Namrata Sambherao : नम्रता संभेरावला मिळाला मानाचा झी पुरस्कार

Ranveer Allahbadia ने ढसाढसा रडत मागितली माफी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचे सत्य?
Ranveer Allahbadia सध्या समय रैनाच्या डार्क कॉमेडी शोमध्ये केलेल्या जोक्समुळे बराच चर्चेत आहे. दुर्दैवाने यावेळी त्याच्या लक्षाचे कारण नकारात्मक आहे. कॉमेडी शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल एक अशी टिप्पणी केली ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सर्वत्र गोंधळ उडाला असून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. रणवीरने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली, तर रैनाने वैतागून यूट्यूबवरून सर्व व्हिडिओ डिलीट केले आहेत.(Ranveer Allahbadia Crying Viral Video)

दरम्यान रणवीर इलाहबादिया एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो ढसाढसा रडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीरच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. त्यात रणवीर म्हणतो आहे की, ‘काम थांबलं म्हणून मला वाईट वाटतंय.’ इंडियाज गॉट लेटेंट’ वरील ‘आक्षेपार्ह’ वक्तव्यावरून वाद वाढत असतानाच युट्यूबर आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर इलाहबादिया यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो रडताना दिसत आहे. या क्लिपमध्ये बिअरबिसेप्स नावाने ओळखला जाणारा इलाहबादिया कॅमेऱ्यासमोर रडताना सर्व हरवलेल्या कामाबद्दल बोलताना दिसत आहे. ही क्लिप सोशल मीडियावर शेअर करण्यात आली असून युट्युबरला शोमधील आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये रणवीर पांढरा टी-शर्ट परिधान करून कॅमेऱ्याकडे बघत म्हणतो, “मला वाईट वाटते कारण सर्व काही थांबले आहे. मला फक्त माझाच दोष आहे असे वाटते.

माझ्यामुळे सगळी संपूर्ण टीमच कामं थांबल आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट‘वरील टिप्पणीनंतर शोवर झालेल्या टीकेनंतर रणवीरने आपली चूक मान्य केल्याचे हे उदाहरण असल्याचा दावा करत ही क्लिप शेअर करण्यात आली आहे. पण तस नसून हा व्हिडिओ जुना असून 2021 चा आहे. रणवीरने कोविड दरम्यान हा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने हा व्लॉग अपलोड केला आहे. रणवीरच्या अचानक पॉझिटिव्ह रिझल्टमुळे सर्व प्रोजेक्ट्स 14 दिवस थांबवावे लागले आणि नंतर तो खूप भावूक झाला होता.
=================================
=================================
खरं तर रणवीरमुळे त्याच्या टीममधील अनेकांना कोविडचा धोका होता. त्यावेळी तो त्याच्या दैनंदिन जीवनाविषयी व्लॉग बनवत असे, पण सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ त्याच्या नुकत्याच झालेल्या वादानंतरचा वाटतो, जे खरे नाहीये.
दुसरीकडे समय रैनाने च्या शो विषयी एक पोस्ट केली होती ज्यात त्याने लिहिल आहे की, ‘मी माझ्या चॅनेलवरून ऑल इंडियाज गॉट टॅलेंट व्हिडिओ काढून टाकले होते. माझं एकमेव ध्येय होतं लोकांचं मनोरंजन करणं आणि चांगला वेळ घालवणं. मी सर्व यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे वचन देतो.’