Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नवीन रंगढंगातील इराॅस थिएटर

 नवीन रंगढंगातील इराॅस थिएटर
कलाकृती विशेष

नवीन रंगढंगातील इराॅस थिएटर

by दिलीप ठाकूर 15/02/2024

पिक्चर भारी असेल तरच डिजिटल युगात मल्टीप्लेक्सचं महागडे काढून ‘मोठ्या पडद्यावर ‘तो एन्जाॅय करतो, अन्यथा डिजिटल युगात ‘वर्क फ्राॅम होम’ तसेच ‘बसल्या जागी कुठेही आपण ओटीटीवर, यू ट्यूबवर पिक्चर पाहतोय’.अशावेळी थिएटर पाहायला जाऊ यात ही कल्पना कशी भारी वाटतेय ना ? नवीन रंगढंगातील इराॅस थिएटर पाहताना मला तेच वाटलं…(Eros Cinema)

गिरगावातील खोताच्या वाडीतील दहा बाय दहाच्या चाळीत लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील सिंगल स्क्रीन थिएटर्स, गल्ली चित्रपट आणि दूरदर्शनवरचा शनिवारचा मराठी व रविवारचा हिंदी चित्रपट एन्जाॅय करीत मोठा होत होतो आणि हा एक जाणवण्यासारखा फरक होता. तो म्हणजे, मॅजेस्टीक, सेन्ट्रल, राॅक्सी, ऑपेरा हाऊस, इंपिरियल, नाझला ज्या सहजतेने जायचो तेच मेट्रो, न्यू एम्पायर, न्यू एक्सलसियर, रिगल, इरॉसला जाताना कपड्यांना इस्री व्यवस्थित आहे ना, शर्ट व्यवस्थित इन केलेय ना, बुटांना पाॅलीश करायला हवेय का हे पाहायचो. कारण ही इंग्लिश पिक्चर्सची हायफाय थिएटर्स. शाळेत इंग्लिशमध्ये काठावर पास होण्याशी घनिष्ठ नाते असल्यानेच या इरॉस, मेट्रोत जाताना केवढा संकोच काही विचारुच नका. आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीतील हा एक महत्वाचा फंडा.

मी मिडियात आल्यावर माझं इराॅसशी नातेसंबंध वाढले. याच कारण, इराॅसच्या दुसर्‍या मजल्यावरील मिनी थिएटर. साधारण पंचवीस तीस पस्तीस वेताच्या अतिशय ऐसपैस आरामदायक खुर्च्या. त्यात एकदा बसल्यावर चित्रपट कितीही फसलेला असला तरी अजिबात कंटाळा येत नसे आणि एकादा पिक्चर चांगला असल्याने त्यात गुंतत गुरफटत गेलो की, त्या खुर्चीत बसलोय तो बोनस वाटे.(Eros Cinema)

इराॅस मिनी थिएटरमधल्या प्रेस शोच्या काही आठवणी सांगायला हव्यात. ‘काफिला’ नावाच्या चित्रपटात असलेला उदय टीकेकर शो संपताच आम्हा सिनेपत्रकारांना भेटायला आल्याचे मला आजही आठवतेय आणि विशेष म्हणजे याचे त्याला आजही कौतुक आहे. सतीश कुलकर्णी निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘गंमत जमंत’च्या (१९८७) प्रेस शोला वर्षा उसगावकर आपल्या आईसोबत आवर्जून हजर होती हे आठवतेय. ‘वंडरगर्ल’ अशी तिला त्याचवेळी उपाधी दिल्याने तिची उपस्थिती लक्षवेधक ठरली. संजय दत्त, नम्रता शिरोडकर, रिमा लागू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘वास्तव’चा (१९९९) प्रेस शो संपल्यावर आम्हा समिक्षकांचे मत जाणून घेण्यास दिग्दर्शक महेश मांजरेकर आला होता. त्याला विलक्षण कुतूहल होते की, आम्ही समिक्षक त्याच्या चित्रपटावर काय बोलतोय. (Eros Cinema)

‘वास्तव’ संपून आम्ही बाहेर यायला आणि महेश मांजरेकर यायला, एकच गाठ पडल्याने त्याला आमच्या चेहर्‍यावरुनच समजले की, चित्रपट आम्हाला आवडलाय. राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘घायल’च्या (१९९९) प्रेस शोच्या मध्यंतरमध्ये चित्रपटाच्या पीआरओकडून हळूच निरोप मिळाला, सिनेमा संपल्यावर सनी देओलने काही निवडक समिक्षकांसाठी मागच्याच तारांकित हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे तेव्हा थांब. असं थांबल्याने सनी देओलची भेट घेता आली. तोच यजमान असल्याने आम्हा प्रत्येकाला भेटला. चित्रपट कसा वाटला वगैरे त्याने आवर्जून विचारले. सनी देओलची ही भेट अनपेक्षित आणि सुखावह. दिग्दर्शक रामगोपाल वर्माचे इराॅस अतिशय फेवरेट. त्याचे रंगीला, मस्त, सत्या, जंगल येथेच मेन थिएटरला रिलीज झाले. रंगीला व सत्या आजही सुपर हिट आहेत. (Eros Cinema)

अरुणा विकास दिग्दर्शित ‘गहराई’, विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘राज’, मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘कार्पोरेट’ , प्रियदर्शन दिग्दर्शित ‘विरासत’ हे इरॉसचे विशेष उल्लेखनीय हिंदी चित्रपट. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ ( २००१) पाहायला पहिल्याच आठवड्यात दिलीप वेंगसरकर याच इराॅसमध्ये ‘लगान’ पाहायला आला त्याची मोठी बातमी झाली. इराॅसबाहेर एका इंग्रजी वृत्तवाहिनीची भली मोठी व्हॅन उभी होती हे आठवतेय. ती लाईव्ह न्यूज ठरली. शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या भूमिका असलेला ‘फायर’ या चित्रपटांचे मेन थिएटर इराॅस हे होते. तेव्हा शिवसेनेने आंदोलन करुन हा चित्रपट बंद पाडला होता. इराॅसच्या मिनी थिएटरमध्ये कधी सकाळी इंग्रजी चित्रपटाचे प्रेस शो असत तर कधी सेन्सॉरसाठीचेही शो होत. म्हणजे याचा कार्यविस्तार खूप होता.

इराॅस इंग्लिश चित्रपटांसाठी विशेष होते. टाॅवरिंग इन्फर्मो, एन्टर द ड्रॅगन, समर ऑफ 42 असे अनेक इंग्लिश चित्रपट येथेच हिट. इराॅस आणि मराठी चित्रपट हा अतिशय दुर्मिळ योग. तरी कुमार सोहनी दिग्दर्शित ‘एक रात्र मंतरलेली’ हा रहस्यरंजक चित्रपट तेथे सकाळच्या मॅटीनी शोला रिलीज झाला. महेश कोठारे दिग्दर्शित ‘चिमणी पाखरं’ (२००१) या यशस्वी मराठी चित्रपटाचा एक खास खेळ नियमित शोला आयोजित करण्यात आला होता.(Eros Cinema)

इराॅसला पिक्चर हाऊसफुल्ल असल्यावर ब्लॅक मार्केटमध्ये तिकीट मिळतेय का याकडे कान द्यावा लागे आणि आवाजावर डोळे लावून त्या दिशेने जावे लागे. पण समोरच्या कार पार्किंगमधील सॅन्डवीचवाल्याशी परिचय वाढला की किमान एक तिकीट एक्स्ट्रात मिळे. अचानक एके दिवशी समजले इरॉसमधील चित्रपट खेळ थांबवलेत. इरॉसच्या मुख्य दरवाजाबाहेर निळे पत्रेही लागले. अशा वेळी उलटसुलट बातम्या पसरतात. ते बंद झालेय, त्यात माॅल होतोय वगैरे वगैरे. पण तसे काहीच नसून काही बदलांसह छान नूतनीकरण होतेय अशी पक्की खबर मला असल्याने मी गप्प राहिलो. पुन्हा कधी सुरु होतेय याची वाट पाहिली. अखेर शुक्रवारी ते ‘तेरी बातों मे ऐसा उलझा दिया ‘ या चित्रपटाने ते नवीन स्वरुपात सुरु होत असल्याचे समजताच बोरिवलीवरुन निघून सकाळीच इरॉसला साडेनऊ वाजता पोहचताच ‘नवीन इरॉसचे पहिले तिकीट काढणारा मी पहिला चित्रपट रसिक ठरलो’. आयनॉक्सचे सीओओ चंद्रेश यांनी माझे आवर्जून स्वागत केले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, मराठी वृत्तपत्रात याची विशेष बातमी झाली.(Eros Cinema)

इरॉस १५ फेब्रुवारी १९३८ रोजी सुरु झाले. म्हणजेच आताच ८६ वर्ष पूर्ण होत आहेत. तात्कालिक पारशी व्यापारी शिवावक्स कावसजी कंबाटा यांच्या मालकीच्या जागेवर वास्तुविशारद सोहराबजी भेदवार यांनी थिएटर डिझाईन केले. इरॉस हे नाव ग्रीक देवतेच्या नावावरुन बेतले आहे.
काळ बदलला. चित्रपट वितरण, मार्केटिंग व प्रदर्शन यात फरक पडत गेला. आता कार्पोरेट युग रुजलय. त्यात भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रीमियम सिनेमा प्रदर्शक पीव्हीआर आयनॉक्स ओळखले जाते. त्यांनीच ‘ आयनॉक्स इरॉस’ असे नवीन नामकरण केले. मुळात बाल्कनीसह १२०० सीटस होत्या. आता बाल्कनी नाही. दुसर्‍या मजल्यावर थिएटर असून आता ३०५ प्रशस्त आसनक्षमता आहे. मिनी थिएटर मात्र आता नाही. आता हे लेझर थिएटरसह मुंबईतील पहिल्या स्टँडअलोन आयमॅक्स म्हणून ओळखले जाते. इमर्सिव्ह आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत सिनेमॅटिक अनुभवासाठी अतिशय उत्तम असे आहे. लेझर तंत्रज्ञानासह आयमॅक्स, नेक्स्ट जनरेशन लेझर प्रोजेक्शन आणि मल्टी-चॅनल साउंड सिस्टीम केवळ आयमॅम्स थिएटर्ससाठी खऱ्या अर्थाने इमर्सिव्ह अनुभवासाठी असेल.

============

हे देखील वाचा : रेडिओचे चित्रपटाशी घट्ट नाते…

===========

तांत्रिक भाषेत सांगायचे तर, लेझरसह आयमॅक्स त्याच् ४के लेसर प्रोजेक्शन प्रणालीद्वारे वेगळे केले आहे. ज्यामध्ये एक नवीन ऑप्टिकल इंजिन आणि मालकी आयमॅक्स तंत्रज्ञानाचा एक संच आहे जो क्रिस्टल स्पष्ट प्रतिमा, वाढलेले रिझोल्यूशन, प्रभावी कॉन्ट्रास्ट तसेच स्क्रीनवर उपलब्ध असलेले सर्वात वेगळे, विदेशी रंग प्रदान करतो. विशाल पडदा , लेसर-संरेखित स्पीकर आणि पेटंट केलेले डीएमआर तंत्रज्ञान यामुळेच आपण जणू पडद्यावरच्या जगात वावरतोय असेच वाटते. विशेषत: थ्री डी चित्रपट येथे वेगळाच अनुभव देणारा ठरेल. मी आता तशाच चित्रपटाची वाट पहातोय.(Eros Cinema)

सिनेमाने मूळ आर्ट डेको डिझाइनची भव्यता आयमॅक्सच्या स्केलसह अखंडपणे एकत्रित केली आहे.पिक्चर काय हो, आजकाल कुठेही पाह्यला मिळतोय. गाडीवाले तर बीकेसीमधील ड्राईव्ह इन थिएटरला जाऊन आपल्या गाडीत बसून चित्रपट पाहतात. पण कधी थिएटर पाह्यलाही जावे आणि गेलोच आहोत तर चित्रपट पाहून यावे. ऐवीतेवी हल्ली आवर्जून पहावेत असे चित्रपट असतात तरी किती सांगा? दक्षिण मुंबईतील अगदी जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्समधील ऑपेरा हाऊस काही वर्षांपूर्वी सुरु होताना असाच सुखाचा धक्का दिला होता. आणि आता इराॅस.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.