
धनुष आणि रश्मिका मंदाना यांचा Trance Of Kubera ‘या’ दिवशी होणार रिलीज!
बॉलिवूड चित्रपट गाजवणारी दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आगामी ‘ट्रान्स ऑफ कुबेरा’ (Trance Of Kubera) चित्रपटात दिसणार आहे. सलमान खान सोबत ‘सिकंदर’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्यानंतर पुन्हा रश्मिका साऊथ चित्रपटांकडे वळली आहे. धनुष आणि नागार्जुन यांच्यासोबत ‘कुबेरा’ चित्रपटात ती स्क्रिन शेअर करणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. जाणून घेऊया काय असेल चित्रपटाची कथा?(Bollywood news)

‘ट्रान्स ऑफ कुबेरा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर रिलीज झाला असून एक गरीब घरातील मुलगा कसा माफिया होतो आणि त्याच्याकडे कुबेरासारखी कशी संपत्ती येते अशी स्टोरी लाइन दिसते. तसेच, पैसा आणि लोभ यावर चित्रपटाच्या कथेतून भाष्य केले गेले आहे असं देखील जाणवतं. चित्रपटाच्या संपूर्ण टीझरमध्ये एकही संवाद नसून केवळ बॅकग्राऊंडला गाणं वाजत राहतं.(Tollywood movies)
================================
हे देखील वाचा: Reema Lagoo : शरद पोंक्षेंना घरच्यांच्या नकळत रिमा ताईंनी पैसे का दिले?
=================================
दरम्यान, ‘ट्रान्स ऑफ कुबेरा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना धनुषच्या (Dhanush) अभिनयाचा आणखी एक पैलू पाहायला मिळणार आहे. याशिवाय धनुष ओम राऊत दिग्दर्शित ‘कलाम’ या चित्रपटात APJ Abdul Kalam यांची भूमिका देखील साकारणार आहे. ट्रान्स ऑफ कुबेरा चित्रपटात धनुष सोबत रश्मिका मंदान्ना आणि नागार्जुन (Nagarjun) प्रमुख भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये एकाच वेळी चित्रित केला गेला आहे. २० जून २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे.(Entertainment update)