Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Dilip Prabhavalkar : हसवाफसवी आणि डॉ. लागूंचं ‘ते’ पत्र!
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांचा हौशी रंगभूमीपासून सुरु झालेला अभिनयाचा प्रवास आजही अविरतपणे सुरु आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका खरंतर आजच्या नवोदित कलाकारांसाठी अभिनयाचं पुस्तक आहे असं म्हणावं लागेल. विनोदी, गंभीर, खलनायक अशा वेगवेगळ्या अभिनयाच्या आयामांचे दर्शन त्यांनी त्यांच्या सादरीकरणातून आजवर दिलं आहे. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ मधील आबा असो किंवा ‘चौकट राजा’ मधील गतिमंद नंदू किंवा मग खलनायक तात्या विंचू, प्रभावळकरांनी नाविन्य कायम देण्याचा प्रयत्न केला. आता वर उल्लेख केलेली पात्र ही वेगवेगळ्या चित्रपटातील होती पण एकाच नाटकात दिलीप प्रभावळकर यांनी ६ पात्र साकारली होती; ते नाटक होतं ‘हसवा-फसवी’. याच नाटकाचा एक खास किस्सा जाणून घ्या…(Marathi tadaka)

रंगभूमी म्हटलं की ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू (Dr Shreeram Lagoo) यांचं नाव अग्रस्थानी येतं. लागूंनी साकारलेले ‘नटसम्राट’मधील (Natasamrat) अप्पासाहेब बेलवणकर आजही जीवंत भासतात. तर लागू एकदा दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांच्या ‘हसवा-फसवी’ या नाटकाच्या प्रयोगाला गेले होते आणि चक्क त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहात होते. दिलीप प्रभावळकर यांनीच हा भावूक किस्सा सांगितला होता. (Marathi actors untold stories)
==========
हे देखील वाचा :Bharat Jadhav : मराठी मनोरंजनसृष्टीतला ‘श्रीमंत’ कलाकार!
==========
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागूंचं ते पत्र मला राष्ट्रीय पुरस्काराइतकच महत्वाचं!
मराठी रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक, नाट्यकर्मी यांनी कायम नवनवीन प्रयोग केले आणि ते प्रेक्षकांना आवडले देखील. असाच एक वेगळा प्रयोग दिलीप प्रभावळकर यांनी हसवाफसवी या नाटकाच्या माध्यमातून केला होता. ज्यात त्यांनी विभिन्न ६ पात्र साकारली होती. या नाटकाचाच खास सांगताना ते म्हणाले होते की,“ ‘हसवाफसवी’ नाटक म्हणजे नाटक कसे लिहू नये याचा एक आदर्श वस्तुपाठ होता. पण माझ्यातल्या लेखकाने माझ्यातल्याच नटासाठी लिहिलेली की एक कलाकृती होती. मी एकाचवेळी दोन-तीन भूमिका करु शकतो याची मला जाणीव झाली होती. त्यामुळे स्वत:लाच आव्हान देण्यासाठी मी एकमेकांशी संबंध नसलेली ६ पात्रं लिहिली. आणि अनपेक्षितपणे त्या नाटकाला यश मिळाले, त्याचे ७५० प्रयोग झाले. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, पु. ल. देशपांडे आले. सत्यजित दुबे तर त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन आले. पण मला डॉ. लागू आल्यामुळे जरा भीती वाटत होती. मी विचार करत होतो की लागूंसारख्या कलाकारांना हे विनोदी नाटक कसं वाटेल. पण ते हसवाफसवी या माझ्या नाटकाच्या प्रेमात पडले. आणि त्यांनी मला एक पत्र लिहिलं, त्यात त्यांनी लिहिलं होतं की, हसवाफसवीचा प्रयोग पाहणं म्हणजे अभिनयाचा वर्षभराचा अभ्यासक्रम पुर्ण करण्यासारखे आहे. त्यांच्या परवानगीने मी ते पत्र छापलं पण होतं”.(Dilip Prabavalkar)

दिलीप प्रभावळकर यांच्या असंख्य भूमिका अजरामर आहेत त्यापैकी एक म्हणजे ‘चौकट राजा’ मधील नंदू. पण तुम्हाला माहित आहे का आधी दिलीप प्रभावळकर नाही तर अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांना ती भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण काही कारणामुळे परेश रावल यांनी नकार दिला आणि स्मिता तळवलकर यांनी प्रभावळकर यांच्याकडे ती भूमिका दिली. प्रभावळकरांनी त्या संधीचे सोनं करत चौकट राजातील नंदूच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं.