DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

“मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी…” Dharmendra यांना डिस्चार्ज दिल्यानंतर हेमा मालिनींनी दिली अपडेट
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र ( Dharmendra Singh Deol) यांच्या निधनाच्या अफवांना उडवून लावत अखेर धरमपाजी घरी सुखरुप आले असून त्यांच्यावर आता घरात उपचार सुरु आहेत… मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते… यावेळी त्यांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते… मात्र, या सगळ्यावर मात करत अखेर पंजाब दा पुत्तर घरी परत आले असून त्यांच्या तब्येतीबद्दल पत्नी हेमा मालिनी यांनी अपडेट दिली आहे…

हेमा मालिनी (Hema Malini) यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र सध्या जुहू येथील घरी असून तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते बरे होत आहेत. धर्मेंद्र यांच्या तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर वेळोवेळी त्यांच्या घरी येत आहेत. तसेच, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सुभाष के झा यांच्याशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, “माझ्यासाठी हा काळ अजिबात सोपा नाही. धरमजींची प्रकृती आमच्यासाठी खूप काळजीचा विषय आहे. मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी खचू शकत नाही, खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. पण हो, ते घरी परतल्याचा मला आनंद आहे. ते रुग्णालयातून बाहेर आल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. आता ते त्यांच्या जवळच्या लोकांबरोबर आहेत. बाकी सर्व काही देवाच्या हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.” (Bollywood News)

तर, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रीत समदानी यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “धर्मेंद्रजींना सकाळी ७:३० च्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कुटुंबाने त्यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर घरीच उपचार केले जातील.” (Dharmendra Health Update)
================================
हे देखील वाचा : एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man Dharmendra
================================
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या भेटीसाठी त्यांचे नातेवाईक आणि कलाकार घरी जात आहेत… वीरु तब्येतीची विचारपुस करण्यासाठी परममित्र जय अर्थात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) घरी पोहोचले होते… धर्मेंद्र यांचे चाहते त्यांची तब्येत लवकरच बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi