Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Javed Akhtar घराण्याचा लिखाणाचा वारसा सक्षमपणे सांभाळत यश मिळवणारे गीतकार जावेद अख्तर

 Javed Akhtar घराण्याचा लिखाणाचा वारसा सक्षमपणे सांभाळत यश मिळवणारे गीतकार जावेद अख्तर
कलाकृती विशेष

Javed Akhtar घराण्याचा लिखाणाचा वारसा सक्षमपणे सांभाळत यश मिळवणारे गीतकार जावेद अख्तर

by Jyotsna Kulkarni 17/01/2025

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार, शायर, पटकथाकार, लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) आज त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा करत आहे. जावेद अख्तर यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक सामान्य लोकांना सुपरस्टार केले. त्यांच्या लेखनामुळे भारताला अँग्री यंग मॅन अर्थात अमिताभ बच्चन मिळाले. (Javed Akhtar)

उत्तम गीतकार असलेले जावेद अख्तर हे नेहमीच त्यांच्या सडेतोड उत्तरांमुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे गाजताना दिसतात. मात्र त्यांची खरी ओळख हे त्यांचे लिखाण आहे. साहित्यविश्वात जावेद अख्तर यांचे नाव खूपच मोठे असून या नावाला मोठे वलय देखील आहे. अतिशय उत्तम प्रतिभेचे धनी असलेल्या जावेद अख्तर यांना या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. (Javed Akhtar Birthday)

Javed Akhtar

जावेद यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे प्रसिद्ध कवी जानिसार अख्तर यांच्या घरी झाला होता. त्यांचे शिक्षण लखनऊमध्ये झालं. त्यांचे वडील निसार अख्तर गीतकार-कवी होते आणि आई सफिया शिक्षिका, गायिका, लेखिका होत्या. लिखाणाचे बाळकडू त्यांना लहानपणीच आई वडिलांकडून उपजतच मिळाले होते. (Bollywood Masala News)

एवढेच नाही तर जावेद अख्तर यांचे आजोबा प्रसिद्ध कवी मुझतार खैराबादी हे होते. तर मुझतार यांचे वडील सय्यद अहमद हुसेन हे कवी होते, मुझतार यांची आई हिरमा एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध कवयित्रींपैकी एक होती आणि त्यांचे वडील फझले-एहक खैराबादी हे अरबी कवी होते. (Javed Akhtar Journey)

जावेद यांच्या रक्तातच लिखाण आणि कविता होत्या. त्यामुळे आपसूकच ते देखील याच गोष्टींकडे आकर्षित झाले. जावेद अख्तर यांनी ग्वाल्हेर, लखनौ, अलीगढ आणि भोपाळ दरम्यान भरपूर प्रवास केला. त्यानंतर मायानगरी मुंबईत ते आले. अतिशय मोठ्या आणि प्रतिभासंपन्न घराण्याचा वारसा सोबत घेऊन देखील त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

Javed Akhtar

मुंबईत आल्यानंतर त्यांनी काम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. अशातच त्यांना १०० रुपये महिन्यावर एक लिखाणाचे काम मिळाले. मात्र ते पैसे त्यांना पुरेसे नव्हते. पुढे त्यांनी अजून छोटे मोठे लिखाणांचे काम करण्यास सुरुवात केली. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे राहायला घर देखील नव्हते. अनेक रात्री त्यांनी झाडाखाली चणे खाऊन काढल्या. (Entertainment mix masala)

पुढे खूप प्रयत्नांनी त्यांना कमाल अमरोही यांच्या स्टुडिओमध्ये राहण्यास जागा मिळाली. तिथून त्यांच्या आयुष्याला थोडी स्थिरता आली आणि त्यांनी त्यांचे काम अधिक चांगले आणि प्रयत्न अजून दृढतेने सुरु केले. हळूहळू त्यांना यश आले आणि त्यांनी राजेश खन्ना यांच्या हाथी मेरे साठी सिनेमासाठी पटकथा लिहिली. (Ankahi Baatein)

याचदरम्यान जावेद अख्तर यांची ओळख सलीम खान (Salim-Javed) यांच्याशी झाली. पुढे या जोडीने मिळून तर हिंदी सिनेसृष्टीमधे तर एकच धमाका केला. अंदाज, सीता और गीता, जंजीर, यादो की बारात, डॉन, दोस्ताना, क्रांती, त्रिशूल, शोले, दिवार, शान, मिस्टर इंडिया आदी अनेक हिट चित्रपटांसाठी या जोडीने लिखाण केले. यासोबतच जावेद अख्तर यांनी एक गीतकार म्हणून देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Javed Akhtar

जावेद अख्तर हे व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होत असताना ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील ते पुढे सरकत होते. जावेद अख्तर यांचे पहिले लग्न हनी इराणी यांच्याशी झाले होते. हनी इराणी आणि जावेद अख्तर यांची पहिली भेट १९७२ मध्ये आलेल्या ‘सीता और गीता’ या चित्रपटादरम्यान झाली.

त्यांच्या लग्नाचा किस्सा देखील खूपच वेगळा आणि संस्मरणीय आहे. याबद्दल हनी इराणी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, जावेद अख्तर पत्त्यांमध्ये हरत होते. हनी यांनी ते पाहून जावेद यांना सांगितले की त्या जावेद यांच्यासाठी कार्ड काढून देतील जर त्यांना चालत असेल तर. यावर जावेद अख्तर म्हणाले होते की जर हनी यांनी कार्ड चांगले निघाले तर ते त्यांच्याशी लग्न करतील. सुदैवाने हनी यांनी चांगलाच पत्ता काढला आणि मग जावेद अख्तर हनी यांना म्हणाले, चल आत्ताच लग्न करूया.

पुढे जावेद अख्तर यांनी हनी इराणीसोबत १९७२ मध्ये लग्न केले होते. हनी याही एक पटकथा लेखिका होत्या. यांना फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही दोन मुलं झाली. मात्र त्यांचे लग्न टिकले नाही आणि हनी आणि जावेद या दोघांनी १९७८ मध्ये घटस्फोट घेतला.

पुढे जावेद यांनी १९८४ साली अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्याशी लग्न केले. या दोघांची प्रेमकहाणी देखील खूपच हटके होते. शबाना आणि जावेद अख्तर यांची प्रेमकहाणी शबाना यांच्या घरातूनच सुरू झाली होती. शबाना आझमी यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या लेखक जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले.

Javed Akhtar

शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी हे प्रसिद्ध कवी होते. त्यामुळे त्यांच्या घरी अनेकदा कवी-लेखकांच्या मैफिली रंगायच्या. शबानाही अनेकदा आईबरोबर वडिलांच्या मैफिलींना जायच्या. यादरम्यान जावेद अख्तर यांच्याशी शबाना आझमी यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झाले. (Javed Akhatr Personal Life)

शबाना आणि जावेद अख्तर भेटले तेव्हा जावेद अख्तर हे विवाहीत होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना फरहान आणि झोया ही दोन मुलंदेखील होती. असे असून देखील जावेद अख्तर यांनी शबाना आझमी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शबाना यांच्या आई-वडिलांना वाटत होते की त्यांच्या मुलीने दुसऱ्या महिलेचा संसार मोडून स्वतःचा संसार थाटू नये. परंतु शबाना त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या.

===============

हे देखील वाचा : Sidharth Malhotra मॉडेलिंग, सहाय्यक दिग्दर्शक ते बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा अभिनय प्रवास

Vijay Sethupathi टेलीफोन बूथ ऑपरेटर ते पॅन इंडिया स्टार जाणून घ्या विजय सेतुपतीचा अभिनय प्रवास

===============

पुढे जावेद अख्तर यांनी त्यांची पत्नी हनी इराणी यांच्याशी १९७८ साली घटस्फोट घेतला. पुढे १९८४ मध्ये शबाना आझमी यांच्याशी मुस्लिम रितीरिवाजानी लग्न केले. मात्र शबाना आणि जावेद यांना मुलं नाही. आजही हे दोघं एकत्र असून अनेकदा विविध कार्यक्रमांना सोबत दिसतात. दरम्यान जावेद अख्तर यांना १९९९ मध्ये पद्मश्री, २००७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय जावेद अख्तर यांना ८ वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. शिवाय ते राज्यसभेचे माजी खासदार देखील होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured happy birthday Javed Akhtar Javed Akhtar Javed Akhtar and shabana azmi lovestory Javed Akhtar Birthday Javed Akhtar information Javed Akhtar journey Javed Akhtar news Javed Akhtar personal life Marathi Movie poet Javed Akhtar screenplay writer Javed Akhtar witter Javed Akhtar जावेद अख्तर जावेद अख्तर प्रवास जावेद अख्तर माहिती जावेद अख्तर वाढदिवस जावेद अख्तर वैयक्तिक आयुष्य जावेद अख्तर व्यायसायिक आयुष्य
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.