यामुळे लता मंगेशकर आणि रफी एकमेकांसोबत गात नव्हते…
हिंदी सिनेमाच्या सुवर्ण काळातील साठच्या दशकातील पाच सहा वर्षाचा कालावधी असा होता ज्या काळात लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि मोहम्मद रफी एकमेकांच्या सोबत गात नव्हते. खरंतर साठच्या दशकातील हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त मागणी असणारे गाणारे कलाकार होते. पण रॉयल्टी वरून या दोघांमध्ये मतभेद झाले आणि दोघांनी एकमेकांसोबत काम बंद केले. या रॉयल्टी इशू बाबत खूप काही बोलले जातात. अलीकडे बरीच पुस्तक येत आहेत. त्यात या विषयावर प्रकाश टाकला जात आहे.
हा रॉयल्टीचा अध्याय घडण्यापूर्वी एका लोकप्रिय चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लता आणि रफी यांच्यात तात्कालिक मतभेद झाले होते हे पेल्यातील वादळ होतं का ? कारण यानंतर काही वर्षांतच या दोघांनी रॉयल तिच्या प्रश्नावरून एकमेकांच्या सोबत गाणं बंद केलं होतं. सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘माया’ या चित्रपटातील ‘तस्वीर तेरी दिल में…’ या गाण्याचा रेकॉर्डिंगच्या वेळेला या दोघांमध्ये काहीसा वाद झाला होता. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या ओळी रफी संगीतकार सलील चौधरी यांनी सांगितल्याप्रमाणे भरपूर रिहर्सल करून गायला तयार होते.
या गाण्याचे ओरिजनल बंगाली व्हर्जन लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायले होते. त्यामुळे प्रश्नच नव्हता. परंतु लताने ऐनवेळेला या गाण्यात काही बदल करूयात असे सांगितले. रफीला हे अचानक केलेले बदल आवडले नाहीत. त्यांनी संगीतकार सलील दा यांच्याकडे याबाबत तक्रार केली. पण संगीतकारांनी देखील लताचीच बाजू उचलून धरली. त्यामुळे साहजिकच संवेदनशील रफीच्या मनाला वेदना झाल्या. तिथूनच या लता आणि रफी या दोघांच्या नात्यांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात झाली असं म्हणतात.
अर्थात हेच कारण होतं का ? माहिती नाही पण यानंतर काही वर्षांनी या दोघांनी एकमेकांच्या सोबत गाणं बंद केलं. असं म्हणतात, ‘आई मिलन की बेला’ (१९६४) या चित्रपटातील ‘ओ सनम तेरे हो गये हम प्यार में तेरे खो गये हम’ या गाण्यानंतर दोघांनी एकमेकांच्या सोबत गाणं बंद केला. आणि याच काळात रॉयल्टी चा मुद्दा पुढे आला. हा काय होता हा नेमका इश्यू ? एवढी टोकाची भूमिका का घेतली या दोघांनी ? बरं मतभेद रेकोर्डिंग कंपनी सोबत होते मग हे दोघे एकमेकांसोबत का गात नव्हते ? मोठा इंटरेस्टिंग एपिसोड आहे.
साठच्या दशकापर्यंत रेकॉर्डिंग कंपन्या गाण्याची संबंधित असणाऱ्या गायक, संगीतकार, गीतकार यांना कोणतीही रॉयल्टी देत नव्हते. फक्त गाण्याच्या वेळी ठरलेले पैसे त्यांना मिळत होते. या रेकॉर्ड्स दरवर्षी पुन्हा पुन्हा प्रिंट होऊन मार्केटमध्ये येत होत्या. रसिक देशात आणि परदेशात या रेकॉर्ड्स विकत घेत होते आणि रेकोर्डिंग कंपन्या भरपूर नफा यातून कमवत होत्या. परंतु या कमवलेल्या नफ्यातून एक पैसाही हे गाणे तयार करणाऱ्या टीमला देत नव्हते. त्यावेळी विदेशामध्ये रॉयल्टीच्या कमाईतील ठराविक हिस्सा या टीममधील कलाकारांना देखील मिळत होता. भारतात देखील यावर चर्चा सुरू होती. पण कुणीही तशी मागणी करतच नव्हते. तशी मागणी पहिल्यांदा केली लता मंगेशकर यांनी.
साठच्या दशकाच्या आरंभी संगीतकारांना रॉयल्टी येथील २.५ % रॉयल्टी द्यायला सुरुवात झाली पण गीतकार आणि गायन करणाऱ्यांना एकही पैसा मिळत नव्हता. आता लता मंगेशकरने (Lata Mangeshkar) या विरुद्ध कलेक्टिव्ह संघर्ष करायचा ठरवले. त्यासाठी तिने पहिल्यांदा विचारले मोहम्मद रफी यांना रफी विचारले. कारण हे दोघेच त्या काळातील प्रमुख गायक होते. पण रफी यांचे याबाबत वेगळे विचार होते ते म्हणायचे “आपलं काम गाणं गाण्यापुरतो आहे आणि त्याचे पैसे आपल्याला मिळालेले असतात मग आता पुन्हा आपण पैसे का मागायचे?” लताला अर्थातच रफीचे हे उत्तर पटले नाही. त्या दोघांमध्ये या मुद्द्यावरून भरपूर वाद झाला. मतभेद झाले.
==========
हे देखील वाचा : आईला मुलाच्या मृत्यूची बातमी १३ वर्ष समजलीच नाही…!
=========
या दोघांनी १९६४ सालापासून एकमेकांसोबत गाणं बंद केलं. पुढची चार-पाच वर्षे दोघे एकमेकांसोबत एकही गाणे गात नव्हते. रेकॉर्डिंग कंपन्यांना याचा चांगलाच फटका बसला. हळूहळू चित्रपट निर्मात्यांचा देखील दबाव त्यांच्यावर वाढत गेला आणि रेकॉर्डिंग कंपन्यांनी गायक आणि गीतकार यांना देखील रॉयल्टी देण्याचे ठरवले. नंतर लता आणि रफी १९६८ नंतर पुन्हा एकत्र जाऊ लागले. रफी यांचा तो निर्णय चूक होता की बरोबर हे आपण जज करणे बरोबर नाही. पण रफी यांच्या सुनेने यास्मिन खालिद रफीने एक पुस्तक लिहिले आहे ‘मोहम्मद रफी : माय अब्बा’ या पुस्तकात तिने रफीने खूप भावनिक पातळीवर तो निर्णय घेतला होता असे लिहिले आहे. व्यावहारिक पातळीवर तो चुकीचा निर्णय होता असेही लिहिले आहे. काही असो पण लता आणि रफी यांच्यातील मतभेदामुळे रसिक आणि आपली चित्रपटसृष्टी अनेक चांगल्या युगलगीतांना मुकली हे नक्की. लताचा जीवन आलेख पाहिला तर कायम तिने संघर्ष केलेला दिसतो त्याच मालिकेतील हा एक एपिसोड होता जो तिने जिंकून दाखवला !