Madhugandha Kulkarni मधुगंधा कुलकर्णीने केले, हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’चे भरभरून
Dimple Kapadia : डिंपल कापडिया सूडनायिका
डिंपल कापडिया म्हणताच “बाॅबी” आणि “बाॅबी” म्हणताच Dimple Kapadia हेच घट्ट समीकरण डोळ्यासमोर येतेच. काही भूमिका कलाकारांना कायमची ओळख देतात. यात तिचं ग्लॅमरस रुपडं, पहिल्याच चित्रपटातील जबरा आत्मविश्वास, राज कपूरने आपल्या दिग्दर्शनात तिला पहिल्याच चित्रपटात दिलेली लक्षवेधक भूमिका आणि त्यात तिचा बोल्ड लूक, तिचा उत्फूर्त अभिनय असे सगळेच येते. चित्रपटाला पन्नास एकावन्न वर्ष होऊनदेखील तो आजही तारुण्यात आहे. ही किमया Raj Kapoor व डिंपलची. (राज कपूरने हा चित्रपट आपल्यासाठी निर्माण केला नाही असे ॠषि कपूरनेच अनेक मुलाखतीत स्पष्ट केलेय.)
“Bobby” (१९७३) निर्मितीच्या अखेरच्या टप्प्यात असतानाच डिंपल सौ. राजेश खन्ना (Dimple Kapadia) झाली ही गोष्ट चित्रपटाच्या वाटचालीतील एक सांस्कृतिक धक्काच. लगेचच तिने प्रयाग राजच्या दिग्दर्शनातील इन्सानियत (त्यात मधु नावाची नायिका आली) आणि पाप और पुण्य (शर्मिला टागोर नायिका) हे Shashi kapoor सोबतचे दोन्ही चित्रपट सोडले आणि वांद्र्यातील कार्टर रोडवरील आशीर्वाद बंगल्यात संसारात रमली… पुढे अनेक घडामोडी घडल्यात.
पण डिंपल कापडिया (वा खन्ना) म्हणताच राज कपूर दिग्दर्शित “बाॅबी”ची सुडौल प्रेमिका, रमेश सिप्पी दिग्दर्शित “सागर” मधील मोना डिसिल्व्हा (‘बाॅबी ‘नंतर बारा वर्षांनंतर याच चित्रपटातून डिंपलने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले), या चित्रपटातील रवि (ऋषि कपूर) व राजा (कमल हसन) आणि मोना यांच्यातील प्रेम त्रिकोणाची गोष्ट अतिशय उत्कट. या तिघांच्या कसदार अभिनय सामन्यात तिघांचेही पारडे जड. डिंपलच्या प्रगती पुस्तकात महेश भट्ट दिग्दर्शित ‘काश‘ (यात पूजा ही व्यक्तीरेखा. हा चित्रपट राजेश खन्ना व डिंपल (Dimple Kapadia) यांच्या खाजगी आयुष्यातील ताणतणावावर असल्याची चर्चा फार झाली. पडद्यावर असं काही आले नाही.)
=============
हे देखील वाचा : Aishwarya Rai : गुणवत्ता सरस तरी गाॅसिप्सने रंगत
=============
गुलजार दिग्दर्शित ‘लेकिन‘ ( पुनर्जन्मावर आधारित या चित्रपटात रेवा ही व्यक्तिरेखा), गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘दृष्टी‘मधील संध्या, कल्पना लाजमी दिग्दर्शित ‘रुदाली‘ मधील शनिचारी, नाना पाटेकर दिग्दर्शित ‘प्रहार‘मधील किरण (डिंपलने वेगळ्या प्रवाहातील चित्रपटातही भूमिका साकारत आपल्यातील अभिनय क्षमतेचा प्रत्यय दिला, या गोष्टीचं म्हणावे तसे कौतुक झाले नाही), एन. चंद्रा दिग्दर्शित ‘नरसिंह‘मधील अनिता रस्तोगी, मेहुलकुमार दिग्दर्शित ‘क्रांतिवीर‘मधील कलमवाली बाई मेघना दीक्षित, शशी कपूर दिग्दर्शित ‘अजूबा‘ या फॅण्टसीमधील रुखसाना खान (या चित्रपटामुळे तिची अमिताभ बच्चनची नायिका होण्याचे स्वप्न पूर्ण झाले ). (Entertainment mix masala)
फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है ‘मधील तारा जैस्वाल, हरिश भोसले दिग्दर्शित ‘हक’मधील वर्षा सिंग वगैरे वगैरे अशी केवढी तरी विविधता दाखवली. (सुभाष घई दिग्दर्शित ‘राम लखन‘मध्ये तिने अगदीच शोपीस भूमिका का करावी?) आपलं अष्टपैलुत्व, आपली बांधिकली तिने अधोरेखित केली. (या साऱ्यावर आपण एक मुलाखत करुयात असे गोरेगाव येथील फिल्मीस्थान स्टुडिओत मुकुल आनंद दिग्दर्शित ‘इन्साफ‘च्या सेटवर मी मराठीत विचारल्यावर तिने क्षणभर विचार केला आणि म्हटलं, नको. मला मुलाखत देण्याचा कायमच कंटाळा येतो… डिंपल अतिशय चांगले बोलते (मढला अक्सा बीचवरील “सागर”च्या शूटिंग रिपोर्टिंगसाठी गेलो असता माहित झाले होते). (Dimple Kapadia)
आणि यातच एक भारी फंडा होता, सूडनायिका.
डिंपलने ॲक्शनपॅक्ड भूमिकेतही छान रंग भरलाय. तडफदार दे मार रोल केलेत. रवींद्र पीपट दिग्दर्शित ‘लाव्हा‘, अवतार भोगल दिग्दर्शित ‘जख्मी औरत’, Raj N. Sippy दिग्दर्शित ‘काली गंगा’ (हा डाकूपट होता), केशु रामसे दिग्दर्शित ‘मेरा शिकार‘ (यात ‘बदले की आग मे’ खुन्नस ठेवणारी बिजली).
‘Zakhmi Aurat’चा मेहबूब स्टुडिओतील मुहूर्त आजही आठवतोय. आपल्याला शीर्षक भूमिका मिळाल्याबद्दल डिंपल (Dimple Kapadia) विशेष खुश होती. मुहूर्त दृश्य चित्रीत होताच फोटोग्राफर्सना भरपूर पोझ दिल्या. मिडियाशी बोलण्यापेक्षा आपल्या कामातून बोलूया हा तिचा बाणा लक्षात असल्यानेच ‘सेटवर काय काय घडले’ यावरचा फोकस महत्वाचा ठरला. त्या काळात अशा सदरांना भारी वाचकप्रियता होती.
इक्बाल सिंग निर्मित “लाव्हा”तील आशा भोसले यांच्या आवाजातील जीने दे ये दुनिया चाहे मार डाले हे गाणे आनंदी आणि विरह अशा दोन मूडमध्ये आहे आणि दोन्हीत डिंपल (Dimple Kapadia) ने उत्तम अदाकारी साकारलीय. हा चित्रपट मुंबईत १८ जानेवारी १९८५ रोजी प्रदर्शित झाला. याला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ही दखल (मेन थिएटर गंगा). म्हणजेच डिंपलने पुनरागमन केले तेव्हाचा सुरुवातीचा हा चित्रपट. आपल्या ग्लॅमरस रुपाचा तिने पडदाभर प्रत्यय देताना “बाॅबी”चे दिवस आठवले. हा टिकवलेला फिटनेस विशेष कौतुकाचा ठरला.
चित्रपटाचे मध्यवर्ती कथासूत्र असे, रिंकू दयाल (डिंपल) हिचं अमरवर (राजीव कपूर) बेहद्द प्रेम आहे. दोघे सुखात आहेत पण अजित वर्माला (Raj Babbar) रिंकू फारच आवडत असते. एक प्रकारे तो तिच्यासाठी प्रचंड वेडापिसाच झालाय. पण ती आपली व्हावी तर अमरचा काटा काढायला हवा. त्यात तो यशस्वी ठरतोदेखील. पण त्याची सगळी तिरकी चाल, कुटील डावपेच, दुष्ट हेतू लक्षात आल्याने रिंकूच्या मनातील ज्वालामुखी (लाव्हा) जागृत होतो आणि मग सुडाचा प्रवास सुरु होतो. डिंपल (Dimple Kapadia) ने व्यक्तीरेखेतील बदल छान साकारलाय. राज बब्बरने बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘इन्साफ का तराजू ‘ इत्यादी चित्रपटात अशा भूमिका साकारल्याने त्याची व्यक्तीरेखा कसे वळण घेणार याचा आपल्याला अंदाज येतोच.
=============
हे देखील वाचा : Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकरची कसदार अदाकारी
=============
डिंपलची सूडनायिका व राहुल देव बर्मनचे संगीत यासाठी “लाव्हा” लक्षात राहिलाय. मात्र त्या काळात हा चित्रपट फर्स्ट शोपासूनच फ्लाॅप ठरला. गाणी मात्र आजही लोकप्रिय आहेत आणि डिंपल (Dimple Kapadia) च्या अदाकारीसाठी ओटीटीवर “लाव्हा” पाहू शकता. जबरदस्त तडफदार अशी तिची सूडनायिका आहे. जख्मी औरत चित्रपटातही तिने जबरा परफॉर्मन्स दाखवलाय. तो चित्रपट सुपर हिट ठरला. चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे असते म्हणून हा चित्रपट जास्त गाजला.