
Hrithik Roshan ‘बॉलिवूडचा ग्रीक गॉड’ हृतिक रोशन झाला ५१ वर्षाचा
बॉलिवूडमधील अतिशय हँडसम आणि बेस्ट डान्सर अभिनेता कोण असा प्रश्न कोणालाही विचारला तर प्रत्येकाचे उत्तर एकच असेल आणि ते म्हणजे वन अँड ओन्ली हृतिक रोशन (Hrithik Roshan) . आपल्या अतिशय आकर्षक लूकने, प्रभावी अभिनयाने, कमालीच्या डान्सिंग स्किलने ऋतिकने मागील दोन दशकांपासून प्रेक्षकांवर आपले गारुड निर्माण केले आहे. (Hrithik Roshan)
‘ग्रीक गॉड‘ (Greek God Of Bollywood) अशी ओळख असलेला हृतिक रोशन आज त्यांचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधील अतिशय हँडसम अभिनेता अशी त्याची ओळख आहे. हृतिकचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी मुंबईमध्ये झाला. तो सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या वातावरणातच लहानच मोठा झाला. त्यामुळे या या क्षेत्राची भुरळ पाडली नसती तरच आश्चर्य. (Hrithik Roshan Birthday)

हृतिकचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक तर आजोबा रोशनलाल (Roshanlal Nagrath) प्रसिद्ध संगीतकार होते. त्याचे दुसरे आजोबा जे. ओमप्रकाश (J Omprakash) हे निर्माता आणि दिग्दर्शक होते. याशिवाय त्यांचे काका राजेश रोशन (Rajesh Roshan) हे संगीतकार आहेत. हृतिकला एक मोठी बहीण देखील आहे, तिचे नाव सुनैना आहे. हृतिकचे खरे नाव हृतिक राकेश नागरथ आहे. हृतिकने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली. पुढे काही वर्षांनी त्यांनी त्याचे वडील राकेश रोशन यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. (Entertainment Masala Mix)
राकेश रोशन यांच्यासोबत काम करताना त्याला कोणत्याही प्रकारची सवलत मिळाली नाही. हृतिक सुरुवातीच्या काळात सफाई कामगार म्हणून सेटवर काम करायचा. सेटवर झाडू मारणे, साफसफाई करणे ही कामे देखील त्याने केली. सेटवर उपस्थित असलेल्या लोकांना चहा देखील तो द्यायचा. याच काळात त्याने चित्रपट तयार होण्याची सर्व प्रक्रिया अतिशय जवळून पाहिली. (Ankahi Baatein)

हृतिक रोशनला लहानपणापासूनच तोतरेपणाची आणि अडखळत बोलण्याची समस्या होती. स्वतः त्याने एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य केले होते. या आजारातून बरे होण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आणि बरा देखील झाला. या सोबतच त्याला लहान असताना स्कोलियोसिस नावाचा एक आजार झाला होता. डॉक्टरांनी सांगितले होते की, तो कधीच डान्स करू शकणार नाही. मात्र आज हृतिक जागतिक बेस्ट डान्सर्स पैकी एक ओळखला जातो. (Bollywood Masala)
हृतिक रोशनने वडिलांसोबत ‘कोयला’ (Koyla) आणि ‘करण अर्जुन’ (Karan Arjun) या सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. पण त्याला इथेच थांबायचे नव्हते. स्वतःवर मेहनत घेतल्यानंतर त्याने अभिनेता होण्याचे ठरवले. पुढे त्याच्या वडिलांनी राकेश रोशन यांनी २००० साली हृतिकला ‘कहो ना प्यार है’ (Kaho naa Pyar Hain) या चित्रपटातून लॉन्च केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. सिनेमातील गाणी देखील कमालीची गाजली. या सिनेमाने हृतिकला एका रात्रीत स्टार केले. (Bollywood Tadka)

या चित्रपटानंतर मुली तर हृतिकसाठी अक्षरशः वेड्या झाल्या होत्या. त्याला जवळपास ३० हजारांहून अधिक लग्नाचे प्रस्ताव आले होते. या चित्रपटानंतर हृतिकने कधीच मागे वळून पाहिले नाही. हिट, फ्लॉप असे अनेक सिनेमे त्याने बॉलिवूडमध्ये केले. आजही वयाच्या ५१ व्या वर्षी हृतिक कमालीचा फिट आहे. (Hrithik Roshan News)
हृतिकने त्याच्या करियरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका अतिशय प्रभावी पद्धतीने साकारल्या आहेत. ‘फिजा’, ‘मिशन काश्मीर’, ‘कोई मिल गया’, ‘लक्ष्य’, ‘क्रिश’, ‘धूम-2’, ‘जोधा अकबर’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘बँग बँग’, ‘अग्निपथ’, ‘काबिल’, ‘गुजारिश’, ‘सुपर ३०’, ‘वॉर’, ‘फायटर’ सारख्या चित्रपटात त्याने काम केले आहे.
============
हे देखील वाचा : Chandra Barot: ‘या’ गाण्याच्या मेकिंगची भन्नाट कथा!
============
व्यावसायिक आयुष्यामुळे कायम गाजणार ऋतिक काही वर्षांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूपच गाजला. २०१४ मध्ये हृतिकने त्याची पत्नी असलेल्या सुझानशी घटस्फोट घेत १४ वर्षांचा संसार मोडला. हृतिकने २००० मध्ये सुझैनशी लग्न केले होते. त्यांना रेहान आणि हृदान हे दोन मुलं देखील आहेत. हा घटस्फोट बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट समजला जातो. कारण हृतिकने सुझानला ४०० कोटी रुपयांची पोटगी दिली. अशा मीडियामध्ये अनेक चर्चा झाल्या.
घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौतमुळेही हृतिक रोशन अनेकदा वादात सापडला आहे. कंगनाने त्याच्यावर अफेअर करून फसवणूक केल्याचा आरोप केला होता. हृतिक आणि कंगनाचा हा वाद आजही चर्चेत आहे. सध्या हृतिक त्याच्यापेक्षा 17 वर्षांनी लहान अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.