
Dhurandhar चं ‘हे’ गाणं धुमाकूळ घालतयं… पण ते आहे कोणाचं ?
इंस्टाग्राम उघडलं रे उघडलं की रांगेने फक्त रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘धुरंधर’ चित्रपटाचेच रिल्स दिसतायत… त्यातही चित्रपटातील प्रत्येक गाणी आणि BGM ने वेगळाच ऑरा निर्माण केला आहे… चित्रपटातील रणवीर सिंग ते संजय दत्त सगळ्याच हिरोंची कामं प्रेक्षकांना भावली पण अक्षय खन्नाच्या अभिनयाने आणि डान्समुळे या चार चांद लागले. या आधी रणबीर कपूर्या Animal चित्रपटातल्या जमाल कुडू गाण्यावरची बॉबी देओलची (Bobby Deol) signature step चांगलीच गाजली होती. आणि त्यानंतर आता ‘धुरंधर’ चित्रपटातल्या अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) युनिक वाईबवाल्या गाण्याने मार्केट जाम करून ठेवलं आहे. ते गाणं कोणतं आहे आणि कुणाचं आहे जाणून घेऊयात… (Bollywood)

तर, सध्या पूर्ण भारत ज्या गाण्यावर थिरकतोय, तर बहारीनी गाणं आर्टिस्ट फ्लिपराची आणि डीजे आउटlaw यांचं आहे, याचं नाव आहे फानाईनला… या गाण्याचा ‘धुरंधर’चा म्युझिक कंपोजर शाश्वत सचदेव याने परफेक्ट वापर केला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये धुरंधर पाहताना तुम्ही फुल्ल वाईबमध्ये घुसून जाता. त्यातच लॉर्ड अक्षय खन्नाचा या गाण्यावरील नाच तर वाह भाई वाह असाच आहे. (Entertainment News)

‘धुरंधर’मधील इतर गाण्यांनीही प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. यापैकी ‘ना तो कारंवा की तलाश है’ ( i ‘Na toh karvan ki talaash hai’ qawwali) गाणं एका वेगळ्याच तंदरीत प्रेक्षकांना घेऊन जातं… तर या गाण्याची गोष्ट ६५ वर्षांपूर्वीची आहे, ही एक सुप्रसिद्ध कव्वाली असून १९६० मध्ये आलेल्या ‘बरसात की रात’ (Barsat Ki Raat) या क्लालिक बॉलिवूड चित्रपटातलं हे गाणं आहे. आशा भोसले, मोहम्मद रफी, मन्ना डे, सुधा मल्होत्रा आणि एस.डी बातिश यांनी त्या चित्रपटात हे गाणं गायलं होतं. या गाण्याचं संगीत दिलं होतं ह्रतिक रोशनच्या आजोबांनी म्हणजेच रोशन यांनी तर साहिर लुधियानवी (Sahir Ludhiyanvi) यांनी गीत लिहिलं होतं. या आयकॉनिक गाण्याचा ‘धुरंधर’ चित्रपटातील म्युझिक कंपोजर्स Revie करत प्रेक्षकांना जुन्या काळात घेऊन गेले आहेत. याव्यतिरिक्त संपूर्ण चित्रपटात ‘रंभा हो हो’, ‘हवा हवा’ अशा जु्न्या गाण्यांचा योग्य सीन्समध्ये वापर करत नॉस्टॅलेजियाही तयार केला आहे. (Dhurandhar Movie Songs)
================================
हे देखील वाचा : Dhurandhar ने धुरळा केलाय; पण तरीही…
================================
रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘धुरंधर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २८.६० कोटी, दुसऱ्या दिवशी ३३.१० कोटी, तिसऱ्या दिवशी ४४.८० कोटी कमवत देशात ३ दिवसांत १०६.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच, जगभरात या चित्रपटाने १६०.१५ कोटी कमवत नवा इतिहास रचला आहे. महत्वाचं म्हणजे ‘धुरंधर’ हा रणवीर सिंगच्या आजवरच्या सर्व चित्रपटांपैकी सर्वात मोठा ओपनर आणि २०२५ मधला तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ओपनर चित्रपटही ठरला आहे. (Dhurandhar Box Office Collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi