
South films : दाक्षिणात्य चित्रपट VFX आणि संस्कृतीचा ताळमेळ कसा बसवतात?
चित्रपटसृष्टीचा पाया एका मराठमोळ्या माणसाने रोवला. दादासाहेब फाळके यांनी मनोरंजनासाठी रोवलेलं चित्रपटांचं बीज आज २१व्या शतकात भलं मोठं वृक्ष झालं आहे. काळानुसार बदलणारी टॅक्लनोलॉजी आज सर्वच भाषेतील चित्रपटांचा दर्जा उंचावत आहे. खरं तर भारतीय चित्रपटसृष्टी म्हटलं की हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, दाक्षाणित्य अशा अनेक भाषेतील चित्रपट यात सामावले जातात. पण प्रामुख्याने हिंदी चित्रपटांचाच अधिक उल्लेख केला जातो यात दुमत नाही. पण एकेकाळी बी ग्रेडच्या फिल्म्स दाक्षाणित्य चित्रपटसृष्टी तयार करते असा ठपका पडलेल्या या साऊंड इंडस्ट्रीने आपला चेहरा मोहरा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने इतका बदलला आहे की सांगता सोय नाही. कॉमेडी, हॉरर, क्राईस्ट, थ्रिलर, प्रेमकथा, रॉम-कॉम असा एकही चित्रपटांचा प्रकार नाही ज्यात तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपट किंवा कलाकृती नाही आहेत. शिवाय प्रेक्षकांना अधिक आकर्षित करण्यासाठी साऊथ फिल्म्समध्ये वापरलं जाणारं VFX कमालंच असतं. जाणून घेऊयात त्याबद्दल…. (South Films)
भारतीय चित्रपसृष्टीच्या इतिहासात VFX चा वापर १९३० च्या सुरुवातीला करण्यात आला होता. पण सर्वात मोठी किंवा लोकांच्या नजरेत येईल अशी कलाकृती १९८७ साली आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ (Mr. India) चित्रपटाच्यानिमित्ताने तयार केली गेली. शेखर कपूर यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात CGI च्या मदतीने गायब होणारा माणूस दाखवत टॅक्नोलॉजीनुसार हिंदी चित्रपट एक पाऊल पुढे गेलं. त्यानंतर २००० सालच्या सुरुवातीला चित्रपटांमध्ये फास्ट फॉरवर्डही VFXवापरले गेले. पण खरा गेम चेंजर ठरला रजनीकांत (Rajanikanth) यांचा ‘रोबोट’ हा चित्रपट. या चित्रपटात वापरलेले गेलेल VFX दाक्षिणात्य चित्रपटांचा दर्जा अधिक उंचावणारी आणि संस्कृती जपत आधुनिकता कशी मांडली जावी याचं उदाहरण सादर करणारा खरं तर हा चित्रपट ठरला (South films). हळूहळू VFX च्या मदतीने कथेची गरज जाणून घेत भूतकाळ, भविष्यकाळ दाखवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला. (Telugu movies)
===============
हे देखील वाचा : ‘बाहुबली’ खरचं ठरला सर्व रेकॉर्ड्सचा बाहुबली
===============
दाक्षिणात्य चित्रपट जितके हटके स्टोरी टेलिंगसाठी पाहिजे जातात तितकेच फायटिंग सीन्ससाठी देखील प्रेक्षकांना तुफान आवडतात. बऱ्याच चित्रपटांमध्ये VFX, CGI यांच्या मदतीने प्रेक्षकांना खिळवून ठेवतील असे फायटिंग सीन्स डिझाईन करुन सादर केले गेले. VFX अर्थात आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं म्हटलं की खर्च आलाच. त्यामुळे हळूहळू साऊथ फिल्म्सचं (South films) बजेट वाढत गेलं आणि त्यानुसार तंत्रज्ञान जरी असले तरी ते आभासी अधिक न वाटता खरे वाटेल याकडे अधिक भर दिला गेला. त्याचं उदाहरण म्हणजे ‘बाहुबली (Bahubali), ‘आर.आर.आर’ (RRR), ‘कल्की’. सध्या इतर भाषिक चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी यांच्यात तुलना केली असता तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा या चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीसमोर आपलं स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी परफेक्ट चित्रपट कसा असतो यावर अभ्यास करत असताना टॅक्नॉलॉजीत एक पाऊल पुढे टाकलेच पण आपली संस्कृती, आपली मुळं, आपल्या धार्मिक परंपरा यांना कुटेही धक्का लागणार नाही याची विशेष काळजी कायम घेतली. (Tamil movies)

आता याचं ताजं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर २०२४ मध्ये ४० कोटींच्या बजेटमध्ये Hanuman हा चित्रप तयार केला गेला. बजेटनुसार वापरल्या गेलेल्या VFX मध्ये आधुनिक रामायण दाखवताना कुठेही मुळ रामायणावर किंवा कुणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोहोचणार नाही याची काळजी फिल्म मेकर्सने घेतलेली जाणवली. आपल्याकडे एक ओरड कायम ऐकू येते ती म्हणजे हिंदी किंवा मराठी चित्रपट फारसे पाहिजे जात नाही. त्यातही हिंदी चित्रपट नकळतपणे का होईना पण साऊथ चित्रपटांशी (South films) स्वत:चीच तुलना आणि शर्यत करतायत. मात्र, या सगळ्यात हिंदी चित्रपट कुठेतरी एकाच ठिकाणी अडकला आहे आणि आपल्या मातीपासून, संस्कृतीपासून दुर गेला आहे असं वाटतंय. (Entertainment trending movies)

आता जरा आपल्या मराठी चित्रपटांकडे वळूयात. कारण, हॉलिवूड किंवा अन्य कोणत्याही चित्रपसृष्टीच्या (South films)तोडीस तोड जरी नसलं तरी मराठी चित्रपट मेकर्सनी देखील VFX चा वापर बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये केला आहे. यात महेश कोठारे यांचे झपाटलेला, धुमधडाका असे अनेक चित्रपट येतात. याशिवाय, ‘पावनखिंड’, ‘झोंबिवली’, ‘शेर शिवराज’, रावसाहेब’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अशा चित्रपटांचा उल्लेख नक्कीच करायला हवा. (Marathi films)
VFX च्या इतिहासात डोकावूयात…
१८५७ मध्ये ऑस्कर रेजलॅंडरने ३२ नकारात्मक भागांचे वेगवेगळे भाग एकाच प्रतिमेत एकत्र करत जगातली पहिली स्पेशल इफेक्ट प्रतिमा तयार केली होती. आणि त्याचा आधार घेत १८९५ मध्ये अल्फ्रेड क्लार्कने पहिला मोशन चित्रपट तयार केला होता.
– रसिका शिंदे-पॉल