Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

National Film Awards : सचिन पिळगांवकर ते त्रिशा ठोसर; या

आर्यन-शाहरुख खानचं टेन्शन वाढलं! Sameer Wankhede यांनी केला अब्रुनुकसानीचा दावा;

Rajesh Khanna यांच्या सुपरस्टारडम काळात त्यांचा सिनेमा फ्लॉप करण्याचे  कुटील

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dharmendra : प्रेम चोप्राच्या भीतीची धर्मेंद्रने केली पोलखोल!

 Dharmendra : प्रेम चोप्राच्या भीतीची धर्मेंद्रने केली पोलखोल!
बात पुरानी बडी सुहानी

Dharmendra : प्रेम चोप्राच्या भीतीची धर्मेंद्रने केली पोलखोल!

by धनंजय कुलकर्णी 29/04/2025

हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान बऱ्याचदा गमतीशीर प्रसंग घडतात.  हा किस्सा खलनायक प्रेम चोप्रा यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितला होता. ‘पॉकेट मार’ या  १९७४ साली  प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ही घटना घडली होती. मोठी गमतीशीर घटना होती. रमेश लखनपाल दिग्दर्शित ‘पॉकेटमार’ (१९७४) या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र, सायरा बानो, मेहमूद , प्रेम चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा एक सत्तर च्या दशकातील टिपिकल ॲक्शन पट होता. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सला या धर्मेंद्रला जीपच्या मागे प्रेम चोप्रा यांचे गुंड बांधतात आणि रस्त्यावरून फरपटत घेऊन जातात असा शॉट होता. (dharmendra and prem chopra)

खलनायक प्रेम चोप्रा यांना वाटले हा शॉट धर्मेंद्र न स्वतः करायला नको. कारण असं करणं रिस्की होतं.  म्हणून त्यांनी सेटवर उपस्थित असलेले धर्मेंद्रचे कझिन नरेंद्र यांना बाजूला बोलवून सांगितले की,” हा शॉट खूप  रिस्की आहे.  यात धर्मेंद्रला इजा होऊ शकते.  चेहऱ्याला मोठी जखम होऊ शकते.  हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतात.  त्यामुळे धर्मेंद्रने हा शॉट स्टंट मॅन किंवा बॉडी डबल वापरून करावा. एका हिरो साठी स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर काही अनुचित घटना घडली तर त्याचा करिअरवर परिणाम होऊ शकतो!” धर्मेंद्रचे कजीन नरेंद्र यांना प्रेम चोप्रा यांचीही गोष्ट पटली आणि त्यांनी धर्मेंद्रला जाऊन तसे सांगितले. धर्मेंद्रने प्रेम चोपडा कडे एक कटाक्ष टाकला आणि डोळा मारत मोठ्यांना ते हसले.  (Bollywood stories)

===========

हे देखील वाचा : Shamshad Begum : ऑडीशनला गेली आणि बारा गाण्यांचे कॉन्ट्रॅक्ट साइन करून आली!

===========

प्रेम चोपडा यांना बाजूला घेऊन धर्मेंद्र म्हणाला ,” मला माहिती आहे तुम्ही असं का सांगत आहात.”  त्यावर प्रेम चोप्रा म्हणाले,” काय माहिती आहे ?” त्यावर धर्मेंद्र म्हणाले की,”  हा शॉट मी जर स्वतः चित्रित केला तर या चित्रपटाच्या शेवटी अशाच प्रकारे जीपला बांधून तुम्हाला देखील फरपटत नेले जाणार आहे. व्हिलन हिरोला जशी शिक्षा देतो तशीच शिक्षा शेवटी हिरो व्हिलनला देत असतो. त्यामुळे जर मी स्वतः हा शॉट दिला तर तुम्हाला देखील द्यावा लागेल आणि याची तुम्हाला भीती वाटते आहे. हो नं?”  यावर प्रेम चोपडा म्हणाला,” त्यात काय चुकीचे आहे? स्वतःची काळजी घ्यायलाच पाहिजे.”  त्यावर धर्मेंद्र म्हणाले,”  आपण परस्परांशी बोलण्यापेक्षा चित्रपटाचे दिग्दर्शक काय म्हणतात ते बघू यात . ते योग्य निर्णय घेतील.”  त्यांनी दिग्दर्शकाला विचारले दिग्दर्शक रमेश लखनपाल यांनी  दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि शेवटी बॉडी डबल वापरून हा शॉट चित्रित केला गेला. पण धर्मेंद्रला मात्र हा शॉट स्वतःच द्यायचा होता. (Bollywood classic movies)

हा सिनेमा धर्मेंद्रचा जरी असला तरी तो इक्वली मेहमूदचा देखील होता त्या काळात मेहमूद यांना नायकाला समांतर अशी भूमिका मिळत असेल मानधन देखील भरपूर मिळत असे. मेहमूद या काळात प्रचंड लोकप्रिय होता. या सिनेमात मेहमूद वर पिक्चराईज दोन गाणी होती. हा चित्रपट बनायला तब्बल सहा ते सात वर्ष लागले. कारण या चित्रपटात सुरू तिला धर्मेंद्रची नायिका राजश्री होती. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात या चित्रपटाची सुरुवात झाली पण अभिनयातील राजश्री हिने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेऊन परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने हा चित्रपट अर्धवटच राहिला तोवर या चित्रपटाचे ५०% काम पूर्ण झाले होते. (Entertainment news)

यानंतर निर्मात्याने सायराबानू हिला घेऊन पुन्हा चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले त्यामुळे हा चित्रपट निर्माण व्हायला तब्बल सात वर्षे लागली. या वर्षी धर्मेंद्र चे तब्बल सहा सिनेमे प्रदर्शित झाले होते. पत्थर और पायल, दोस्त, रेशम की डोरी, इंटरनॅशनल क्रूक ,दो शेर , पॉकेट मार… यातील दोन सिनेमात त्याची नायिका हेमा मालिनी होती तर तीन सिनेमात सायरा बानू…  (Entertainment masala)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Dharmendra Entertainment Hema Malini mehmood old classic movies pocket maar movie prem chopda Prem Chopra saira bano
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.