Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम सोहळा!
Sony Marathi वाहिनीने आपल्या दर्जेदार मालिका आणि कल्पक कथाबाह्य कार्यक्रमांमधून नेहमीच प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. या परंपरेला साजेसा ठरत, ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या रिअॅलिटी शोने प्रेक्षकांच्या हृदयात अल्पावधीतच आपली छाप उमटविली. या कार्यक्रमाला मिळालेला भरभरून प्रतिसाद म्हणजे महाराष्ट्राच्या मनात आजही कीर्तन या लोककलेविषयी असलेली श्रद्धा आणि नाळ अधोरेखित करणारा आहे. कीर्तनकारांचा हा प्रवास हा केवळ एक स्पर्धा नव्हे, तर भक्तीचा, निष्ठेचा आणि परंपरेचा जिवंत अनुभव होता.(Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar Finale)

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या अनेक गुणी कीर्तनकारांमधून आता सहा कीर्तनरत्न अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. आणि हेच सहा कीर्तनकार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत या महाअंतिम सोहळ्यात जो रंगणार आहे रविवारी, ६ जुलै रोजी, आषाढी एकादशीच्या पावन दिवशी, सकाळी ८ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

या विशेष सोहळ्यात ह.भ.प. सोमनाथ महाराज पाटील, प्रमोद महाराज डुकरे, हर्षद महाराज भागवत, सोमनाथ महाराज बदाले, कल्याणी महाराज मोरे आणि लक्ष्मण महाराज लटपटे यांच्यात होणार आहे कीर्तनाची अखेरची भक्तिमय लढत. या सहा रत्नांपैकी कोण बाजी मारणार, हे पाहणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे. विजेत्या कीर्तनकाराला मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेल्या, वीणेच्या रूपातील चांदीची आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे. ही ट्रॉफी केवळ गौरव नव्हे, तर कीर्तन परंपरेच्या समर्पणाचं प्रतीक ठरणार आहे.(Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar Finale)
==============================
===============================
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार‘ या शोमुळे सोनी मराठीने एक मोठी संधी निर्माण केली आहे. जिथे कीर्तन ही केवळ परंपरा नसून, नव्या पिढीच्या भावविश्वाशी जोडणारा सेतू आहे. संतवाणी आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना घरी बसल्या घरी वारीचा, वारकऱ्यांचा आणि अध्यात्माचा अनुभव देण्याचा हा एक सुंदर प्रयत्न ठरला आहे. ६ जुलै सकाळी ८ वाजता आपली वेळ काढून ठेवा ठरवा. कारण त्या दिवशी घरात असणार पंढरपूरची वारी, संतांचा आशीर्वाद, आणि महाराष्ट्राचा नवा लाडका कीर्तनकार!