Mahesh Manjrekar : “माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे”

Dharmendra :“कधी सुटका मिळणार या गैरसमजांमधून?; धर्मेंद्रंची पोस्ट व्हायरल
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात १९६० साली एक देखणा अभिनेता आला आणि बघता बघता त्याने दिलीप कुमार, अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकलं. ‘ममता’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘शोले’ किंवा ‘शोला और शबनम’ प्रत्येक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारुन सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते म्हणजे Dharmendra. ब्लॅक अॅण्ड व्हाईट ते कलर टीव्ही किंवा चित्रपट असा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांपैकी एक नाव धर्मेंद्र याचं आवर्जून घ्यावंच लागेल. अजूनही त्यांच्या चाहत्यांच्या मनात त्यांची प्रत्येक भूमिका आणि चित्रपट घर करुन आहे. अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता धर्मेंद्र यांनी त्यांच्या चाहत्यांना बुचकळ्यात पाडणारी एक पोस्ट केली आहे. काय आहे पोस्ट? जाणून घेऊयात…
धर्मेंद्र यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘हृदयात अंतर वाढत चालले आहे…कधी सुटका मिळणार… या गैरसमजांमधून…..’. धर्मेंद्र यांनी या पोस्टसोबत त्यांच्या गंभीर आणि विचार करत असलेला एक फोटो देखील शेअर केला आहे. धर्मेंद्र यांच्या या पोस्टमुळे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे किंवा शब्दांचा रोख कुणाकडे आहे याचा अंदाज बांधता येत नाहीये. त्यामुळे लवकरच स्वत: धर्मेंद्र यांनी या पोस्टमधील शब्दांचा उलगडा करावा अशी मागणी सोशल मिडीयावर त्यांचे चाहते करत आहेत. (Bollywood update)

Dharmendra गेले अनेक वर्ष चित्रपटांपासून लांब होते. २०२३ मध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातून त्यांनी पुन्हा पदार्पण केलं होतं. त्यानंतर २०२४ मध्ये आलेल्या ‘तेरी बातो में ऐसा उलझा जिया’ या सिनेमात धर्मेंद्र यांनी शाहिद कपूरच्या आजोबांची भूमिकाही साकारलेली. त्यामुळे आगामी २०२५ मध्ये पुन्हा एकदा धर्मेंद्र कोणत्या चित्रपटात झळकणार का अशी देखील चर्चा सुरु आहे. (Amitabh bachchan viral post)
============
हे देखील वाचा : Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?
============
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनीही अशीच लोकांना विचारात पाडणारा पोस्ट सोशल मिडियावरकेली होती. अमिताभ बच्चन यांनी ७ फेब्रुवारीला एक पोस्ट केली होती. त्यात “जाण्याची वेळ झाली…” असं लिहिलं होतं. त्यांची ही पोस्ट पाहून चाहत्यांची चिंता वाढली होती. नेटकऱ्यांनी बिग बींची तब्येत बरी नाही आहे का? किंवा कोन बनेगा करोडपती? या शोमधील ते एक्जिट घेत आहेत का? असे अनेक प्रश्न विचारले होते. यावर बिग बी म्हणाले की, “माझी कामावर जाण्याची वेळ झाली आहे. कमाल आहात तुम्ही. मला इथून (केबीसी सेटवरून) रात्री २ वाजता सुट्टी मिळते, घरी पोहोचायला उशीर होतो. रात्री ते लिहिता लिहिता मी झोपलो, त्यामुळे ते अर्धवट राहिलं आणि ‘जाण्याची वेळ झाली’ इतकंच लिहिलं आणि मी झोपलो.”