण्यास हात खिशात जाणारच. मराठा मंदिर थिएटरवर ‘रझिया सुल्तान ‘च्या अतिशय दिमाखदार डेकोरेशनचा भाग म्हणून एक भव्य गरुड उभारल्याचे आठवतेय. ते पाहायला होणारी गर्दी पिक्चर पाहायला बसली असती तरी तो सुपर हिट ठरला असता. थिएटर डेकोरेशन (Theater Decorations) हिट पण पिक्चर फ्लाॅप असे हे एक उदाहरण.
मिडियात आल्यावर लक्षात राहिलेली डेकोरेशन सांगायची तर, मिनर्व्हावरचे राम तेरी गंगा मैलीचे, मेट्रोवरचे राम लखन, सौदागर, खलनायक, १९४२ अ लव्ह स्टोरी यांचे, लिबर्टीवरचे हम आपके कौन हैचे, इराॅसवरचे लगानचे… ही सर्व डेकोरेशन आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि या चित्रपटाच्या यशात या आकर्षक डेकोरेशनचाही वाटा नक्कीच आहे. एक मूड बनता है यार. थिएटर्सवर गेलो आणि पिक्चर पाहून परतलो असे होत नसते. आणि व्हायलाही नकोच. मुंबईतील १२ मार्च १९९२ च्या बाॅम्बस्फोटात प्लाझा चित्रपटगृहाच्या कार पार्किंगमध्ये एक झाला. त्यानंतर नूतनीकरणानंतर चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’पासून प्लाझा पुन्हा सुरु होताच त्याचे डेकोरेशन पाहताक्षणीच सिनेमा पहावासा वाटलाच. हा सर्वकालीन सुपर हिट चित्रपट यावेळी रिपिट रनला प्रदर्शित केला, पण डेकोरेशनचा थाटामाट उल्लेखनीय.
रजनीकांतचे पिक्चर मुंबईत (विशेषत: अरोरा थिएटरमध्ये, कालांतराने वडाळ्यातील मल्टीप्लेक्समध्ये) रिलीज होताना हीच डेकोरेशन संस्कृती कायम राहीली. त्याच्या अवाढव्य कटआऊट. त्याला दुधाने आंघोळ हा हुकमी फंडा पब्लिक या रजनीकांतचा कसा दीवाना आहे हेच अधोरेखित करत आले आहे. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट संस्कृतीमधील थिएटर्स डेकोरेशन काहीसे लाऊड अर्थात भडक वाटत असेल पण ते पब्लिकला आकर्षित करतेय, पिक्चर एन्जाॅय करायला हवा ही भावना वाढीस लावतेय. चित्रपट अनेक गोष्टींतून जगत/वाढत/पसरत जात असतो. त्यात हे थिएटर डेकोरेशनही (Theater Decorations) आहेच आहे.
=========
हे देखील वाचा : मैत्रिणीच्या समोर अभिनेत्री साधनाला का लज्जित व्हावे लागले?
=========
‘अवतार द वे ऑफ लाईफ ‘साठी वरळी पीव्हीआरचा परिसर मला फ्लॅशबॅकमध्ये नेणारा ठरला. आजच्या डिजिटल पिढीला हा अनुभव नवीन वाटेल. कारण, ते मोबाईल स्क्रीनवर गुंतलेत. त्यांना थिएटर्सकडे आणायचे असेल तर असे भन्नाट डेकोरेशन हवेच हवे. अनेक आठवडे मिनर्व्हात ‘शोले’ आगाऊ तिकीट विक्रीलाच हाऊस फुल्ल असे आणि त्यासाठीची लांबच लांब रांग धडकी भरवणारी असे. तेव्हा मिनर्व्हावरचे भव्य दिव्य डेकोरेशन (Theater Decorations) पाहूनही समाधान मिळे. तो चित्रपट ‘वेड’ व्यक्त करण्याचा वेगळाच ‘अवतार ‘ होता.
दिलीप ठाकूर