
Dev Anand सोबतचे संगीतकार राजेश रोशनचे तीन सिनेमे!
नवकेतन या चित्रपट संस्थेला १९७५ साली जेव्हा पंचवीस वर्ष पूर्ण झाले तेव्हा देव आनंद यांनी तीन चित्रपटांची घोषणा केली. हे चित्रपट होते ‘जानेमन बुलेट’ आणि ‘देस परदेस’. हे चित्रपट अनुक्रमे चेतन आनंद, विजय आनंद आणि देव आनंद या तीन भावांनी दिग्दर्शित केले होते. या तीन चित्रपटांचे संगीतकार वेगवेगगळे असणारे होते. नायिका वेगवेगळ्या असणार होते नायक मात्र तिन्ही चित्रपटांचा देव आनंदच असणार होता. या पद्धतीने ‘जानेमन’ची नायिका हेमामालिनी, ‘बुलेट’ची नायिका परवीन बाबी होती. ‘जानेमन’ला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि ‘बुलेट’ला संगीत आर डी बर्मन यांचे होते. ‘देस परदेस’ या चित्रपटात देवानंदची नायिका टीना मुनीम होती. तिचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे संगीत कुणाला द्यावे यावर चर्चा चालू होती.

या चित्रपटाचे गीतकार अमित खन्न तेव्हा नवकेतनच्या प्रोडक्शन टीम मध्ये होते. त्यांनी संगीतकार राजेश रोशन चे नाव देव आनंदला सुचवले. देव आनंदने अमित खन्ना यांना विचारले की,” संगीतकार राजेश रोशन अगदी नवीन आहेत त्यांना नवकेतन च्या सिनेमाच्या संगीताचे ओझे झेपेल का?” त्यावर अमित खन्ना यांनी राजेश रोशन यांचे एक गाणे देव आनंद यांना ऐकवले हे गाणे ऐकून देव आनंद खूपच प्रभावित झाले. ते गाणे होते ‘ज्यूली’ या चित्रपटातील ‘भूल गया सब कुछ याद नही आप कुछ’… या गाण्याला संगीतकार राजेश रोशन यांनी दिलेली ट्रीटमेंट आणि त्याचे प्रील्यूड आणि इंटर ल्युड पीसेस पाहून देव आनंद खूप प्रभावीत झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी राजेश रोशन यांना आपल्याकडे बोलावले. दोघांची विस्तृत चर्चा झाली. जेष्ठ संगीतकार रोशन यांचे पुत्र असलेले राजेश आणि लहान वयातील त्यांची प्रतिभा पाहून ते खूष झाले. त्यावेळी राजेश रोशन यांनी त्यांनी नुकतंच संगीत दिलेले पण अजून चित्रपट प्रदर्शित न झालेल्या ‘प्रियतमा’ या चित्रपटातील ‘कोई रोको ना दिवाने को…’ हे गाणे ऐकवले. हे गाणे ऐकल्यानंतर तर देव साहेब आणखीच प्रभावित झाले.
================================
हे देखील वाचा : यश चोप्रा यांचे नावडते संगीतकार अचानक आवडते झाले ?
================================
त्यानंतर काही दिवसांनी अमित खन्ना यांनी राजेश रोशन यांना पुन्हा एकदा देव आनंदच्या भेटीला बोलावले आणि नवकेतन च्या आगामी ‘देस परदेस’ या चित्रपटासाठी राजेश रोशन यांची संगीतकार म्हणून नियुक्ती झाली. खरं तर राजेश रोशन यांच्यासाठी हे फार मोठ काम होतं कारण नवकेतन या बॅनरची लोकप्रियता प्रचंड मोठी होती. तिथल्या संगीतकारांची परंपरा देखील फार मोठी होती. असे असताना राजेश रोशन सारख्या अगदी पंचशीतील संगीतकाराला नवकेतनचा चित्रपट मिळणे ही फार मोठी त्या काळातील ब्रेकिंग न्यूज होती. राजेश रोशन यांनी देखील हे आव्हान स्वीकारले आणि ते कमालीचे यशस्वी झाले. या चित्रपटातील एकूण एक गाणं हिट करून दाखवलं.

किशोर कुमार यांच्या स्वराचा अतिशय सुरेल वापर त्यांनी करून घेतला. ‘नजराना भेजा किसी ने प्यार का’ या गाण्याला राजेश रोशन यांनी दिलेली ट्रीटमेंट फार सुंदर होती. चित्रपटाचे टायटल सॉंग ‘ये देस परदेस…’ परफेक्ट जमून आले होते. राग किरवाणी वर आधारीत ‘ आप कहे और हम ना आये ऐसे तो हालात नाही’ हे लताचे क्लासिकल बेस गझल सदृश्य गाणे चित्रपटाच्या हायलाईट ठरले. ‘नजर लगेना साथियो..’ हे किशोर कुमार ,अमित कुमार, विजय बॅनेडीक्ट मनोहर उदास यांनी गायलेलं धमाल गाणं चित्रपटाची उंची वाढवणारे होते. ‘जैसा देस वैसा भेस ‘ हे लता-किशोरचे गीत नवकेतन च्या परंपरेला साजेसे होते. ‘तू पी और जी..’ हे किशोरच्या स्वरातील गाणे त्यातील ऱ्हिदम मुळे गाजले. ‘देस परदेस’ चित्रपट सुपरहिट झाला. चित्रपटातील सर्व गाणी अमित खन्ना यांनी लिहिली होती.
================================
हे देखील वाचा : अमिताभने केली चक्क हेमा मालिनीच्या भावाची भूमिका !
================================
यानंतर नवकेतन चा पुढचा चित्रपट ‘लूटमार’ राजेश रोशन यांनाच मिळाला. या चित्रपटाला भले व्यावसायिक यश मिळाले नसले तरी गाणी मात्र सुंदर होते. ‘हंस तू हरदम खुशिया या गम’ ‘जब छाये मेरा जादू कोई बच न पाये’ ही गाणी त्या काळात खूप गाजली होती. यानंतर देव ने नवकेतन च्या बाहेरचा एक चित्रपट केला होता. जॉर्ज बर्नाड शॉ पिगमेलियन या कलाकृतीवर आधारीत अमेरिकन म्युझिकल ड्रामा माय फेअर लेडी वर आधारीत होता.(आपल्याकडे पु लं देशपांडे यांनी याच कलाकृतीवर ‘ती फुलराणी’ हे नाटक लिहिल होतं) जो चित्रपट या नाटकावर आधारित होता चित्रपटाचे नाव होतं ‘मनपसंद’ या चित्रपटात देव आनंद, टीना मुनीम, गिरीश कर्नाड यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला देखील राजेश रोशन यांचे संगीत होते. यातील सर्वच गाणी अतिशय मधुर बनली होती.सिनेमाचे दिग्दर्शक बासु चतर्जी होते. सिनेमात एकूण ९ गाणी होती. ‘चारू चंद्र की चंचल चितवन’, लोगों का दिल अगर जितना तुमको है तो बस मीठा मीठा बोलो , ‘सुमन सुधा रजनी गंधा’ हि गाणी दृष्ट लागावी इतकी सुंदर बनली होती. सर्व गाणी अमित खन्ना यांनी लिहिली होती. होते संगीतकार राजेश रोशन आणि देव आनंद हे केवळ तीन चित्रपटांसाठी एकत्र आले पण तीनही सिनेमा आज केवळ त्याच्या संगीतासाठी लक्षात आहेत!