Karishma Kapoor : संजय कपूरची ३० हजार कोटींची प्रोपर्टी कुणाला

Dilip Prabhavalkar : ‘कांतारा’ चित्रपटाची Vibe देणारा ‘दशावतार’!
मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आल्याचं चित्र दिसतंय… कायमच मराठी प्रेक्षकांची अशी मागणी असते की मराठी चित्रपटांमधून आपली संस्कृती किंवा आपल्या मातीशी जोडल्या जाणाऱ्या कथा या मोठ्या पडद्यावर मांडल्या गेल्या पाहिजेत… खरं तर मराठी चित्रपट हे कथांमुळे समृद्ध आहेत… उत्कृष्ट लिखाणामुळे अगदी जगभरातही मराठी कलावंतांचं कौतुक नक्कीच केलं जातं… आणि आता पुन्हा एकदा मराठी मेकर्स आपल्या मुळांकडे म्हणजेच महाराष्ट्रातल्या गावांतील काही जुन्या परंपरांकडे वळले असून प्रेक्षकांपर्यंत आता आपली संस्कृती चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे… याचंचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे ‘दशावतार’ चित्रपट… ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना थिएटरकडे मोठ्या संख्येने खेचून आणणार यात शंकाच नाही… चला तर मग जाणून घेऊयात या दशावतार चित्रपटात आहे तरी काय?… (Dashavatar Marathi Movie)

तर, पावसाळा संपून जरा हिवाळ्याची चाहूल लागली की प्रामुख्याने कोकणात जत्रा, उत्सव सुरु होतात… आणि त्यातही मंदिरातील जत्रा म्हणजे तळकोकणाची एक वेगळीच ओळख… पिढ्या दर पिढ्या सुरु असणाऱ्या या जत्रा किंवा उत्सवांचे एकच उद्देश आहे ते म्हणजे या निमित्ताने गावकऱ्यांनी एकत्र येत उत्साह साजरा केला गेला पाहिजे… यातीलच एक प्रमुख प्रकार म्हणजे दशावतार… कोकण आणि दशावतार हे वेगळंच समीकरण आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही कोकणातील लोककला अजूनही जपली गेली आहे ती या कलाकारांमुळेच. (Entertainment News)

दशावतार म्हणजे भगवान विष्णूचे दहा अवतार. कर्नाटकातील यक्षगान परंपरेशी काहीअंशी साधर्म्य असल्यामुळे याची पाळंमुळं दक्षिणेत रूजलेली असावीत असं मानलं जातं. कोकणातील दशावतार पाहण्यासाठी फक्त कोकणी माणूसच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती उत्सुक असतेच… कोकणातील या दशावतारात विष्णूचे दहा अवतार मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशूराम, राम, कृष्ण, कलकी आणि बुद्ध असे वेगवेगळे अवतार नाटकात दाखवले जातात. दशावतार रंगमंचावर सुरू होण्याआधी रंगमंचामागे #गणपती आणि कलाकारांच्या साहित्यांची आरती आणि पुजा केली जाते. आणि गेली अनेक वर्ष दशावतार सादर करणारे कलाकार पुढच्या पिढीकडे हा वारसा देत आहेत हे विशेष…

आता दिलीप प्रभावळकर यांच्या आगामी दशावतार या चित्रपटात हीच लोककला आपल्याला दिसणार आहे… ऋषभ शेट्टीच्या कांतारा चित्रपटाची आठवण करुन देणारा हा चित्रपट आपल्या मातीशी जोडला गेला असून; आपल्या संस्कृती आणि परंपरेविषयी माहिती सांगत समांतर एक रहस्यमय घटना चित्रपटात दाखवण्यात आली आहे… प्रेक्षक कायम मराठी किंवा हिंदी चित्रपटांची तुलना दाक्षिणात्य चित्रपटांशी करताना दिसतात, त्याचं कारण असं की चित्रपचाची कथा किंवा पठडी कोणतीही असो साऊथ फिल्म मेकर्स कधीच आपली संस्कृती विसरत नाहीत… अगदी वेशभूषेपासून ते जत्रा, देवांचे उत्सव या सगळ्यांचं दर्शन ते चित्रपचातून करताना दिसतातच… त्यामुळे आता मराठी चित्रपटानेही काहीअंशी हीच संकल्पना आत्मसात केल्याचं दशावतार या चित्रपटातून नक्कीच दिसून येत आहे…
================================
हे देखील वाचा : ‘श्वास’ फेम Ashwin Chitale ‘या’ कारणामुळे अभिनयापासून लांब
=================================
याशिवाय, भावना, रुढी परंपरा, पारंपारिक लोककला आणि आधुनिक आव्हानांचा खेळ चित्रपटातून मांडण्याचा दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी प्रयत्न केला आहे…तसेच, पहिल्यांदाच दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर आणि भरत जाधव हे तीन दिग्गज कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत… त्यामुळे साऊथ किंवा हिंदी चित्रपटांप्रमाणे मल्टीस्टारकास्ट मराठीतही पुन्हा सुरु झाली आहे असंही सुखद चित्र नक्कीच दिसतंय… त्यामुळे आता दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार चित्रपट प्रेक्षकांना किती भावतो आणि पुन्हा Back to the roots या मराठी चित्रपटांच्या ट्रेण्डला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi