Aamir Khan : ऑगस्टमध्ये ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम सुरु करणार;

Halad Rusali Kunku Hasle Serial: ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा दणक्यात पार पडला लॉन्च सोहळा !
Star Pravah च्या कुटुंबात ७ जुलैपासून हळद रुसली कुंकू हसलं ही नवी मालिका दाखल झाली आहे.’हळद रुसली कुंकू हसलं’ ही गोष्ट आहे दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची आहे. एकीकडे मातीशी घट्ट नातं असलेली, शेतकरी असल्याचा अभिमान बाळगणारी कृष्णा, तर दुसरीकडे शहराच्या वेगात रममाण होणारा आणि ग्रामीण जीवनाविषयी तिटकारा असलेला दुष्यंत. या दोन टोकाच्या व्यक्तिमत्त्वांची भेट घडते, पण… ही भेट एका नव्या नात्याची सुरुवात ठरणार आहे का? दुष्यंतच्या मनात मातीचा गंध घर करतो का? की तो शहराच्या झगमगाटात हरवून जातो? याच उत्कंठावर्धक प्रवासाची गोष्ट आहे ‘हळद रुसली कुंकू हसलं’. (Halad Rusali Kunku Hasle Serial)

या मालिकेचा दिमाखदार शुभारंभ नुकताच पार पडला. कृष्णा आणि दुष्यंत यांनी सुपारी फोडण्याचा खास कार्यक्रम सादर केला, तसेच दोघांनी मालिकेच्या शीर्षक गीतावर खास परफॉर्मन्स करत कार्यक्रमात रंग भरले. कृष्णा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर मालिकेबाबत म्हणाली, “टेलिव्हिजन हे माझं आवडतं माध्यम आहे. दोन-अडीच वर्षांनंतर पुन्हा मालिकांमध्ये परतताना खूप आनंद होत आहे. ‘कृष्णा’ ही भूमिका ऐकताच ती मला भावली. या पात्रामधून बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील. फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्तीपेक्षा कृष्णा वेगळी आहे. शिकलेली नसली तरी शेतीचं उत्तम ज्ञान असलेली, कोल्हापूरच्या मातीतील एक खरा शेतकरी स्वभाव. मेकअपशिवाय लूक ठेवलाय, आणि कोल्हापुरी भाषेचा लहेजा शिकतेय. प्रेक्षकांना हे पात्र नक्कीच आवडेल, अशी मला खात्री आहे.”

तर दुष्यंतच्या भूमिकेत अभिषेक रहाळकर झळकणार आहे. “मन धागा धागा जोडते” नंतर आता ते पुन्हा एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिषेक रहाळकर म्हणाला की, “गेल्या दोन महिन्यांपासून लूकवर काम करतोय. चांगल्या संधी, चांगल्या लोकांसोबत मिळत आल्यात याबद्दल मी स्वतःला नशिबवान समजतो. दुष्यंत हे पात्र माझ्या आधीच्या भूमिकाांपेक्षा वेगळं आहे. प्रेक्षकांनी हे नवं रूप स्वीकारावं हीच इच्छा आहे.”
=============================
हे देखील वाचा: महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून Prajakta Mali ची एक्झिट? नेमक कारण काय…
==============================
या मालिकेत समृद्धी केळकर, अभिषेक रहाळकर, पूजा पवार-साळुंखे, आस्ताद काळे, बाळकृष्ण शिंदे, विद्या संत, अमित परब, रवी कुलकर्णी, माधवी जुवेकर, मृदूला कुलकर्णी, ज्योती निमसे ही कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.‘आई कुठे काय करते’ मालिकेचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवींद्र करमरकर ही मालिका दिग्दर्शित करत आहेत. कसा असेल कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्याचा प्रवास?हे पाहण्यासाठी आपल्याला ‘हळद रुसली कुंकू हसलं’, सोमवारपासून शनिवारपर्यंत, दुपारी १ वाजता, स्टार प्रवाहवर पहाव लागेल.