
Gulkand Trailer: मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’ की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा गोंधळ?
मराठी चित्रपटांचा खरा हिरो आहे कथा… आणि गेल्या काही काळात दर्जेदार कथानकांवर आधारित चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत.. असाच एक नवा प्रयोग गुलकंद या चित्रपटातून करण्याचा प्रयत्न केला गेला आहे… स्वप्नातही विचार केला नसेल अशा जोड्यांचा रॉमेन्स या चित्रपटात दिसणार असून सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित गुलकंद या चित्रपटाचा चवदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांच्यासोबत पहिल्यांदाच या चित्रपटात ईशा डे आणि समीर चौघुले दिसणार आहेत…

‘गुलकंद’ही दोन जोडप्यांची कथा आहे. प्रसाद ओक आणि ईशा डे नवरा बायको आहेत. तर सई आणि समीर चौघुले यांची हटके जोडी आहे. सई-समीरची मुलगी आणि प्रसाद-ईशाचा मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर दुसरीकडे प्रसाद आणि सई यांच्यात लग्नाआधी अफेअर असतं. आणि त्यांच्या मुलांच्या निमित्ताने दोघं पु्न्हा भेटतात. इतक्या वर्षांनी भेटल्यावर प्रसाद आणि सई यांच्यात पुन्हा लफडं सुरु झालंय अशी शंका समीर आणि ईशाला येते. त्यांचा पाठलाग करत असताना काय धमाल उडते हे चित्रपटात पाहायला हवंच.. विनोद आणि इमोशनल अशा दोन्ही भावनांची सरमिसळ प्रेक्षकांना १ मे २०२५ रोजी अनुभवता येणार आहे… (Marathi upcoming films)
===============================
हे देखील वाचा: Sai Tamhankar : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना धुळ चारत सईने केला नवा रेकॉर्ड
===============================
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात या चार कलाकारांसह वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे हे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Marathi films)