Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘आमचा ट्रेलर बघू नका!’; Gondhal चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं प्रेक्षकांना अनोखं आवाहन

 ‘आमचा ट्रेलर बघू नका!’; Gondhal चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं प्रेक्षकांना अनोखं आवाहन
मिक्स मसाला

‘आमचा ट्रेलर बघू नका!’; Gondhal चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं प्रेक्षकांना अनोखं आवाहन

by रसिका शिंदे-पॉल 28/10/2025

आपला पिक्चर जोरदार चालावा आणि प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद द्यावा यासाठी दिग्दर्शक, कलाकार आणि एकूणच कुठल्याही चित्रपटाची टीम जोरदार प्रमोशन करत असते… पण सध्या एका मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चक्क प्रेक्षकांना आमच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहू नका असं म्हटलं आहे… तर, या दिग्दर्शकाचं नाव आहे संतोष डावखर आणि त्यांनी ‘गोंधळ’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर न पाहण्याचं प्रेक्षकांना आवाहन केलं आहे…

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरसोबतच महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला सन्मान देणारे चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अशाच परंपरेचा गाभा उलगडणारा बहुचर्चित ‘गोंधळ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी एक अनोखे आवाहन करत म्हटलं आहे की, “आमचा ट्रेलर बघू नका!”

संतोष डावखर म्हणाले की, “‘गोंधळ’ची कथा, पात्रे आणि कलाकार अतिशय रंजक आहेत; त्यामुळे प्रेक्षकांनी ट्रेलरपेक्षा संपूर्ण चित्रपट थेट सिनेमागृहात बसून पाहावा. प्रत्येक पात्र हळूहळू गूढ उलगडत जाते. नाहीतर चित्रपटातील थ्रिल थोडा २-३ टक्के कमी होऊ शकतो. चित्रपट पाहिल्यानंतरच या कथेचा गाभा, भावना आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा खरा रंग प्रेक्षकांना जाणवेल. ज्यांना चित्रपटाबद्दल काही शंका असतील, त्यांनीच ट्रेलर पाहावा. काही गोष्टी या चित्रपटात अशा आहेत ज्या ७० एमएम पटलावर प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये प्रथमच दिसतील.”

================================

हे देखील वाचा : मराठी मालिकाविश्वातल्या लोकप्रिय जोडप्याच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण 

================================

डावखर फिल्म्स प्रस्तुत ‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके यांसह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट महाराष्ट्रात १४ नोव्हेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Entertainment gondhal marathi movie gondhal movie Marathi Movie santosh davkhar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.