
Dhurandhar ने राडा घातलाय; बॉलिवूडच्या इतिहासात ८३० कोटी कमावणारा ठरला पहिला चित्रपट
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने अक्षरश:धुमाकूळ घातला आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने १ महिन्यांपेक्षा अधिक काळ थिएटरमध्ये हाऊसफुल्ल शो करत नवा रेकॉर्डच रचला आहे. विशेष म्हणजे भारतात ८०० कोटींचा टप्पा पार करत ‘धुरंधर’ने ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या हिंदी वर्जनचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. जाणून घेऊयाच बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ने काय रेकॉर्ड्स केले आहेत. (Dhurandhar Movie)
तर, आदित्य धर (Aaditya Dhar) दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाने सलग १ महिना दोन डिजीट्समध्ये रोज कमाई केली आहे. म्हणजेच गेला १ महिना या चित्रपटाने २० कोटींच्या वर रोज कमाई केली आहे. भारतातील कमाईकडे वळण्याआधी आपण ‘धुरंधर’ने जगभरात किती कमाई केली आहे ते जाणून घेऊयात. तर, आतापर्यंत ‘धुरंधर’ने जगभरात १,२५४ कोटी रुपयांची कमाई केली असून, हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चौथा भारतीय चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर एस.एस.राजामौलींच्या ‘RRR’ (१,२३० कोटी रुपये) या चित्रपटालाही रणवीरच्या चित्रपटाने धुळ चारली आहे. (Box Office Collection Of Dhurandhar worldwide)

तसेच, ‘KGF: Chapter 2’, ‘जवान’ यांसारख्या ‘धुरंधर’च्या तुलनेनेबिग बजेट असणाऱ्या चित्रपटांनाही मागे टाकून बॉलिवूडच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. जागतिक आकडेवारी पाहिली तर, सध्या ‘धुरंधर’ हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत ‘दंगल’ (२,०७०.३ कोटी), ‘बाहुबली २’ (१,७८८.०६ कोटी) आणि ‘पुष्पा २’ (१,७४२.१ कोटी) या तीन चित्रपटांनंतर चौथ्या क्रमांकावर आहे. (Box office collection of dhurandhar in india)
आता वळूयात हिंदी चित्रपटसृष्टीच्या कमाईकडे. तर, ‘धुरंधर’ने ‘पुष्पा २’ या हिंदी वर्जनच्या ८३० कोटींच्या कमाईला मागे टाकत ८३६.५० कोटी कमावले आहेत. आदित्य धरच्या धुरंधरने बॉक्सऑफिसवरचे इतके रेकॉर्ड्स कदाचित एकाही चित्रपटाच्या नावावर नसतील. नुकताच ‘धुरंधर’ने एक असा रेकॉर्ड केलाय जो हिंदी चित्रपटसृष्टीत अशक्यच मानला जात होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाच रेकॉर्ड एका तेलुगू चित्रपटाच्या नावावर होता. तो म्हणजे ‘पुष्पा-२’ (Pushla 2).पुष्पा-२ ने हिंदी डबमध्ये बॉक्सऑफिसवर तब्बल ८३० कोटी रुपये कमावले होते. पण हाच रेकॉर्ड आता ‘धुरंधर’ने मोडला आहे. याव्यतिरिक्त ‘धुरंधर’ने आणखी असे काही रेकॉर्ड्स करून ठेवले आहेत, हे मोडण जवळपास अशक्यच मानलं जात आहे. (Ranveer Singh Movie)

यामध्ये सेकंड, विक, थर्ड विक, फोर्थ विक, फिफ्थ विक असे सलग चार आठवडे सर्वात जास्त कमाई करण्याचा रेकॉर्ड ‘धुरंधरने’केला आहे. यासोबच सलग २७ दिवस डबल डीजीट पैसे कमावले. म्हणजे रिलीजपासून २७ दिवसांपर्यंत धुरंधरचा कमाईचा आकडा १० कोटींच्या खाली आलाच नाही. हा रेकॉर्ड आधी ‘पुष्पा-२’च्याच नावे होता. ‘पुष्पा’ने २१ दिवसांपर्यंत डबल डीजीट कमाई केली होती. आतापर्यंत फक्त तीन हिंदी चित्रपट सिंगल लँग्वेजमध्ये ६०० कोटींचा आकडा टच करू शकले होते. मात्र ‘धुरंधर’ने ६०० कोटी, ७०० कोटी आणि ८०० कोटी असे दोन आणखी क्लब हिंदी मुव्हीजसाठी ओपन केले आणि आता तो ९०० कोटींचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘धुरंधर’च्या दोन्ही पार्टसचं बजेट २५० कोटी आहे. आणि जर का पहिल्याच पार्टने १३०० कोटी कमावले आहेत, मग दुसरा पार्ट १९ मार्च २०२६ ला बॉक्स ऑफिसवर काय धुरळा करेल याचा विचारच अंगावर काटा आणणारा आहे.(Dhurandhar 2)
================================
हे देखील वाचा : Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा एनर्जेटीक धमाका!
================================
दरम्यान, यशराज फिल्म्सने ‘धुरंधर’चे एकाच भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरल्याबद्दल कौतुक केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “‘धुरंधर’ हा फक्त चित्रपट नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक क्षण आहे. दिग्दर्शक आदित्य धर आणि जिओ स्टुडिओज यांचे मनापासून अभिनंदन. आदित्य धर यांचा स्पष्ट दृष्टीकोन, धाडसी कथेची केलेली मांडणी आणि कामासाठीची निष्ठा यामुळे भारतीय सिनेमासाठी नवा मापदंड निर्माण झाला आहे. या चित्रपटाशी जोडलेल्या प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञांचेही आम्ही अभिनंदन.”
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi