जेव्हा शायर Kaifi Azmi यांनी आपल्या बेगमला रक्ताने पत्र लिहिले

बाबूजींच्या आवाजातील ‘Geet Ramayan’ ऐकून स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही अश्रु अनावर झाले होते….
ऑस्कर विजेते तेलुगु संगीतकार एम.एम. किरवानी यांनी नुकतंच एका कार्यक्रमात भारतीय संगीतसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार, गायक सुधीर फडके (Sudhir Phadke) अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी यांचं एक गाणं त्यांनी गायलं… अमराठी संगीतकाराकडून बाबूजींना त्यांच्याच गाण्यातून वाहिलेली ही आदरांजली खरं तर फार अभिमानास्पद नक्की आहे… बाबूजींनी आजवर अनेक अजरामर गाणी श्रोत्यांना दिली… मात्र, ‘गीतरामायण’ (Geet Ramayan) ऐकावं ते फक्त बाबूजींच्या आवाजात… त्यांच्या आवाजातील गीतरामायणाची ताकद इतकी होती की चक्क स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रु वाहात होते… इतकंच नाही तर ‘वीर सावरकर’ हा चित्रपट साकारण्यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागले होते हा किस्साहीजाणून घेऊयात…(Maratji Entertainment News)

‘नको आसु ढाळू आता पुस लोचणास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास… अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनींचा दोष ना कुणाचा…’ गीतरामायणातील हे बाबूजींच्या आवाजातील हे गाणं ऐकल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते.. खरंच हा प्रसंग वाचतानाही तुमच्याही डोळ्यांसमोर या दिग्गज व्यक्ती उभ्या राहिल्या असतीलच…आपल्या सुरांतुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ गायक, गीतकार सुधीर फडके.. अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी… जितती त्यांची संगीतावर निस्सिम भक्ती होती तितकीच भक्तीय त्यांवा सावरकरांबद्दल होती.. बाबूजींनी साकारलेल्या वीर सावरकर या चित्रपटासाठी १९८५ ते २००१ हा १६ वर्षांचा अथक परिश्रमाचा काळ काढला होता… आणि अखेर लोकांच्या पैशांतून आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी कोटींच्या घरात देऊ केलेल्या देणगीतून हा चित्रपट कसा तयार झाला होता जाणून घेऊयात…

सुधीर फडके अर्थात बाबूजींनीच एका मुलाखीत वीर सावरकर चित्रपट कसा संपुर्ण झाला याबबद्दल सांगितलं होतं… तर मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होत नसेल तर इतर जे आत्मचरित्रात्मक चित्रपट होतात त्यात सावरकरांना स्थान नाही आहे का? असा प्रश्न बाबूजींच्या मनात येत असे…सावरकर जेव्हा जीवंत होते तोपर्यंत त्यांच्या जीवनावर चित्रपट काढणं योग्य नव्हतं.. पण ते गेल्यानंतर त्यांच्या मनात प्रभावीपणे हा विचार येऊ लागला.. सावरकरांचा आणि बाबूजींचा वैयक्तिक संबंध अनेकवेळा आला.. ज्यावेळी बाबूजींनी सावरकर चित्रपट करायचे ठरवले त्यावेळी त्यांनी एक गोष्ट मनाशी पक्की केली होती ती म्हणजे हा चित्रपट कुणाचा वैयक्तिक चित्रपट असणार नाही… आणि या चित्रपटासाठी त्यांच्या विचारसरणीशी विचार जुळणाऱ्या लोकांच्या शोधात ते होते.. मग त्यांना बाबासाहेब पुरंदरे आणि बिंदु मनोहर जोशी यांची साथ लाभली आणि या तिघांनी मिळून अजरामर असा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट सावरकर प्रेमींच्या स्वाधीन केला…

हा चित्रपट करणं फार सोप्पं नव्हतं.. अनेक वर्ष हा चित्रपट बनवण्यासाठी बाबूजींनी व्यतित केली…या काळात बाबूजींवर बऱ्याच जणांनी फार वैयक्तिक टीका देखील केल्या.. पण या सगळ्या गोष्टींना दुर्लक्षित करुन त्यांनी आपलं काम सुरुच ठेवलं…सावरकर चित्रपटासाठी बाबूजी आणि त्यांच्या पत्नी ललिताबाई यांनी जमेल ती मदत केली… एखादा चरित्रपट करताना लेखन, संशोधन यावर किती मेहनत करावी लागते हे बाबूजींनी ज्यावेळी सावरकर चित्रपट साकारला त्यातून शिकता येतं.. त्यांनी लेखक विश्राम बेडेकर यांना सावरकरांवर लिखाण कराल का असं विचारलं.. त्यावर बेडेकर यांनी मला सावरकरांनी लिहिलेली आणि सावरकरांवर लिहिलेली अशी जितकी पुस्तकं मिळतील तितकी आणा असं बाबूजींना सांगितलं.. आणि चक्क बाबूजींनी बेडेकरांना ७० पुस्तकं देऊ केली… १९८५ साली charity commisionar कडे या चित्रपटाबद्दल रजिस्ट्रेशन केलं… त्यानंतर बेडेकरांनी अडीच वर्षांनी बाबूजींना फोन केला आणि आता मी पु्र्णपणे सावरकर वाचले आहेत आता मी लिखाण करु शकतो तुम्ही या आणि आपण पुढचं बोलवून घेऊ.. मग काय गेली अडीच तीन वर्ष बाबूजी ज्याची वाट पाहात होते ते स्वप्न पुर्ण होणार होतं..

अडीच वर्षांत बेडेकरांनी चित्रपटाचा अर्धाच भाग लिहिला होता.. पण तो न आवडल्यामुळे ४ वेळा फक्त तो अर्धा भाग त्यांनी लिहिला होता..आणि त्यांच्या मनाला जेव्हा पटलं तेव्हा आम्ही शेवटी लिहिलेला भाग नक्की केला… पण आजारामुळे त्यांना चित्रपटाचा पुढचा भाग लिहिता आला नाही.. पण त्यानंतर आलेल्या ५-७ लेखकांनी पैसे देऊनही ६ -७ वर्ष बाबूजींच्या हातात काहीच लिखाण दिले नाही.. म्हणजे १९८५ ते जवळपास १९९२ पर्यंत ते या सावरकर चित्रपटासाठी खस्ताच खात होते… सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘वीर सावरकर’ हा चित्रपट जनतेने दिलेल्या पैशांतून तयार झालेला चरित्रपट होता… या चित्रपटासाठी ५ रुपयांपासून ते लाखांपर्यंत लोकांनी, संस्थानी मदत केली आणि हा चित्रपट तयार झाला..तर काही विधवा स्त्रीयांनी व्रत घेतलं होतं की या चित्रपटासाठी लोकांकडून पैसे गोळा करायचे असं करुन त्यांनी १० रुपयांपासून ते लाख दीड लाखांपर्यंत पैसे गोळा केले होते…याशिवाय मनोहर जोशी यांनी ५० लाख रुपये देणगी स्वरुपात दिले होते.. तर देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दीड कोटी रुपये वीर सावरकर चित्रपटासाठी दिले होते….आणि शेवटी वेध राही यांच्यासारखा दिग्दर्शक या चित्रपटासाठी लाभला आणि चित्रपट पुर्ण झाला… आणि १६ नोव्हेंबर २००१ साली अखेर वीर सावरकर चित्रपट प्रदर्शित झाला…

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची’ संगीतातली आठवण देखील एकदा बाबूजींनी सांगितली होती… सावरकरांची काळ्या पाण्याची शिक्षा संपली आणि ते परतणार होते तो दिवस सगळीडे साजरा केला गेला.. मुंबई महानगरपालिकेकडून विशेष कार्यक्रम आयोजित केला होता…. यावेळी बाबूजींना त्यांची ‘ने मजसी ने परत मातृभूमिला’ ही कविता सादर करण्यासाठी बोलावले होते..
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological चित्रपट!
=================================
त्यानंतर पुण्यातही बाबूजींना कविता सादर करण्यासाठी बोलावले.. त्यावेळी सावरकरांनी स्टेजवरुनबाबूजींच्या खांद्यावर हात ठेवून पायऱ्या उतरत असताना बाबूजींच्या कानात म्हटले की, “तु एकच कविता का म्हणतो मला ‘गीतरामायण’ ऐकायचं आहे..” मग संधी चालून आली आणि पुण्यात गीतरामायमाचा कार्यक्रम झाला त्यावेळी बाबूजींनी सावरकरांना अट घातली की तुम्ही माझ्यासमोर बसायचं मी तुमच्याकडे पाठ करुन गाणार नाही..आणि बाबूजींनी दोष ना कुणाचा हे गाणं गायलं त्यातील ‘नको आसु ढाळू आता पुस लोचणास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास…’ या ओळी गात असताना बाबूजींनी सावरकरांकडे पाहिले आणि सावरकरांच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहू लागले… बाबूजी चरित्रपटांबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगून गेले.. ते म्हणजे चरित्रपट काढत असताना त्या व्यक्तीबद्दल खडानखडा माहिती ही लेखक, दिग्दर्शक आणि भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना हवीच.. त्यामुळे आता जे चरित्रपट येत आहेत किंवा भविष्यात येतील त्यांनी बाबूजींची ही बाब लक्षात ठेवायला हवी….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi