Gurmeet Choudhary फिटनेससाठी अभिनेता गुरमीत चौधरीने केला दीड वर्षापासून भात,
Deepika Padukon : यशस्वी मॉडेल ते सुपरस्टार अभिनेत्री असा प्रवास करणारी बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण
बॉलिवूडमध्ये अशा खूप कमी अभिनेत्री असतात, ज्यांच्याकडे प्रतिभेसोबतच सौंदर्य देखील आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण (Deepika Padukon). बॉलिवूडची मस्तानी अशी ओळख असलेल्या दीपिकाने आपल्या प्रभावी अभिनयाच्या आणि आकर्षक लुक्सच्या जोरावर या ग्लॅमर जगात आपली वेगळी आणि मोठी ओळख निर्माण केली. (Deepika Padukon)
कधी काळी मोठा संघर्ष करणारी दीपिका आज बॉलिवूडची टॉपची आणि सर्वात महाग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Bollywood’s Biggest Actress) संपूर्ण जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत. आज अभिनेत्री दीपिका पादुकोण आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकाला इंडस्ट्रीत येऊन तब्बल १८ वर्षे झाली. या मोठ्या काळात तिने तिचे प्रबळ स्थान या क्षेत्रात निर्माण केले आहे. (Deepika Padukon Birthday)
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपिका पदुकोणने २००७ मध्ये सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दीपिकाने आपल्या १५ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत जवळपास ३५हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Entertainment mix masala)
दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे झाला. तिचे वडील जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण (Prakash Padukon) आहेत तर तिच्या आईचे नाव उज्ज्वला पदुकोण आहे. मूळची बंगलोरची असलेल्या दीपिकाने राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन बॅडमिंटन स्पर्धा देखील खेळल्या आहेत. (Bollywood Actress)
दीपिका पदुकोणने वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षीच तिच्या मॉडेलिंग (Modling) करिअरला सुरुवात केली होती. या काळात ती वडिलांच्या पायावर पाऊल टाकत बॅडमिंटन (Badminton) या खेळत देखील आपली चमक दाखवत होती. मात्र, दहावीनंतर दीपिकाने बॅडमिंटन सोडून पूर्णपणे मॉडेलिंगला सुरुवात केली. यानंतर दीपिका पदुकोण अनेक जाहिरातींमध्ये झळकली होती. (Bollywood Masala)
कॉलेजमध्ये असताना दीपिकाकडे अनेक जाहिरातींच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. या काळात तिच्याकडे मॉडेलिंगचे मोठे आणि भरपूर प्रोजेक्ट्स असल्याने तिचे शिक्षण अर्धवटच राहिले. अशातच तिने २००५मध्ये दीपिकाने लॅक्मे फॅशन वीकमध्ये (Lakme Fashion Week) सहभाग घेतला होता. पहिल्याच वर्षात तिने ‘मॉडेल ऑफ द इयर’चा पुरस्कार पटकावला. यानंतर तिला ‘किंगफिशर कॅलेंडर’मध्ये (Kingfisher Calender) स्थान मिळाले. या कॅलेंडरमध्ये झळकल्यानंतर दीपिका मॉडेलिंगच्या जगात खूप लोकप्रिय झाली. (Ankahi Baatein)
पुढे तिला चित्रपटांचे क्षेत्र खुणावू लागले आणि तिने मुंबई गाठली. वयाच्या २१व्या वर्षी ती बंगळुरूहून मुंबईत आली. इकडे आल्यानंतर तिला पाहिले काम मिळाले आणि तेही एका व्हिडिओ अल्बममध्ये झळकण्याची. तिने हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’ (Naam Hai Tera) या म्युझिक अल्बममध्ये काम केले. पुढे दीपिकाने २००६मध्ये ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
याचाच काळात फराह खान (Farah Khan) तिच्या आगामी चित्रपटासाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. त्यावेळी तिला तिच्या मैत्रिणीने फॅशन कोरिओग्राफर वंडल रॉडरिककडे याबद्दल चौकशी करण्यासाठी सांगितले. वंडल त्यावेळी दीपिकाचा मॉडेलिंग मेंटॉर होता, त्यामुळे त्याने लगेच दीपिकाचे नाव सुचवले. दीपिकाने तिची ऑडिशन पास केली आणि ती ‘ओम शांती ओम’साठी निवडली गेली.
ओम शांती ओम या तिच्या पहिल्याच सिनेमात तिला शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) काम करण्याची संधी मिळाली, होती. त्यानंतर दीपिका स्टार झाली. मात्र पहिला सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २०१३ साली तिचे गोलियों की रासलीला राम-लीला, ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्सप्रेस आणि रेस २ हे सर्व सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले.
मात्र यशाच्या शिखरावर असताना २०१४ साली दीपिकाला नैराश्याचा सामना करावा लागला होता. या मुद्द्यावर दीपिका अनेकदा बोलली आहे. तिच्या नैराश्याच्या दिवसांबद्दल सांगताना दीपिकाने सांगितले होते की, त्या दिवसांत एक वेळ अशी आली की ती आत्महत्येचा विचार करू लागली. या काळात तिला तिच्या आईने मोठी मदत केली. या नैराश्यातून बाहेर आल्यानंतर तिने याबद्दल जागृती करण्यासाठी नैराश्यावर मनमोकळेपणाने भाष्य करण्यास सुरुवात केली. (Deepika Padukon Faced Depression)
दीपिकाने नैराश्यावर मात करत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि मोठे यश संपादित केले. आज दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या एका चित्रपटासाठी साधारण १५ – २० कोटी रुपये मानधन घेते. चित्रपटांव्यतिरिक्त दीपिका इतर अनेक माध्यमांतून दरवर्षी भरघोस कमाई करते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच दीपिका पदुकोण एक चांगली बिझनेसवुमन देखील आहे. तिने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केली आहे. (Deepika Padukons Property)
दीपिका पदुकोण ही बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, ती अनेकदा आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडसाठी जाहिरात काम करताना दिसली आहे. ती अनेक प्रोडक्टची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. एका रिपोर्टनुसार दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपये आहे.
दीपिका पादुकोण २०१८ पासून केए प्रॉडक्शन (KA Production) नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. प्रॉडक्शन हाऊससोबत, दीपिकाचा स्वतःचा स्किन केअर ब्रँड 82°E देखील आहे. या अंतर्गत ती फेशियल मास्क, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, लिप बाम आणि क्लिन्झर सारखी उत्पादने तयार करतो. याशिवाय दीपिकाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे.
दीपिका पादुकोणच्या व्यवसायातील गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१९ मध्ये ‘Furlenco’ नावाच्या फर्निचर रेंटल प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली होती. सोबतच ‘पर्पल’मध्ये पैसे गुंतवले. २०१९ मध्येच, दीपिकाने पॅकेज्ड फूड स्टार्टअप ड्रम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या सीरीज सी फंडिंग राउंडमध्ये भाग घेतला होता. ती स्टार्टअपच्या फ्लेवर्ड दही ब्रँड ‘एपिगॅमिया’ची ब्रँड ॲम्बेसेडर बनली. (Deepika Padukons Investments)
यासोबतच दीपिकाने इलेक्ट्रिक टॅक्सी स्टार्टअप ‘ब्लूस्मार्ट’मध्येही पैसे गुंतवले आहेत. दीपिकाने 2020 मध्ये बेंगळुरूस्थित ट्रॅव्हल बॅग स्टार्टअप कंपनी ‘मोकोबारा’मध्येही गुंतवणूक केली आहे. याशिवाय अभिनेत्रीने फॅन मेकर कंपनी ‘Atomberg Technologies’, Pet care platform ‘Supertel’ आणि ‘Blue Tokai Coffee’ मध्ये पैसे गुंतवले आहेत.
===========
हे देखील वाचा : Sai Paranjpye : यांना ‘चष्मे बद्दूर’ हे टायटल कसे मिळाले?
===========
दीपिका तिच्या मोठ्या कारकिर्दीमध्ये अनेक वादांमध्ये देखील अडकली होती. शिवाय तिने नाव अनेक युवराज सिंग, धोनी, रणबीर कपूर आदी अनेक कलाकारांसोबत देखील जोडले गेले. २०१८ साली दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केले. त्यानंतर सप्टेंबर २०२४ साली त्यांना ‘दुआ’ नावाची एक मुलगी देखील झाली आहे. (Deepika Padukons Family)