
Varsha Usgaonkar : मराठी मनोरंजनविश्वातील चिरतरुण सौंदर्य वर्षा उसगांवकर
वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar)…मनोरंजनविश्वातील असे नाव ज्याच्याशिवाय ९० च्या दशकातील मराठी सिनेमांची कोणी कल्पनाच करू शकत नाही. नैसर्गिक सौंदर्य, आकर्षक डोळे, कमनीय बांधा, नृत्यात पारंगत आदी अनेक जमेच्या बाबी असलेल्या वर्षा अभिनयात आल्या नसल्या तरच नवल. घरातून चित्रपटांचा वारसा नसूनही वर्षा यांनी या सिनेसृष्टीत स्वतःचा वेगळाच ठसा निर्माण केला. आज मनोरंजनविश्वतील चिरतरुण अभिनेत्री अशी ओळख असलेल्या वर्षाजी आज त्यांचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे.(Varsha Usgaonkar)
वर्षा उसगांवकर यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९६८ ला ही गोव्यातील उसगाव येथे झाला. या गावावरूनच त्यांचे आडनाव उसगांवकर असे पडले. त्यांचे संपूर्ण शिक्षण गोव्यातच पूर्ण झाले. वर्षा उसगावकर यांना उषा, तोषा आणि मनीषा या तीन बहिणी आहेत. गोवा केंद्रशासित प्रदेश असताना त्यांचे वडील ए .के .एस उसगांवकर सभापती होते. त्यांनी गोवा सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले आहे. घरातील राजकीय वातावरण असूनही वर्षा यांनी मनोरंजनविश्वात करियर करण्याचा निर्णय घेतला. वर्षा यांच्या या निर्णयाला त्यांच्या आईने पाठिंबा दिला. (Varsha Usgaonkar Journey)

वर्षा यांनी अभिनयात करियर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अशातच त्यांना १९८२ साली मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय “ब्रह्मचारी” या नाटकातून त्यांनी अभिनयात पदार्पण केले. पुढे १९८६ साली त्यांनी ‘तुझ्या वाचून करमेना’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी ‘गंमत जम्मत’, ‘हमाल दे धमाल’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘सावत माझी लाडकी’, ‘शेजारी शेजारी’, ‘एक होता विदूषक’, ‘लपंडाव’, ‘अफलातून’, ‘भुताचा भाऊ’, ‘आत्मविश्वास’, ‘आमच्या सारखे आम्हीच’, ‘पसंत आहे मुलगी’ आदी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. मुख्य म्हणजे वर्षा यांची जोडी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन या दिग्गज अभिनेत्यांसोबत कमालीची गाजली.(Entertainment Mix Masala)
केवळ चित्रपटच नाही तर वर्षा यांनी मालिका आणि नाटकांमध्ये देखील त्यांच्या अभिनयाची छाप पडली. १९९० साली हेमा मालिनी यांची निर्मिती असलेल्या दूरदर्शनवरील ‘झांसी की रानी’ मालिकेत राणी लक्ष्मीबाईची भूमिका वर्षा यांनी खूपच प्रभावी पद्धतीने साकारली. या मालिकेसाठी त्यांनी घोडेस्वारी आणि तलवारबाजी यांचे प्रशिक्षण घेतले. पुढे त्यांनी त्यांचा मोर्चा हिंदी चित्रपटांकडे वळवला. (Marathi Top Stories)

हिंदीमध्ये त्यांनी ‘दूध का कर्ज’, ‘हफ्ता बंद’, ‘शिकारी’, ‘तिरंगा’, ‘दिलवाले कभी ना हारे’, ‘साथी’, ‘घर जमाई’, ‘सोने की लंका’, ‘परवाने’, ‘इन्सानियत की देवता’, ‘घर आया मेरा परदेसी’, ‘ पथरीला रास्ता’ आदी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील वर्षा या खूपच गाजल्या. त्यांनी चंद्रकांता, महाभारत, विष्णुपुराण, घर जमाई आदी मालिकांमध्ये काम केले. (varsha usgaonkar Movies)
मराठी मालिकांमध्ये तर वर्षा खूपच लोकप्रिय ठरल्या त्यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या तुफान गाजलेल्या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या. वर्षा यांची कारकीर्द जितकी त्यांच्या कामामुळे गाजली तितकीच त्यांच्या वादांमुळे देखील गाजली. त्यांचा सर्वाधिक गाजलेले आणि चर्चेत असलेला वाद म्हणजे त्यांचे टॉपलेस फोटोशूट.

वर्षा या नेहमीच आपल्या स्टायलिश आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जातात. त्यांनी एका इंग्लिश मॅगझीनसाठी टॉपलेस फोटो क्लिक करत सर्वांनाच धक्का दिला होता. या फोटोशूटमुळे त्यांच्यावर प्रचंड टीकासुद्धा झाली होती. हा वाद चांगलाच गाजला होता. वर्षा या अनेकदा वादांमध्ये अडकल्या होत्या.(varsha usgaonkar Controversay)
वर्षा उसगांवकर यांनी २००० साली फेमस म्यूझिक कम्पोजर रवी शंकर शर्मा यांचा मुलगा अजय शंकर शर्मा यांच्याशी लग्न केले. वर्षा उसगांवकर यांच्या सासऱ्याने सुनेवर आणि मुलावर अनेक गंभीर आरोप केले होते. एवढेच नाही तर त्यांनी त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या दोन मुलींच्या नावावर केली. यानंतर बरीच वर्ष वर्षा उसगांवकर आणि त्यांच्या नणंदेमधील वाद सुरू होते. हेच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात पोहोचला होता. वर्षा उसगांवकर यांच्या सासऱ्याचे निधन २०१२ मध्ये झाले.

वर्षा यांच्या सासऱ्यांनी निधनाच्या आधी केलेल्या मृत्यूपत्रात स्पष्ट म्हटले होते की, ‘माझ्या मुलाने आणि सुनेने माझा सांभाळ केला नाहीये. यामुळेच मी माझ्या सर्व संपत्तीमधून त्यांना बेदखल करत आहे आणि माझी सर्व संपत्ती ही मी माझ्या इच्छिने माझ्या दोन्ही मुलींच्या नावावर करत आहे.’ यानंतर हा वाद थेट कोर्टात देखील जाऊन पोहोचला होता.
याशिवाय वर्षा उसगांवकर यांनी ऑनलाईन मासे विकणाऱ्या वेब पोर्टलची जाहिरात केली आहे. त्या जाहिरातीवरून मोठा वादंग उठला आहे. वर्षा उसगावकर यांनी जाहिरातीत ‘बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले’ असं विधान केलं आहे. त्यावरून मच्छिमारांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर वर्षा यांनी व्हिडिओ शेअर करून समस्त कोळी बांधवांची हात जोडून माफी मागितली होती. (Marathi Latest News)
===========================
===========================
मागच्यावर्षी वर्षा या बिग बॉस मराठीमध्ये देखील दिसल्या. या सीझनमध्ये त्या चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक ठरल्या. या सीझनमध्ये त्यांचे आणि निक्की तांबोळी यांचे अनेक वाद झाले आणि त्यावरून निक्की ट्रोल देखील झाली होती. (varsha usgaonkar Bigg Boss)