धुंदी कळ्यांना
मित्रांनो, सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेले ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना ,शब्दरूप आले मुक्या भावनांना ‘ हे गीत आपणास माहित आहेच पण त्यामागे एक किस्सा आहे . बाबूजींना या गाण्याची चाल आधी सुचली होती . ‘डाडा डडाडा ,डाडा डडाडा ,डाडडाड डाडा डडा डाडडाडा ‘ अशी ट्यून त्यांनी रचली होती . ‘धाकटी बहीण ‘ हा चित्रपट होता आणि त्याकरिता गीतकार होते जगदीश खेबुडकर . खेबूडकरांना चित्रपटातील प्रसंग समजावून सांगण्यात आला. चित्रपटातील नायिका नायकाला सुधारते आणि त्याला फिरायला घेऊन जात, असा प्रसंग होता. खेबूडकरांना चालीवर शब्द लिहायला सांगितले. पण त्यांना सुरुवातीला शब्द सुचत नव्हते. इतक्यात कॅमेरामन म्हणाला,” असे शब्द लिहा की वातावरण कसं धुंद व्हायला हवं.” हे ऐकताच त्यांनी शब्द लिहिले,”धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना,शब्दरूप आले मुक्या भावनांना “. नायिका नायकाला सुधारते असे असल्याने,खेबूडकरांनी गाण्यात असे म्हटले ती नायिका सांगते, “तुझ्या जीवनी नीतीची जाग आली माळरानी या प्रीतीची बाग आली सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा शब्दरूप आले मुक्या भावनांना ” हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते.
गणेश आचवल