Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prime Video-Maddock Films ने केली ८ मेगा चित्रपटांची डील!

Amitabh Bachchan : “उभं राहून पॅन्ट घालणंही झालंय अवघड”; वाढत्या

Gharat Ganpati Movie: लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ आता पुन्हा चित्रपटगृहात!

Nashibvan Marathi Serial: नशिबवान मालिकेत अभिनेत्री सोनाली खरे झळकणार खलनायिकेच्या भूमिकेत !

Bin Lagnachi Goshta Trailer: नात्यांचा गोडवा आणि प्रेमाच्या रंगाने रंगलेल्या बिन लग्नाची गोष्ट’ सिनेमाचा

Sunny Deol : “अनेकांना वाटलं ‘गदर’ चालणार नाही, पण…”; स्वत:च्या

Mehmood : फिर वही शाम वही गम वही तन्हाई है…..

Chhaava चित्रपटातील काढून टाकलेला ‘तो’ सीन आला समोर!

Shah Ruk Khan : “राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी एक हात…”

Jolly LLB 3 : अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मराठीशी असलेले छान नाते..!

 मराठीशी असलेले छान नाते..!
कलाकृती विशेष

मराठीशी असलेले छान नाते..!

by दिलीप ठाकूर 07/07/2023

दोन वर्षांपूर्वीची सकाळ झाली तीच अभिनयाचे विद्यापीठ म्हणून कायमच आदरणीय राहिलेल्या दिलीपकुमारच्या निधनाच्या वृत्ताने. मला यावर काही आठवणी सांगण्यासंदर्भात विविध वृत्तवाहिन्यांवरुन पाठोपाठ फोन येत गेले आणि मी दिलीपकुमारचा दर्जेदार अभिनय, त्याने साकारलेल्या विविध प्रकारच्या व्यक्तीरेखा, त्याची अफाट लोकप्रियता यावर बोलत असतानाच आणखीन एक गोष्ट मी आवर्जून सांगितली. ती म्हणजे दिलीपकुमारचे मराठीशी असलेले नाते आणि याबाबत मी अनेक जुन्या आठवणीत गेलो. (Dilip Kumar)

सुलोचनादीदींची सविस्तर मुलाखत घेत असताना एकदा दिलीपकुमारचा विषय निघाला ते आठवले. दिलीपकुमारसोबत त्यानी एस. एच. रवैल दिग्दर्शित ‘संघर्ष’, मनोजकुमार दिग्दर्शित ‘क्रांती’ अशा काही चित्रपटात भूमिका साकारली. त्यावेळच्या अनुभवाबाबत त्या म्हणाल्या, दिलीपकुमार कधीही सकाळची शिफ्ट ठेवू द्यायचे नाहीत. दुपारी दोन ते रात्री दहा अशा शिफ्टमध्ये काम करण्यास प्राधान्य देत. इतकेच नव्हे तर एखाद्या दिवशी अतिशय महत्त्वाचा प्रसंग चित्रित होत असेल तर रात्री दोन वाजेपर्यंतही ते शूटिंग करत. याबाबत त्यांना एकदा विचारले असता ते म्हणाले, उद्या फ्रेश होऊन हा प्रसंग मी केला असता तर अगोदर केलेल्या शाॅटमध्ये फरक वाटला असता. सिनेमात प्रत्येक दृश्याची वेशभूषेपासून अभिनयापर्यंत कंटीन्यूटी असते. तीच जर सांभाळली गेली नाही तर त्या दृश्याच्या आविष्कारावर परिणाम होतो. तो प्रसंग जर संघर्षमय दृश्याचा असेल तर तो एका वेळीच पूर्ण करावा. यातून एक मोठा कलाकार आपल्या कामाचा कसा खोलवर विचार करतो याचाच प्रत्यय येतो.
दिलीपकुमारच्या मराठी नात्याची आणखीन एक गोष्ट आठवली.

नव्वदच्या दशकात सायरा बानूने दूरदर्शनसाठी हिंदी चित्रपट गाण्यांवर एका मालिकेची निर्मिती केली असता दिलीपकुमारच्या वतीने त्यांच्या पाली हिलवरील बंगल्यावर मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांसाठी एका गेटटुगेदरचे आयोजन करण्यात आले होते. स्क्रीनचा फोटोग्राफर पीटर मार्टिसने त्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. दिलीपकुमारच्या कलात्मक आणि बहुचर्चित बंगल्यावर जायचा योग आला यातच आपले नशीब खुलले अशीच आम्हा महाराष्ट्रीय सिनेपत्रकारांची भावना झाली. बंगल्यातील प्रशस्तपणा, त्यातील दिलीपकुमार आणि सायरा बानू यांच्या अतिशय भव्य तस्वीरी हे पाहूनच माझे मध्यमवर्गीय मन दबून गेले. विशेष म्हणजे, आम्हा महाराष्ट्रीय सिनेपत्रकारांशी ते आवर्जून मराठीत बोलले. दुसरे विशेष म्हणजे, त्यांची मेहमाननवाझी ! आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा कशी अदबीने आणि उत्तम उंची टेस्टी खाद्याने पाहुणचार करायचा हे दिलीपकुमारचे अतिशय खास वैशिष्ट्य. हा अनेकांचा अनुभव.

