
Bigg Boss 19 मध्ये सर्वांची मनं जिंकणाऱ्या Pranit More ने १४ आठवडे घरात राहून किती पैसे कमावले?
हिंदी रिअॅलिटी शो Bigg Boss 19 च्या विजेतेपदाची माळ गौरव खन्ना (Gaurav khanna) च्या गळ्यात पडली आहे. शोच्या निकालानंतर, फरहाना भट्ट (Farhana bhatt) दुसऱ्या क्रमांकावर आणि प्रणित मोरे (Pranit More ) तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तान्या मित्तल (Tanya Mittal) चौथ्या आणि अमाल मलिक (Amal Malik) पाचव्या स्थानी राहिले. गौरव खन्ना याला ५० लाख रुपयांचे बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली ज्यामुळे त्याच्या विजयाने प्रेक्षकांना आणि फॅन्सला प्रचंड आनंद झाला. प्रणित मोरेने शोच्या निकालानंतर संवाद साधताना सांगितलं की, “या शोमुळे मला स्टँडअप कॉमेडीसाठी बराच मसाला मिळालाय.” त्याने हेही सांगितले की, शोमध्ये स्पर्धकांची निवड खूप विचारपूर्वक केली गेली आहे. “गौरव खन्ना जसा म्हणायचा की, ‘या शोसाठी शोधून शोधून स्पर्धक निवडले आहेत, अशी माणसं बाहेर सापडणार नाहीत.(Pranit More)

शोमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रणित आजारी पडला होता, त्यामुळे त्याला काही काळ घराबाहेर जावे लागले. पण त्याच्या पुनरागमनानंतर त्याला दिला गेलेला पाठिंबा त्याच्यासाठी प्रेरणादायक ठरला. “सुरुवातीला मला वाटत होतं की मी इथे फिट होणार नाही, पण चाहत्यांच्या आणि घरतल्यांच्या पाठिंब्यामुळे मला पुढे जायचं ठरवलं,” असे प्रणितने सांगितलं.

शोमध्ये खूप स्पर्धकांना अभिनयाची संधी मिळाल्याने प्रणितला देखील याबद्दल विचारलं गेलं. “माझ्या मनात अभिनय करण्याचा विचार आहे. पण त्यासाठी मला खूप पैसे दिले आणि अभिनय शिकवली तरच मी अभिनयात येईन,” असं प्रणितने स्पष्ट केलं. पुढे प्रणितने महाराष्ट्र आणि भारताची टूर करण्याची योजना जाहीर केली. त्याला युके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या टूरची तयारी आहे.(Pranit More)
==============================
==============================
अशा रिअलिटी एका शोमध्ये सहभाग घेणारे स्पर्धक आणि प्रणीत ने किती मानधन मिळवतात असा ही अनेकाना प्रश्न पडला आहे. तर समोर आलेल्या माहितीनुसार प्रणित मोरेला दर आठवड्याला १ ते २ लाख रुपये मानधन मिळत होते. तो 14 आठवडे शोमध्ये होता, त्याप्रमाणे त्याने अंदाजे 14 ते 28 लाख रुपयांपर्यंत कमाई केली असावी. डेक्कन क्रोनिकलच्या बातमीनुसार, या कमाईचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. Bigg Boss 19 च्या संपूर्ण सीझनमध्ये जितके मसालेदार आणि रोचक प्रसंग पाहायला मिळाले, त्याचप्रमाणे शोच्या प्रत्येक स्पर्धकाने स्वतःचे महत्त्व दर्शवले. प्रणित मोरेचा ट्रॉफी जिंकता आली नाही तरी त्याने आपल्या कामाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकली.