सिनेमात दोन सुपरस्टार असूनही चर्चा चिंपांझीच्या मर्कट लीलांची!
सिनेमा (Cinema) दोन दोन सुपरस्टार असताना चर्चा मात्र झाली फक्त त्या चित्रपटातील एका माकडाची आणि हे दोन सुपरस्टार मात्र या चित्रपटातील मर्कट लीलांपुढे अक्षरश: झाकून गेले! आणि हे दोन सुपरस्टार कुणी ऐरे गैरे नव्हते. पन्नासच्या दशकातील ते टॉपचे अभिनेते होते. कोण होते ते दोन सुपरस्टार? कोणता होता हा चित्रपट? काय होता हा सर्व प्रकार? हा चित्रपट होता १९५५ साली प्रदर्शित झालेला ‘इन्सानियत’. या चित्रपटात दिलीप कुमार आणि देव आनंद हे दुपार दोन मेगा सुपरस्टार पहिल्यांदाच एकत्र आले होते. या दोघांचा हा एकमेव चित्रपट. यानंतर पुन्हा कधीच हे दोघे एकत्र आले नाही. या सिनेमाचे दिग्दर्शक होते एस एस वासन. वासन साहेब जेमिनी स्टुडिओचे मालक. चाळीस आणि पन्नास च्या दशकामध्ये त्यांचा जबरदस्त बोलबाला होता. १९४८ साली आलेल्या ‘चंद्रलेखा’ या चित्रपटाने संपूर्ण भारतभर त्यांचे नाव प्रचंड लोकप्रिय झाले होते.
‘इन्सानियत’ हा एक पोशाखी चित्रपट होता. या सिनेमात देवानंदचा अवतार अगदी बघण्यासारखा होता. त्याने आयुष्यात पुन्हा कधीच अशा पेहरावातील भूमिका केल्या नाही. या सिनेमात त्याला मिशा चिकटवण्यात आले होत्या. हा चित्रपट तसं म्हणायला गेलं तर प्रेमाचा त्रिकोण होता. देव आनंद दिलीप कुमार आणि बिना रॉय असा तो लव ट्रँगल होता. पण या सिनेमात सर्वाधिक चर्चा झाली या चित्रपटातील माकडाची! वस्तुतः ते माकड नसून एक चिपांझी होता. हा चिपांझी साधासुधा नव्हता तर अमेरिकेतून आणलेला जगप्रसिद्ध चिपांझी होता. त्याचे नाव होते झिपी. हा झिपी अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय होता. अमेरिकेतील टीव्हीवर त्याचे काही शोज देखील झाले होते. हा झिपी चिपांझी स्केटिंग करू शकत होता. पियानो वाजवू शकत होता. तसेच टाईपराईटरने टाईप देखील करू शकत होता असे म्हणतात. त्याकाळी या चिपांझीचे मासिक उत्पन्न ५५००० डॉलर इतके होते.असे सांगितले जाते. खरे खोटे चिपांझीच जाणे! हा सर्व प्रचंड खर्च वासन साहेबांनी उचलला होता. त्यांना आपल्या सिनेमात हा झिपी हवाच होता. झिपीला खास विमानाने अमेरिकेहून मद्रासला आणले गेले. मद्रास विमानतळावर त्याचे स्वागत मोहना या अभिनेत्रीने केले. त्याला हार घालण्यात आला! हार घातल्यानंतर तो मोहनाच्या कडेवर जाऊन बसला आणि त्याने तिला चक्क किस केले! हा फोटो त्याकाळी बऱ्याच वर्तमानपत्रात आला होता. (Cinema)
या सिनेमात (Cinema) यात झिपीवर अनेक शॉट्स चित्रित केले होते. आता या सिनेमाचा (Cinema) मुख्य कॅरेक्टर हा झिपीच झाला होता! त्याच्या पुढे दिलीप कुमार आणि देव आनंद हे मेगा स्टार अक्षरशः झाकाळून गेले होते. या झिपीवर सिनेमात दोन गाणी देखील चित्रित झाली होती ! (या दोन गाण्यांच्या लिंक खाली दिल्या आहेत!) देव आनंद आणि दिलीप कुमार अक्षरशः वैतागले होते. कारण सुपरस्टार असून देखील त्यांना कोणीच विचारत नव्हते. मद्रास मध्ये तर सर्वत्र बोलबाला या झिपीचाच होता. त्याचे कारनामे पाहायला मद्रास मधील लोक स्टुडिओमध्ये गर्दी करत होते. त्याच्यासोबत फोटो काढून घेत होते. झिपी मुले सिनेमाच्या कथानकात वारंवार अनेक बदल केले गेले. या मर्कट लीला मूक पणे पाहण्याशिवाय या दोन मेगा स्टार कडे पर्याय नव्हता! शेवटी एकदाचे या चित्रपटाचे चित्रीकरण संपले आणि या दोन सुपरस्टार्स नी सुटकेचा विश्वास सोडला. ते तातडीने मुंबईला परत आले.
=======
हे देखील वाचा : आर के बाहेरचा राजकपूर
=======
हा चित्रपट प्रदर्शित झाला. झिपीच्या आगमनानंतर थेटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट होत असेल्या तरी सिनेमाला यश अजिबात मिळाले नाही. देव आनंद आणि दिलीप कुमार हे दोन मोठे अभिनेते सिनेमात आणून दिग्दर्शकाने त्यांचा काहीही उपयोग करवून घेतला नाही. हे पुन्हा कधीच एकत्र आले नाही. देव आनंद आणि दिलीप कुमार या सिनेमावर इतके वैतागले होते की त्यांनी हा सिनेमा देखील पाहिला नाही. मद्रास मध्ये तरी या सिनेमाला थोडेसे यश मिळाले पण भारतात या सिनेमाला कुठेही फारसे यश मिळाले नाही!