असा पास झाला भारतीय सिनेमातील पहिला ऑफिशियल ‘किस सीन’
भारतात फक्त दोनच प्रकारचे सिनेमे निघतात एक वाईट आणि दुसरा अतिवाईट! अशी मल्लिनाथी करणारा कुणी पाश्चात्य समीक्षक नव्हता तर आपल्याकडीलच एक कलाकार होता तो म्हणजे आय एस जोहर (I S Johar)!
अशी सणसणीत शिवी देणार्या जोहरचे सिनेमे हे दुसर्या गटात मोडणारेच होते. पण अशी वादग्रस्त विधाने करून सतत चर्चेत रहायचा त्याचा हेतू यामुळे साध्य व्हायचा. आजच्या पिढीला कदाचित आय एस जोहर (I S Johar) हे नाव नवीन असेल, पण आजच्या युवा पिढीचा लाडका दिग्दर्शक करण जोहर याचे ते काका होते.
जोहरचा कॉमेडीचा सेन्स मात्र जबरदस्त होता. विनोदी भूमिका साकारताना त्याने कायम विनोदाची डिग्निटी सांभाळली. मूळात तो सिनेमात आला त्यावेळी तो उच्च विद्याविभूषित होता. त्याने साहित्यात आणि राज्य शास्त्रात एम ए केले होते. पाश्चात्य रंगभूमी व चित्रपटाचा त्याचा चांगला अभ्यास होता. अनेक विदेशी चित्रपटातून.(हॅरी ब्लॅक, नॉर्थ वेस्ट फ्रंटीयर ,ऑस्कर विजेत्या ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ त देखील त्याची भूमिका होती.) आणि मालिकांमधून त्याने कामे केली होती. (I S Johar)
साठच्या दशकात त्याने नास्तिक, हम सब चोर है, मिस इंडीया या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. ‘नास्तिक’ या सिनेमातून त्याने फाळणीच्या प्रश्नावर भाष्य केले होते. बी आर चोप्रा त्याचे बालमित्र होते. त्यांच्यासाठी त्याने ‘अफसाना’ची कथा लिहिली. (याचाच रिमेक चोप्रांनी ‘दास्तान’ नावाने केला ज्यात दिलीपकुमारची भूमिका होती!) (I S Johar)
ख्यातनाम दिग्दर्शक यश चोप्रा यांनी देखील सुरूवातीला जोहर यांच्याकडे ‘शागीर्दी’ केली. ‘जॉनी मेरा नाम’ या सिनेमातील त्याचा गाजलेला ट्रिपल रोल त्याला फिल्मफेयर पुरस्कार देवून गेला. ‘शागीर्द’ (१९६७) चित्रपटात तर त्याला मध्यवर्ती भूमिका मिळाली होती. त्यातील ‘बडे मियां दिवाने ऐसे ना बनो’ हे गाणे आजही हसवून जाते. दिलीपकुमार, राजकपूर, देव आनंद, राजेश खन्ना या सुपरस्टार सोबत काम करताना तो कम्फर्टेबल असायचा. त्याच्या विनोदात नैसर्गिक ‘बौद्धिक चमक’ असायची. (I S Johar)
उच्च विद्याविभूषित असल्याने त्याच्या इंग्रजी बोलण्यात सफाई होती. प्रचंड वाचन असल्याने त्याच्या अभिनयात त्याचे वाचन संस्कार दिसायचे! पण तरीही जोहर यांना वादग्रस्त विषयांवर चित्रपट काढायचे ही आवडच होती. १९७१ साली त्यानी ‘जय बांगलादेश’ हा सिनेमा त्यांनी बनवला होता. (I S Johar)
१९७६ साली त्यांनी ‘नसबंदी’ या चित्रपटातून आणीबाणीत केलेल्या कुटुंब नियोजनाच्या सक्तीची यथेच्छ टिंगल उडविल्याने त्यावर चक्क बंदी घातली होती. चित्रपटाप्रमाणेच त्याने रंगभूमीवर वर अनेक वादग्रस्त प्रकरणं आणली होती. (I S Johar)
आय एस जोहर (I S Johar) यांनी त्याच्या एका नाटकातून त्याने पाकिस्तानच्या भुट्टो वर जबर टीका करून ‘हलचल’ निर्माण केली होती! त्यांनी आयुष्यात पाच लग्ने केली आणि पाच घटस्फोटही! त्यांच्या पहिल्या घटस्फोटावर ख्यातनाम पत्रकार खुशवंत सिंग यांनी खुसखुशीत लेख लिहिला होता.
साठच्या दशकाच्या मध्यावर आय एस जोहर यांची हास्य अभिनेता महमूद सोबत जोडी जमली. या दोघांनी मग जोहर महमूद इन .. या सिरीजचा सपाटाच लावला. या सिरीजला बॉब होप आणि बिंग क्रॉस्बी यांच्या रोड टू… ची पार्श्वभूमी होती). याच जोहर महमूदचा ‘इन गोवा (१९६४)’ या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळचा एक किस्सा.
मूळात सेन्सार बोर्डाने ‘गोवा’ या नावालाच आक्षेप घेतला होता. त्यावेळी गोवा नुकताच स्वतंत्र जरी झाला असला तरी भारत सरकारला भारत-पोर्तुगाल सबंध या नावाने बिघडू शकतील अशी शंका आल्याने त्यांनी नाव बदलायला सांगितले (ही इष्टापती ठरली!) मग नावाच्या आधी त्यांनी स्वत:ची नावे टाकली जोहर महमूद इन गोवा. (I S Johar)
जोहर महमूद इन गोवा सुपरहिट ठरला. राजकपूरच्या संगमला तोडीस तोड टक्कर देणारा हा सिनेमा होता. हा सिनेमा गाजला याचे कारण त्यातील बोल्ड चुंबन दृष्य! त्या काळात रूपेरी पडद्यावर अशी दृश्य दाखवणं शक्यच नव्हतं. मग यातील सीन कसा पास झाला? पुन्हा दिग्दर्शक जोहरचे डोके! (I S Johar)
====
हे देखील वाचा: विनोदाचा बादशहा ‘मेहमूद’
====
जोहरने सेन्सार बोर्डाला सांगितले की, यातील नायिका सोनिया सहानी हिने एका पोर्तुगीज मुलीची भूमिका केली आहे आणि त्यांच्या संस्कृती मध्ये चुंबन अजिबात निषिद्ध नाही! जोहरच्या तर्काला सेन्सार बधले आणि भारतीय सिनेमातील पहिला ऑफिशियल ‘किस सिन’ पास झाला. मग असल्या आयडीयांच्या कल्पनांचा सुळसुळाटच झाला. (I S Johar)
जोहरच्याच एका सिनेमात महमूद स्त्री वेषात बसमधून प्रवास करीत असतो. नायिकेला अचानक मूर्छा येते तिला ‘माऊथ टू माऊथ श्वास’ द्यायची जवाबदारी स्त्री वेषातील महमूदवर येते! जोहर यांच्या चुंबनाच्या ‘आयडीया’ साठीच्या या भन्नाट ‘कल्पना’ असायच्या. (I S Johar)
====
हे देखील वाचा: चित्रपटसृष्टीला व्यापून राहिलेला कवी…साहिर लुधियानवी!
====
आय एस जोहर असा अवलिया कलावंत होता. आज १० मार्च! आज आय एस जोहर यांचा स्मृतीदिन आहे. १० मार्च १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.