Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘क्रांती’ सिनेमाच्या सेटवर Hema Malini ने पांढरी साडी परिधान करायला का नकार दिला?
हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या काळात घडलेल्या काही गोष्टी काही घटना आज पुन्हा एकदा वाचल्यानंतर खूप मजा येते. त्या काळातल्या सिने मासिकातून या प्रसंगांचे वर्णन मोठ्या खमंग शैलीमध्ये केलेले असायचे. अभिनेत्री हेमा मालिनी सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात दोन महत्वाकांक्षी चित्रपटात काम करत होती. दोन्ही चित्रपट अतिशय महत्त्वपूर्ण होते आणि बिग बजेट होते. त्यापैकी एक होता मनोज कुमार दिग्दर्शित ‘क्रांती’.

या चित्रपटात दिलीप कुमार पहिल्यांदाच चरित्र भूमिकेतून पुढे येत होते. सिनेमात दिलीपकुमार, मनोज कुमार, शत्रुघ्न सिन्हा, परवीन बाबी, हेमा मालिनी, शशी कपूर, प्रदीप कुमार असे तगडे कलावंत होते. या चित्रपटाची हेमामालिनी प्रमुख नायिका होती. त्याचवेळी ती कमाल अमरोही यांच्या ‘रजिया सुलतान’ या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका करत होती. यात तिने भारतातील एकमेव मुघल सम्राज्ञी रजिया सुलतान (१२०५-१२४०) ची भूमिका केली होती. हा सिनेमा कमाल अमरोही त्यांच्या तब्येतीने बनवत होते. हा सिनेमा बनायला तब्बल सात आठ वर्षे लागली.
‘क्रांती’ चित्रपटाचे आर के स्टुडीओ शूटिंग चालू असतानाच तिकडे कामालीस्तान स्टुडीओ मध्ये ‘रजिया सुलतान’ चा सेट लागला होता. या दोन्ही सिनेमाचं शूटिंग एकाच वेळी चालू होतं आणि दोन्ही सिनेमाची मुख्य नायिका हेमामालिनीच होती. याच काळात तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठी घडामोडी घडणार होती. १९८० सालच्या मे महिन्यात हेमा मालिनी यांनी अभिनेता धर्मेंद्र सोबत लग्न केले. हे लग्न अतिशय गुप्त पद्धतीने झाले. मीडियाला देखील त्याची खबर लागली नाही. इतकंच काय तर लग्नानंतर दुसऱ्या दिवशीच ती शूटिंगला देखील गेली!
================================
हे देखील वाचा: अभिनेता अशोक कुमार यांनी चाळीस दशकात घेतली होती फेरारी कार!
=================================
दुसऱ्या दिवशी ‘क्रांती’ चित्रपटाच्या सेटवर गेल्यानंतर तिने मनोज कुमार यांना सांगितले की “ आज माझे शूटिंग लवकर संपवा. मला दुसऱ्या एका सिनेमाच्या शूटिंगला जायचे आहे.” मनोज कुमार यांना ती ‘रजिया सुलतान’ मध्ये काम करते आहे हे माहीत होते आणि ती आपल्या ‘क्रांती’ पेक्षा ती त्या सिनेमाला जास्त महत्त्व देते आहे याची देखील त्यांना जाणीव होती. जेव्हा हेमाने मला ‘आज लवकर शूटिंग मधून मोकळं करा मला दुसरा एक सिनेमाच्या शूटला जायचे जायचे आहे’ असे सांगितले तेव्हा तो ‘रजिया सुलतान’ हाच सिनेमा आहे याची त्यांना खात्री पडली.
मनोज कुमार आतल्या आत खूप नाराज झाले. त्यांना हेमाचा राग आला होता. त्यांनी हेमा मालिनीला त्या दिवसभर सेटवर बसवून ठेवले. तिचा एकही शॉट घेतला नाही. हेमा मालिनी संध्याकाळी रागारागात घरी निघून गेली. हेमा मालिनी तिकडे कामालीस्तानला शूटिंगला न गेल्यामुळे अमरोही यांनी मनोज कुमार यांना फोन करून विचारले ,”हेमा का आली नाही?” त्यावेळी मनोज कुमारने सांगितले की,” तुमच्या सिनेमाला च्या शूटिंगला जाताना तिने माझी परवानगी घ्यायला हवी होती तिने ती घेतली नाही. म्हणून मी पाठवले नाही!”

दुसऱ्या दिवशी हेमा पुन्हा ‘क्रांती’ च्या सेटवर आली आणि शूटिंग पूर्ववत सुरू झाले . या आदल्या दिवशीच्या घटनेचा एका जुगाड हेमाने स्वत:च केला होता. तो सर्व प्लॅन हेमामालिनीने स्वतःच केला होता. कारण ‘क्रांती’ च्या सेटवर त्या दिवशी तिला पांढरी साडी घालून विधवेची भूमिका करायची होती आणि कुठलीही स्त्री आपलं लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी विधवेचा रोल करणार नाही. त्यामुळे तिने आयडिया केली. तिने कमाल अमरोही यांना फोन करून सांगितलं की “ माझं इथलं ‘क्रांती’ चे शूटिंग लवकर आटपून मी तुमच्याकडे येते तुम्ही शूटिंग साठी तयार राहा.” तिला माहीत होतं की मनोज कुमार आपल्याला नक्की सोडणार नाही आणि आपली शूटिंग देखील करून घेणार. तिचे दोन्ही पर्पज सॉल्व्ह झाले आणि लग्नाच्या दुसरी दिवशी विधवा कपडे घालण्याचा शॉट पासून ती वाचली. अलीकडे हेमामालिनी एका रियालिटी शोमध्ये आल्यानंतर हा किस्सा पुन्हा एकदा डिटेल सांगितला होता.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
‘क्रांती’ हा चित्रपट सहा फेब्रुवारी १९८१ या दिवशी प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट ठरला. बॉक्स ऑफिसवर त्या वर्षीचा क्रांती हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आणि हेमामालिनी ज्या चित्रपटाला अधिक महत्त्व देत होते तो कमाल अमरोही यांचा ‘रजिया सुलतान’ हा चित्रपट त्या नंतर दोन वर्षानी १६ सप्टेंबर १९८३ रोजी प्रदर्शित झाला. तब्बल आठ कोटी रुपये खर्चून बनलेला ‘रजिया सुलतान’ बॉक्स ऑफिसवर डिझास्टर झाला सुपर फ्लॉप झाला. पण ‘रजिया सुलतान’ या चित्रपटाचे संगीत जे खय्याम यांनी दिलं होतं ते आज देखील कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जाते. विशेषतः लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘ऐ दिले नादान ऐ दिले नादान आरजू क्या है जुस्तजू क्या है ‘हे गाणं कालजयी ठरलं!