Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

Hera Pheri आहे ‘या’ चित्रपटाची हुबेहुब कॉपी; दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिली कबूली!
बॉलिवूडमधील अनेक विनोदी चित्रपटांमध्ये आजही प्रेक्षकांच्या आवडीचा चित्रपट आहे हेरा फेरी… अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘हेरा फेरी’ चित्रपटाची क्रेझ आहे २५ वर्ष उलटून गेली तरी कायमच आहे… प्रत्येक पात्र, चित्रपटातील डायलॉग्स आजही प्रेक्षकांना लक्षात आहेत… पण जर का तुम्हाला सांगितलं की हेरा फेरी हा एका साऊथ चित्रपटाचा कॉपी आहे तर? हो… याबद्दल दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) यांनी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात…

बॉलिवूडमधील कल्ट कॉमेडी चित्रपट ‘हेरा फेरी’ची कथा ऑरिजनल नव्हती याचा खुलासा एका मुलाखतीत दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केला आहे… हेरा फेरी हा आयकॉनिक कॉमेडी चित्रपट एका साउथ चित्रपटावर आधारीत होता. याबद्दल प्रियदर्शन यांनी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ‘अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हेरा फेरी’ हा चित्रपट ‘रामजी राव स्पीकिंग’ (Ramji Rao Speaking) या मल्याळम चित्रपटाची हुबेहूब नक्कल होती. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम, त्याची सिनेमॅटोग्राफी आणि संपूर्ण कथा जशीच्या तशी घेण्यात आली होती. मी पटकथेत कोणताही बदल केला नाही. माझं मुख्य काम फक्त मल्याळम चित्रपटाचे संवाद हिंदीमध्ये भाषांतरित करणं हे होतं.” ‘हेरा फेरी’चे संवाद नीरज वोरा यांनी लिहिले होते आणि त्यांनीच पुढे ‘हेरा फेरी’चा सिक्वल अर्थात ‘फिर हेरा फेरी’चं दिग्दर्शन केलं होतं.

तर, हेरा फेरी हा चित्रपट ‘रामजी राव स्पीकिंग’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे… हा चित्रपट मल्याळम भाषेत फार गाजला होता त्यामुळे प्रियदर्शन यांनी कोणताही धोका न पत्करता, तीच कथा हिंदी प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला होता… ‘हेरा फेरी’ जरी ओरिजनल नसला तरी, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या दमदार अभिनयामुळे आणि नीरज व्होरा यांनी लिहिलेल्या विनोदी संवादांमुळे या चित्रपटाला बॉलिवूडमध्ये ‘कल्ट क्लासिक’ चा दर्जा मिळाला आहे..
================================
हे देखील वाचा : Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’, बाबूराव पात्र आणि…!
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi