Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

….आणि Lata Mangeshkar आणि सचिन देव बर्मन यांच्यातील मतभेद मिटले!

Akshaya Naik ची मोठी झेप; मराठी मालिकेतून आता थेट हिंदी वेबविश्वात पदार्पण !

‘मला माहीत नाही मी परत येईल की नाही…’ Neha Kakkar

Punha Ekda Saade Maade 3 Trailer : कुरळे बंधू परतले…

Shiv Thakare ‘या’ वर्षी करणार लग्न; स्वत:चं दिली वेडिंग अपडेट

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट;

रणजीत गजमेर यांचे मादल वाद्य आणि त्यावरची R.D.Burmanची बेहतरीन गाणी!

Big Boss Marathi Season 6 च्या घरातील चावी चोराचा रितेश

Rajkumar Rao-Patralekha यांनी लेकीचं ठेवलंय ‘हे’ नाव, हिंदू संस्कृतीशी नावाचं

“Dilip Kumar यांनी पाकिस्तानातच राहाला जावं”; बाळासाहेब असं का म्हणाले

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

डिंपल कपाडिया चा कमबॅक करणारा : सागर !

 डिंपल कपाडिया चा कमबॅक करणारा : सागर !
बात पुरानी बडी सुहानी

डिंपल कपाडिया चा कमबॅक करणारा : सागर !

by धनंजय कुलकर्णी 23/01/2024

आपल्याकडे हिंदी सिनेमा नायिकेच्या वैवाहिक स्टेटस बद्दल प्रेक्षक खूप जागरूक असतात. पूर्वी असा समज होता की, नायिकांनी एकदा का लग्न केलं की, त्यांचे फिल्मी करिअर संपुष्टात येते. काही अंशी हा समज खरा जरी असला तरी अभिनेत्री नूतन, शर्मिला टागोर यांनी तो खोटा करून दाखवला. अभिनेत्री मौसमी चटर्जी तर लग्न केल्यानंतर रुपेरी पडद्यावर दाखल झाली.

बॉलीवूडमध्ये एक अभिनेत्री अशी होती जिने एकच चित्रपट केला आणि लगेच लग्न करून रुपेरी पडद्यापासून दूर झाली आणि नंतर पुन्हा दहा वर्षानंतर तिने कमबॅक केला आणि सुपरहिट ठरली ! कोण होती ही अभिनेत्री ?  ही अभिनेत्री होती डिंपल कपाडिया. ९ जून १९५७ रोजी जन्मलेली डिंपल ‘बॉबी’ चित्रपटाच्या वेळी अवघ्या सोळा वर्षाची कन्या होती. चित्रपट शूट चालू असतानाच तिने सुपरस्टार राजेश खन्ना सोबत लग्न केले. त्यानंतर दोन मुलींची ती आई झाली. परंतु लवकरच वैवाहिक जीवनामध्ये मतभेद निर्माण झाल्याने राजेश आणि डिंपल वेगळे राहू लागले आणि तिने पुन्हा सिनेमात कमबॅक करण्याचा विचार केला. १९८२ साली दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी डिंपल ला ‘सागर’ या चित्रपटासाठी साईन केले. या सिनेमात तिचा नायक ‘बॉबी’ चा ऋषी कपूर होता. सहनायकाच्या भूमिकेत कमल हसन होता. 

डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) सिनेमात परत येते आहे ही त्या काळात मोठी ब्रेकिंग न्यूज होती. साउथ कडील बालू महेंद्रा याने ‘ सदमा’ या चित्रपटासाठी श्रीदेवीच्या जागी डिम्पललाच साइन केले होते परंतु डिंपलने (Dimple Kapadia) प्राधान्य हिंदी सिनेमाला दिले. गंमत म्हणजे ‘सागर’ या सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण झालेली नव्हती. तरीदेखील या सिनेमाची शूट सुरू झाले ! शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांनी गायलेल्या ‘पास आओ ना…’ या गाण्याने चित्रपटाचा मुहूर्त झाला.

तब्बल दहा वर्षानंतर डिंपल कॅमेरा फेस करत असल्यामुळे या गाण्याला भरपूर रिटेक्स झाले.  याच काळात डिंपलने ‘मंजिल मंजिल’, ‘जखमी शेरनी’ आणि ‘ऐतबार’ हे चित्रपट देखील साईन केले.  हे सर्व सिनेमे तिने ‘सागर’ नंतर साइन केले होते परंतु ‘सागर’ या चित्रपटाचे शूट लांबल्यामुळे हे तीनही चित्रपट तिचे सागर पूर्वीच प्रदर्शित  झाले. मात्र ‘सागर’ हा चित्रपट डिंपल (Dimple Kapadia) साठी खऱ्या अर्थाने कमबॅक करणारा सिनेमा होता. 

या सिनेमासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली या सिनेमातील एका दृश्याची आज देखील मोठी चर्चा होते. यात डिंपलने टॉपलेस सीन दिला होता. चित्रपटात जरी तो समुद्रकिनारी वाटत असला तरी तो मुंबईच्या मढ आयलँड जवळील एका स्विमिंग पूल वर चित्रित केला गेला होता. चित्रपटात हा सीन सूर्योदयाच्या वेळी दाखवला असला तरी याचे शूट मध्यरात्री करण्यात आले होते. ही सर्व कमाल कॅमेरा मन एस एम अन्वर यांची होती.

गोव्याच्या न्यायनरम्य लोकेशनवर चित्रित झालेला ‘सागर’ हा सिनेमा  १९८५ सालचा सुपरहिट सिनेमा होता. यातील  डिंपलच्या सुरुवातीच्या समुद्र किनाऱ्यावरून  पळत येण्याच्या शॉट च्या वेळेस चा आर डी बर्मन यांनी बनवलेली धून प्रचंड लोकप्रिय ठरली होती. ‘जलपरी धून’ म्हणून हे लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाची सर्व गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली होती. कथा पटकथा  आणि संवाद देखील त्यांचेच होते. चित्रपटातील ‘सागर किनारे दिल ये पुकारे’ या गाण्याची धून आर डी बर्मन यांनी सचिन देव बर्मन यांच्या ‘ठंडी हवाय लहरा के आये…’ या गाण्यावरून घेतली होती. याच ट्यूनवर बॉलीवूडमध्ये अनेक गाणी बनली आहेत.

============

हे देखील वाचा : वैजयंतीमाला हिला राम और शाम या चित्रपटातून का काढले ?

============

‘या सिनेमात रमेश सिप्पी  यांनी माझ्यापेक्षा कमल हसन आणि डिंपल कापडिया (Dimple Kapadia) यांचे कॅरेक्टर वर जास्त लक्ष देऊन ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केले’ असा आरोप ऋषी कपूर यांनी त्याच्या ‘खुल्लम खुल्ला’ आत्मचरित्रामध्ये केला होता. कमल हसन मात्र या सिनेमानंतर बॉलीवूड मधून गायबच झाले. कारण हा सिनेमा बनायला तब्बल तीन साडेतीन वर्षे लागले. ‘दक्षिणेत चित्रपट निर्मितीमध्ये जे शिस्त असते ती बॉलीवूड मध्ये अजिबात नसते त्यामुळ साउथ कडील अनेक चांगले चित्रपट त्याच्या हातून निसटले’ असे त्याचे म्हणणे होते. डिंपल आणि ऋषी कपूर यांची केमिस्ट्री लोकांना ‘बॉबी’ पासून माहिती होती त्यामुळे चित्रपटाला चांगले यश मिळाले आणि डिंपल या सिनेमात खूप सुंदर दिसली होती. दुर्दैवाने हा त्या दोघांचा शेवटचा चित्रपट ठरला यानंतर पुन्हा ते कधीच एकत्र आले नाही !

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.