विशेष म्हणजे, दिलीपकुमारला मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, नाटक, चित्रपट याबाबत नेहमीच विशेष प्रेम वाटले. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘एक फूल चार हाफ’ ( १९९१) या मराठी चित्रपटाचे निगेटीव्ह कटिंग दिलीपकुमारच्या शुभ हस्ते झाले. चित्रपट माध्यम व्यवसायातील ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. या धमाल चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुलभा देशपांडे, भावना, सुधीर जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. किमी काटकर पाहुणी कलाकार आहे. रजनीकांतच्या हस्ते गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त झाला. पुरुषोत्तम बेर्डेसाठी ही अगदी खास आठवण, अतिशय खास अनुभव ठरला.

आणखीन एक विशेष गोष्ट आहे, राजकमल कलामंदिर ( युथ विंग) च्या किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ ( १९८८) च्या सुवर्ण महोत्सवी इव्हेन्टसला चित्रपती व्ही शांताराम आणि दिलीपकुमारची विशेष उपस्थिती होती. जुहूच्या एका भव्य पंचतारांकित हाॅटेलमध्ये हा इव्हेन्टसचा अनुभव मी घेतला आहे आणि यानिमित्ताने दिलीपकुमारच्या भेटीचा योग आला. यावेळी ते मराठी चित्रपटसृष्टीचे पाहुणे म्हणून आले होते. यावेळी दिलीपकुमारनी मराठी चित्रपटसृष्टीला मराठीत विशेष शुभेच्छा दिल्या. दिलीपकुमारच्या भेटीने अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे फारच भारावून गेल्याचे दिसले आणि ते अगदी स्वाभाविक होतेच. एकदा पुणे शहरात दिलीपकुमारनी (Dilip Kumar) अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’ ( १९६८) हा चित्रपट पाहून ‘हा चित्रपट आपल्याला असे गुंतवून ठेवतो की वेळ कसा जातो तेच समजत नाही’ असे गौरवोद्गार काढले. त्यामुळे जयश्री गडकर विशेष प्रभावी झाल्या. आपल्या ‘अशी मी जयश्री’ या चरित्रात या गोष्टीचा खास उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर, जयश्री गडकर यांच्या एका भेटीत त्यांच्याकडून हा अनुभव मी ऐकला तेव्हा या क्षणाच्या आठवणीने त्या फार रोमांचित झाल्याचे जाणवले.

मराठी कलाकाराला दिलीपकुमारची (Dilip Kumar) मिळणारी शाबासकी ही कायमच विशेष गोष्ट होती. म्हणून तर दिलीपकुमारबद्दल वृत्तवाहिन्यांशी बोलताना अशोक सराफ भारावून गेल्याचे जाणवले. दिलीपकुमारचे मराठी रंगभूमीवरचे प्रेम कायमच ठळकपणे व्यक्त झाले आहे. त्याच्या बातम्या झाल्या आहेत. मराठी रंगभूमीवरील संशयकल्लोळ, तीन पैशाचा तमाशा, तो मी नव्हेच, घाशीराम कोतवाल, अश्रूंची झाली फुले अशा अनेक नाटकांच्या काही विशेष प्रयोगाना दिलीपकुमारची विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होती आणि अगदी संपूर्ण नाटक अगदी शांतपणे पाहणे. खरं तर अनुभवणे. मध्यंतराला आवर्जून विंगेत येऊन अथवा स्टेजवरुन त्या नाटकातील बारकावे सांगत सांगत प्रत्येक कलाकाराचे कौतुक करणे, त्याना शाबासकी देणे हे त्यांचे वैशिष्ट्य.

