
Jaat : पुन्हा एकदा साऊथ चित्रपट बॉलिवूडवर पडला भारी!
२०२५ या वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने झाली होती. छावा प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासह या वर्षातील हिंदीतील पहिला चित्रपट ठरला होता ज्याने ५०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमावले होते. यानंतर आलेल्या सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना अपेक्षा होती. पण प्रेक्षकांची निराशा करुन सिकंदर चांगलाच आपटला. सध्या हिंदीत सनी देओलचा जाट आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपट एकमेकांना टक्कर देत आहेत.मात्र, पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटाने मार्केट खाऊन टाकलं आहे. (Entertainment news)
१० एप्रिलला जाट आणि ‘गुड बॅड अग्ली’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. प्रदर्शनापासून ते आत्तापर्यंत अजित कूमारच्या ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. तर सनी देओलच्या जाट चित्रपटाने ७ दिवसांत ५३.९७ कोटींचीच कमाई केली आहे. (Bollywood)
‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २९.२५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे १४ कोटी आणि १९.७५ कोटींचा गल्ला जमवला होता. तर चौथ्या दिवशी २२.२३ कोटी, पाचव्या दिवशी १५ कोटींची कमाई ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने केली होती. ‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार अजित कुमारच्या चित्रपटाने सहाव्या दिवशी ६.५० कोटींचं कलेक्शन केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने १०७.८० कोटींची कमाई केली आहे. (Good Bad Ugly box office collection)

तर जाट चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ७ कोटी, तिसऱ्या दिवशी ९.७५ कोटी, चौथ्या दिवशी १४ कोटी, पाचव्या दिवशी ७.२५ कोटी, सहाव्या दिवशी ६ कोटी, सातव्या दिवशी ०.४७ कोटी कमवत आत्तापर्यंत ५३.९७ कोटी कमावले आहेत. (Jaat box office collection)

सध्याची परिस्थिती पाहता अजित कुमारचा ‘विदामुयार्ची’ चित्रपटानंतर ‘गुड बॅड अग्ली’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, यामुळे ‘सिकंदर’, ‘जाट’ चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे. याआधीही ‘केजीएफ २’, ‘आरआरआर’, ‘बाहुबली’, ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटांनी अनेक हिंदी चित्रपटांना मागे टाकून बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम केला आहे. (Bollywood and Tollywood movies)
===============================
हे देखील वाचा: Kajol : सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट खरंच नाकारला होता का?
===============================
अजित कुमारचा (Ajit Kumar) ‘गुड बॅड अग्ली’ (Good Bad Ugly) हा अॅक्शन कॉमेडी चित्रपट असून दिग्दर्शन अधिक रविचंद्रनने केलं आहे. या चित्रपटात गँगस्टर डॉनची कहाणी दाखवली आहे. या चित्रपटात अजित कुमार आणि तृष्णा कृष्णन मुख्य भूमिकेत झळकले आहेत या चित्रपटात अजित कुमार, तृष्णा कृष्णन व्यतिरिक्त सुनील, अर्जुन दास, प्रिया प्रकाश वारियर, आणि प्रसन्ना महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. (South Indian film)