स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form) लिहिले होते!
आपल्या देशात काही प्रेम कथा या जनसामान्यांवर अवीट छाप सोडून गेल्या आहेत. आणि ह्या कथेला जर दु:खांत असेल तर त्या आणखी आवडल्या जातात. त्यातील अनेक कथा या काल्पनिक आहेत पण भारतीय समाज मनावर त्या इतक्या छाप पाडणाऱ्या आहेत की पुन्हा पुन्हा त्यावर चित्रपट निर्मिती, नाट्य निर्मिती होत असते. साहित्यात देखील त्यांचा मोठा प्रभाव रहातो. अशीच एक प्रेम कहानी म्हणजे हे हिर-रांझा! 1766 मध्ये सुफी कवी वारीस शहा याने ‘हिर’ नावाचे एक प्रेम काव्य लिहिले होते. याच काव्यावर पुढच्या शतकात अनेक कलाकृती निर्माण झाल्या. चित्रपट नाटक तयार झाले.

17 जून 1970 या दिवशी चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेला ‘हिररांझा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे होते की यातील सर्व संवाद हे काव्यात्मक शैलीमध्ये लिहिले गेले होते आणि बोलले गेले होते. संपूर्ण चित्रपटातील संपूर्ण पात्र आपले संवाद शायराना अंदाज मध्ये बोलत होते हा एक अभिनव प्रयोग होता. यापूर्वी कधीही बॉलीवूडमध्ये असा प्रयत्न झाला नव्हता जेव्हा चेतन आनंद यांनी हीर नावाचे काव्य वाचले आणि यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी संवाद लेखन संपूर्णपणे काव्यात्मक शैलीत सदर करण्याचा निर्णय घेतला.
मनाशी पक्के ठरवले. त्या पद्धतीने त्यांनी अनेक कवी गीतकार यांच्याशी संवाद साधला अनेक जणांनी हा एक धोका आहे आणि असा धोका पत्करू नका असे सांगितले. पण चेतन आनंद आपल्या घेतलेल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी गीतकार कैफी आजमी यांना याबाबत विचारले. कैफी आजमी हे देखील सुरुवातीला साशंक होते. कारण संपूर्ण तीन तासाचा सिनेमा कवितेच्या स्वरूपात लिहून काढायचा हे अवघड काम होतं. नुसतं अवघड काम होतं अशातला भाग नाही प्रेक्षक याला स्वीकारतील की नाही याची देखील त्यांना शंका होती. पण चेतन आनंद यांनी सर्व शंका कुशंका दूर केल्या आणि “तुम्ही संवाद लिहायला सुरुवात करा!” असे सांगितले.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
चित्रपटाची पटकथा चेतन आनंद यांची होती. कैफी आजमी यांनी संवाद दिग्दर्शकाला हव्या त्या काव्यात्म स्वरूपात लिहून काढले . मग पात्र निवड सुरू झाली रांझाच्या भूमिकेसाठी राजकुमार हिरच्या भूमिकेसाठी प्रिया राजवंश यांची निवड झाली. चित्रपटाला संगीत मदन मोहन यांचे होते.इतर भूमिकांमध्ये जयंत, पृथ्वीराज कपूर, विना, प्राण,अजित,जीवन, नान पळशीकर होते. सिनेमाचे च्या चित्रण जाल मिस्त्री यांचे होते.
या चित्रपटातील गाणी आणि संगीत प्रचंड गाजले. सर्वात गाजले मोहम्मद रफी यांनी गायलेले ‘ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही’ मदन मोहन यांची हि ट्यून त्यानी खूप वर्षे आधी बनवून ठेवली होती. या चित्रपटात मोहम्मद रफी ने लता मंगेशकर यांच्या आवाजातील युगलगीत होतं अतिशय सॉफ्ट आणि धीम्या स्वरातील रोमँटिक ‘मेरी दुनिया में तुम आये’ हे गाणं होतं. मदन मोहन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वरबद्ध केलं होतं. लताच्या स्वरातील ‘मिलो न तुम तो हम घबराए मिलो तो आंख चुराये हमे क्या हो गया है’ हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं होतं. लताच्या स्वरातील ’ दो दिल टूट दो दिल हारे’ हे दर्द भरे गाणं क्लास बनलं होतं. मोहम्मद रफी यांच्या स्वरातील ‘तेरे कुचे मे तेरा दीवाना आज दिल खो बैठा’ या गाण्यात राजकुमारचा अभिनय पाहण्यासारखा होता!

काश्मीरमध्ये या चित्रपटाचा शूटिंग झालं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानच राजकुमार यांची भेट त्यांची होणारी पत्नी जेनी हिच्या सोबत झाली. इथेच त्यांचे मनाचे तार जुळले आणि काही दिवसांनी ते विवाहबद्ध झाले. १७ जून १९७० रोजी चित्रपट प्रदर्शित झाला. सुरुवातीला प्रेक्षकांना हा नवीन फॉरमॅट एक्सेप्ट करणं अवघड झालं. पण हळूहळू चित्रपटाला गर्दी वाढू लागली आणि सिनेमा हिट झाला. चेतन आनंद यांचा सर्वात लोकप्रिय आणि ज्याने चांगला बिझनेस केला असा हा चित्रपट म्हणावा लागेल. अभिनेर्त्री प्रिया राजवंश हिचा खर तर हा पहिला चित्रपट असणार होता कारण या चित्रपटाचा प्लॅनिंग खूप आधी म्हणजे १९६० साली सुरू झालं होतं त्यावेळी प्रिया राजवंश लंडनला अकॅडमी कोर्स करायला गेली होती. त्यानंतर तिची भेट चेतन आनंद सोबत झालं. त्यांनी तिला हिर-रांझा या चित्रपटासाठी साईन केलं.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
परंतु नंतर त्यांनी ‘हकीकत हा चित्रपट आधी निर्माण करायचे ठरवले आणि नायिकेच्या भूमिके साठी प्रिया राजवंश ला घेतले. त्यामुळे प्रिया राजवंशचा पहिला चित्रपट ‘हकीकत’ ठरला. यानंतर मात्र चेतन आनंद यांच्या प्रत्येक चित्रपटात प्रिया राजवंश असणं गरजेचं झालं. (हकीकत, हिर रांझा, हिदुस्तान की कसम, हंसते जख्म, कुदरत) या दोघांची प्रेम कहाणी इथूनच सुरुवात झाली. दोघे लिव्ह इन रिलेशन शिप मध्ये राहू लागले. चेतन आनंद यांचा १९९७ मध्ये निधन झाले. आणि नंतर प्रिया चे ग्रह फिरले. प्रॉंपर्टी च्या वादातून २७ मार्च २००० साली तिचा खून करण्यात आला. खूनाचा आरोप चेतन आनंद च्या मुलांवरच होता. केतन आनंद ज्याने ‘हिर रांझा ‘ हा सिनेमा निर्माण केला त्याच्यावरच हिर च्या खूनाचा आरोप होता. आज जेव्हा आपण हा ‘हिर रांझा’ चित्रपट पाहतो तेव्हा त्यातील काव्यात्मक शैलीतील संवाद ऐकून दिग्दर्शक आणि संवाद लेखक यांनी किती मेहनत घेतली होती हे लक्षात येतं. या चित्रपटाच्या सिनेमॅटग्राफर जाल मिस्त्री यांना फिल्मफेअर चा पुरस्कार मिळाला होता!