Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

“माझा मुलगा पूजाही करतो आणि नमाजही…”, Emraan Hashmi चं विधान चर्चेत
सिरीयल किसर हा टॅग असलेला इम्रान हाश्मी आता लवकरच ‘हक’ (Haq) या चित्रपटातून एक विराळी भूमिका प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे… १९८५ची शाह बानो केस या चित्रपटातून मांडण्यात येणार असून यात अभिनेत्री यामी गौतम शाह बानोची भूमिका साकारणार आहे… नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला… काही लोकांनी चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं तर काहींनी मुस्लिम समाजाचं चुकीचं चित्रण केल्याचे आरोप केले… अशातच इम्रान हाश्मी याने मुलाखतीत माझा मुलगा पूजा करतो आणि नमाजही पठण करतो असं म्हणाला आहे… नेमकं काय म्हणाला आहे इम्रान जाणून घेऊयात…

ANI शी बोलताना इम्रान म्हणाला की, “मी परवीनशी लग्न केलं आहे, जी हिंदू आहे. माझ्या कुटुंबात माझा मुलगा पूजा करतो आणि नमाजही पठण करतो. हीच माझी धर्मनिरपेक्ष संस्कृती आहे, त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून मी ‘हक’ हा हा चित्रपट वेगळ्या नजरेतून पाहतो. प्रत्येकजण त्याच्या धार्मिक श्रद्धा, संस्कारानुसार चित्रपट पाहतो”…इतकंच नाही तर तो असं देखील म्हणाला की हक हा चित्रपट कोणत्याही समुदायाला उद्देशून नाही आहे”….

पुझे बोलताना इम्रान म्हणाला की, “मी या चित्रपटाची पटकथा वाचली आणि एका कलाकाराच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिलं. पण, माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मला लक्षात यायला लागलं की एका समुदायाशी, विशेषतः माझ्या समुदायाशी संबंधित संवेदनशीलता लक्षात ठेवणे किती महत्त्वाचे आहे. मला सावध राहावं लागलं आणि वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागला. या चित्रपटातून मला असं जाणवलं की, चित्रपटाचा उद्देश खूप संतुलित आहे. आम्ही कोणत्याही समुदायावर बोट दाखवत नाही किंवा त्याबद्दल न्याय करत नाही”….
================================
================================
दरम्यान, ‘हक’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, ‘हक’चे दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केले आहे. चित्रपटात यामी गौतम, इम्रान हाश्मी, वर्तिका सिंग, दानिश हुसेन, शीबा चड्ढा, असीम हत्तांगडी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे निर्माते विनीत जैन, विशाल गुर्नानी, जुही पारेख मेहता आणि हरमन बवेजा असून हा चित्रपट येत्या ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi