Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. १ मे २०२५ महाराष्ट्र दिनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली असून बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी समोर आली आहे. (Marathi movie 2025)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘गुलकंद’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५५ लाख, दुसऱ्या दिवशी २५ लाख, तिसऱ्या दिवशी ४२ लाख, चौथ्या दिवशी ५७ लाख, पाचव्या दिवशी २३ लाख, सहाव्या दिवशी २२ लाख, सातव्या दिवशी १४ लाख, आठव्या २ लाख, नवव्या दिवशी १८ लाख, दहाव्या दिवशी ३७ लाख, अकराव्या दिवशी ३८ लाख, बाराव्या दिवशी २६ लाख, तेराव्या दिवशी १९ लाख कमवत आत्तापर्यंत एकूण ३.९६ कोटींची कमाई केली आहे. (Gulkand movie box office collection)
======================================
हे देखील वाचा: Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!
=======================================
‘गुलकंद’ चित्रपटात सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटात वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांच्याही महत्वपुर्ण भूमिका आहेत. (Gulkand movie cast)