विशेष म्हणजे शक्यतो हे भाषण मराठीत करणे आणि छान कौतुक करताना खास उर्दूतील नेमके शब्द वापरुन आपल्या भाषणाला अधिकाधिक उंचीवर नेत, सर्वानाच मंत्रमुग्ध करणे. ‘संशयकल्लोळ’च्या वेळी दिलीपकुमारने आपल्या पाठीवरून कौतुकाचा फिरवलेला हात अशोक सराफच्या आजही लक्षात आहे. त्या क्षणाची नुसती आठवणही त्याला शहारून जाते. म्हणूनच त्याला मी अधूनमधून करुन देत असतो. नव्वदच्या दशकात दिलीपकुमारने काही मराठी कलाकारांसोबत ‘ओ बाबा जान’ या नावाच्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारायचीही तयारी झाली होती. सतिश आळेकर त्या चित्रपटात भूमिका साकारणार होते. दिलीपकुमारने त्यासाठी त्या मराठी कलाकारांची मुंबई उपनगरातील एका तारांकित हाॅटेलमध्ये राहण्याचीही व्यवस्था केली होती. तो चित्रपट प्रत्यक्षात सेटवर न जाताच बंद पडला. पण पुणे शहरात या एकूणच गोष्टीची खूपच चर्चा रंगली. विशेषतः एकदा सायरा बानूने या सर्व मंडळींसाठी एकदा केलेल्या टेस्टी खिचडीची चर्चा पुणे शहरात बरेच दिवस रंगली. हा चित्रपट दुर्दैवाने सेटवर न जाताच डब्यात गेला.

दिलीपकुमारचा (Dilip Kumar) मराठी फंडा बहुस्तरीय आहे. वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले ‘ याच नाटकाच्या मध्यवर्ती कथासूत्रवर आधारित यश चोप्रा दिग्दर्शित ‘मशाल ‘ ( १९८४) या चित्रपटात दिलीपकुमारची भूमिका आहे. मूळ थीम कायम ठेवून अन्य संदर्भ बदलले आहेत इतकेच. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलीपकुमार आणि निळू फुले एकत्र भूमिका साकारण्याचा योग आला.

======

हे देखील वाचा : डाकूपट एन्जाॅय केले जात…

======

ईगल फिल्म निर्मित व उमेश मेहरा दिग्दर्शित ‘किला’ ( १९९८) या चित्रपटात दिलीपकुमारची (Dilip Kumar) दुहेरी भूमिका आहे. एक नायिका रेखा आहे. तर दुसरा दिलीपकुमार स्मिता जयकरचा नायक आहे. स्मिता जयकरने हा चित्रपट साईन करताच मी ‘या सोनेरी संधी’बाबत स्मिता जयकरची अर्धा पान खास मुलाखत घेतली. विशेष म्हणजे, गोरेगावच्या चित्रनगरीतील कोर्ट दृश्याच्या शूटिंगच्या वेळी स्मिता जयकरमुळे मला प्रत्यक्षात सेटवर हजर राहण्याची संधी मिळाली. अभिनयाचे विद्यापीठ दिलीपकुमारला प्रत्यक्षात अभिनय करताना अनुभवायला मिळणे ही तर कमालीची अविस्मरणीय अशी संधी मिळाली. संपूर्ण सेटवर दिलीपकुमारचे अस्तित्व जाणवत होते. एका बाजूला रेखा, पलिकडे स्मिता जयकर आणि आजूबाजूला अनेक ज्युनिअर आर्टिस्ट अशात सगळ्या नजरा अर्थात दिलीपकुमारवर! दिग्दर्शक उमेश मेहराकडून संपूर्ण दृश्य समजून घेऊन मग कॅमेरा नेमका कुठे आहे, त्याची मुव्हमेंट कशी आहे, असे सगळे छोटे छोटे तपशील जाणून घेत दिलीपकुमारने बरीच रिहर्सल करुन मग टेक करते है असे म्हणताच संपूर्ण सेटवर शांतता पसरली. अर्थात, एका टेकवर दिलीपकुमारचे समाधान होणे शक्यच नव्हते. त्यामुळे एकेक टेक वाढत वाढत गेला आणि दिलीपकुमार परफेक्शनिस्ट असल्याने पूर्ण समाधान होईपर्यंत ओ. के. म्हणत नव्हता. त्याचे पूर्ण समाधान होत नव्हते.

अशा महान कलाकारासोबत भूमिका साकारण्याची संधी स्मिता जयकरला मिळाली. दिलीपकुमारला ‘कलिंगा’ (१९९१) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली त्याचा निर्माता सुधाकर बोकाडे महाराष्ट्रीय. दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण होऊन पडद्यावर आला नाही. दिलीपकुमारचा मराठी फंडा असा विविध स्तरावरचा. आपण महाराष्ट्रात राहतोय, मराठी मुंबईत राहतोय हे दिलीपकुमार (Dilip Kumar) कधीच विसरला नाही आणि आपल्याला स्थानिक भाषा येणे आवश्यक आहे याचेही भान त्याने कायम ठेवले. देशाच्या विविध भागांतून मुंबईत आलेल्या अशा अनेक फिल्मवाल्यांना याची जाणीव होणे आवश्यक आहेच. दिलीपकुमार त्यासाठी उत्तम आदर्श आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 16
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 16
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Dilip kumar Entertainment Great Relationship marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.