
“मरण पत्करेन पण माफी मागणार नाही”; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर Divya Shindeने केला मोठा खुलासा
मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनमधून घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यावरुन दिव्या शिंदे हिला घरातून बाहेर काढण्यात आले होते. महाराष्ट्रभरात तिचे लाखो चाहते असल्यामुळे काहींनी तिला सपोर्ट केला होता तर काहींनी तिच्या वक्तव्यावर ताशेरे देखील ओढले होते. आता घरातून बाहेर पडल्यानंतर जाहिर पत्रकार परिषद घेत दिव्याने अनेक खुलासे केले आहेत. घडलेल्या घटनेचा अर्धवट व्हिडिओ दाखवल्याचं तिने म्हटलं असून मी जुन्नरी आहे आणि आमच्या हातात बांगड्यांच्या आधी हातात तलवार दिली जाते असं विधान तिने केलं आहे. नेमकं ती काय म्हणाली आहे जाणून घेऊयात… (Divya Shinde Press Conference)

दिव्याने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, “मी त्यांना हजार वेळा सांगितलं तुम्हाला माझ्या गोष्टी कळणार नाहीत. पण, तुम्ही जर मला चिड आणताय, मला Poke करतायतआणि तुम्हाला जर ऐकायचं असेल तर बाहेरच्या जगात मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलावर घेऊन फिरते. याचा अर्थ असा की,मी जुन्नरची आहे. आमच्याकडे हातात बांगड्यांऐवजी तलवार दिली जाते. शृंगारच्या आधी स्वाभिमानाने जगणं शिकवलं जातं. स्वाभिमान हा आमच्यासाठी श्वासापेक्षा महत्वाचा आहे. कारण,माझा जन्म शिवनेरीत झालाय. आम्हाला खरी तलवार घेऊन फिरण्याची गरज नाही, कारण आम्ही संविधान असलेल्या देशात राहतो.” (Divya Shinde Sarkar)
पुढे दिव्या असं देखील म्हणाली की,”तुम्ही जर वैचारिक आहात, तर ती तलवार वैचारिक फिरली जाईल. तुम्ही जर शाब्दिक असाल तर ती तलवार शाब्दिक फिरली जाईल. शिवाय तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर ती तलवार स्वाभिमानासाठी फिरवली जाईल. हा त्या शब्दांचा अर्थ आहे. पण, तो अर्थ समजूनच घेतला नाही. आणि अर्धसत्य महाराष्ट्राला सांगितलं जातंय. मग तुम्ही ती पूर्ण क्लिप दाखवा. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिला निष्काषित करत आहोत. पण, त्यांनी मला निष्काषित केलं नाही.कन्फेशन रुममध्ये मी माझं मत मांडलं की मला हा शो सोडायचा आहे.” (Marathi Big Boss Season)
================================
हे देखील वाचा : Big Boss Marathi Season 6 : टोळीत प्रेमाची खळी खुलणार! रुचिया विशालच्या प्रेमात?
================================
)दिव्याने आपल्या विधानावर ठामपणे पुन्हा एकदा आपलं मत मांडताना म्हटलं की, “मी कुणालाही धमकी दिलेली नाही.जे अर्धसत्य महाराष्ट्राला सांगितलं जातंय, त्याचा अर्थ मी काय समजावा. हे खूप घातक आहे. त्यामुळे मी कोणाचीही माफी मागणार नाही. त्यांनी ती पूर्ण क्लिप दाखवावी.”

आता येत्या काळात कलर्स वाहिनीकडून किंवा ज्या घरातील सदस्यांना तिने धमकी दिल्याचं म्हटलं गेलं होतं त्या तन्वी (Tanvi Kolte), रुचिता (Ruchita Jamdar) यांच्याकडून नंतर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसेच, मराठी बिग बॉसचं हे सहावं पर्व अजून कोणते धमाके करणार हे पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. (Marathi Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi