Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

मराठी टीव्ही मालिकेतील अभिनेता होणार बाबा; खास फोटो शेअर करत

Maharashtrachi Hasyajatra तून विशाखा सुभेदारने एक्झिट का घेतली? अभिनेत्रीने सांगितलं

Shubhvivah मालिकेतील अभिनेत्रीने लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दिली गुड न्यूज !

Marathi Movie Remakes : मराठी भाषेतील चित्रपटांची बॉलिवूड आणि साऊथला

‘या’ सिनेमात पहिल्यांदा मोहम्मद रफी यांनी Rishi Kapoor यांच्यासाठी पार्श्वगायन

Thappa : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

“माझं मराठी बेळगावकडचं…”, रजनीकांत सरांचा साधेपणा पाहून भारावले Upendra Limaye

Marathi Movies 2025 : ३ मराठी चित्रपट येणार आमने-सामने!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सोनू, पप्पू आणि तायडी या वेड्या भावंडांची विलक्षण कथा ‘फसक्लास दाभाडे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 सोनू, पप्पू आणि तायडी या वेड्या भावंडांची विलक्षण कथा ‘फसक्लास दाभाडे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Hemant Dhome's Fussclass Dabhade Movie
मिक्स मसाला

सोनू, पप्पू आणि तायडी या वेड्या भावंडांची विलक्षण कथा ‘फसक्लास दाभाडे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

by Team KalakrutiMedia 05/09/2024

टी सिरीजच्या रोमांचक हातमिळवणीनंतर, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि चलचित्र मंडळी पुन्हा एकदा त्यांचा पुढील प्रमुख मराठी चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘फसक्लास दाभाडे’ असे या चित्रपटाचे नाव आहे. बॉक्स ऑफिसवर ‘झिम्मा २’ च्या यशानंतर, हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. शीर्षकाची आणि प्रदर्शनाच्या तारखेची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली, ज्याने हा सिनेमॅटिक तमाशा अनुभवण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांमध्ये व्यापक उत्साह निर्माण झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित, फसक्लास दाभाडे १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे (Hemant Dhome’s Fussclass Dabhade Movie)

Hemant Dhome's Fussclass Dabhade Movie
Hemant Dhome’s Fussclass Dabhade Movie

 टी सिरीज फिल्म्स आणि आनंद एल राय प्रस्तुत, भूषण कुमार, आनंद एल राय, क्षिती जोग आणि क्रिशन कुमार निर्मित, ‘फसक्लास दाभाडे’ ही वेड्या भावंडांची एक विलक्षण कथा असून सोशल मीडियावर निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक उघड केला आहे. हेमंत ढोमे लिखित या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर ट्रॅक्टरवर बसलेले दिसत असून अमेय वाघने मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. कलर यल्लो आणि चलचित्र मंडळीची निर्मिती भावंडांच्या बंधांचा एक विनोदी पद्धतीने आणि मनापासून शोध घेत असल्याचे दिसतेय. कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “झिम्माच्या टीमकडून, वेड्या भावंडांची एक विलक्षण कथा…सोनू, पप्पू, तायडी आणि त्यांचे तितकेच वेडे पण हृदयस्पर्शी कुटुंब. १५ नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!”

Hemant Dhome's Fussclass Dabhade Movie
Hemant Dhome’s Fussclass Dabhade Movie

या चित्रपटाबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात की, ” हा माझ्या अत्यंत जवळचा विषय आहे. मी जे जगलो, जे पाहिले ते सगळे मी यात मांडायचा प्रयत्न केला आहे. कोणीतरी असे म्हणाले आहे, सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो, तेव्हा तो प्रेक्षकांच्याही खूप जवळचा होतो. चित्रपट बनवताना ठरवले होते, हा चित्रपट आपल्या गावीच स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत चित्रीत करायचा आणि विशेष म्हणजे माझ्या लाडक्या टीमसोबत माझी ही इच्छा पूर्ण देखिल झाली. आता हा चित्रपट पूर्ण झाला असून १५ नोव्हेंबर रोजी तो तुमच्या भेटीला येणार आहे.” 

==============================

हे देखील वाचा: प्रियदर्शिनी इंदलकरवर चित्रित करण्यात आलेले ‘स्पंद अंतरीचे’ हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

==============================

‘फसक्लास दाभाडे’ हा टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्यातील एक सहयोगी उपक्रम आहे ज्यामुळे आनंद एल राय, क्षिती जोग आणि हेमंत ढोमे यांचे रियुनियन होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Hemant Dhome MOvie Hemant Dhome's Fussclass Dabhade Movie kshiti jog Marathi Movie marathi movie 2024 siddharth chandekar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.