Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट
हिंदी चित्रपटसृष्टीचे ही-मॅन अर्थात पद्मभूषण धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाच्या बातम्या सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत… काही दिवसांपूर्वी रेग्युलर चेकअपसाठी ते रुग्णालयात गेले होते… मात्र, आता १० नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती… परंतु, आता धर्मेंद्र यांच्या मुलीने ईशा देओल हिने पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं की, “वडिलांची तब्येत ठिक आहे आणि ते रिक्व्हर होत आहेत”, त्यांच्या या पोस्टनंतर लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. (Entertainment News)
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या समोर येताच ईशा देओलने पोस्ट करत लिहिलं होतं की, “माझ्या वडिलांची तब्येत स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की, आमच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा. बाबा लवकर बरे व्हावेत यासाठी केलेल्या प्रार्थनांबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.” (Esha Deol News)

तसेच, हेमा मालिनी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “या गोष्टीसाठी क्षमा नाही! उपचार घेत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार वाहिन्या खोटी बातमी कशी पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरयुक्त आणि गैरजबाबदार वर्तन आहे. कृपया कुटुंब आणि त्यांच्या प्रायव्हसीचा योग्य आदर करा”. (Hema Malini Tweet)

रोमॅंटिक चित्रपटांसोबतच अॅक्शनही करणाऱ्या धर्मेंद्र यांना १९६६ मध्ये रिलीज झालेल्या ‘फूल और पत्थर‘ चित्रपटामुळे अॅक्शन हिरोचा टॅग लागला… मग काय बॉलिवूडच्या या He Man ने त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही… ‘बंदिनी’, ‘सूरत और सीरत’, ‘शोले’, ‘आझाद’, ‘माँ’, ‘अंधा कानून’, ‘गुलामी’, ‘हिंमतवार’,’साजिश’, ‘राम बलराम’, ‘दो दिशायें’, ‘खतरों कें खिलाडी’, ‘नफरत की आंधी’, ‘दुश्मन देवता’, ‘अपने’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारत स्वत:चा ऑरा जपला… (Dharmendra Movie)
================================
हे देखील वाचा : Dharmendra : प्रेम चोप्राच्या भीतीची धर्मेंद्रने केली पोलखोल!
================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi