
‘आई तेव्हाच होईल जेव्हा मी…’ अभिनेत्री Hruta Durgule हिने आई होण्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत
मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्याहृता दुर्गुळे (Hruta Durgule) सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. आगामी सिनेमाच्या निमित्ताने हृता एका वेगळ्याच अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिनेमा आहे ‘उत्तर‘, ज्यात हृता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या मुलासह भूमिका साकारताना अभिनय बेर्डेसोबत झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान, हृताने आई होण्यावर आपलं मनोगत व्यक्त केलं आहे, आणि तिचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.( Hruta Durgule On Motherhood)
=================================
हे देखील वाचा: Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna म्हणाला, ”माझ्या बायकोला…”
=================================
12 डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘उत्तर’ सिनेमा, आई-मुलाच्या नात्याची एक संवेदनशील गोष्ट सांगतो. सिनेमात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि हृता दुर्गुळे यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. या सिनेमात आई होण्याच्या आणि मुलाशी असलेल्या नात्याच्या गहिराईत जाऊन त्या भावनिक प्रवासाची गती पकडली आहे. हृता दुर्गुळेच्या अभिनयाची आणि तिच्या भूमिकेची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे, कारण ती एक अत्यंत संवेदनशील आणि वेगळ्या प्रकारची भूमिका साकारतेय. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान हृता दुर्गुळेने आई होण्याच्या अनुभवावर भाष्य केलं आहे, आणि हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चिलं जात आहे.

हृता म्हणाली, “आई होणे हे एक नवा अनुभव आहे, जो शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. आई-मुलाच्या नात्यात जी संवेदनशीलता आहे, तीच ‘उत्तर’ सिनेमात दर्शवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रत्येकाच्या जीवनात आईचं स्थान खूप महत्त्वाचं असतं, आणि ह्या नात्याच्या गोडवा, वेदना आणि त्याच्या गडद बाजू देखील सिनेमात पाहायला मिळतील.”

पुढे बोलताना हृतानं सांगितलं की, ती वयाच्या सतराव्या वर्षापासून काम करतेय आणि तिला तिच्या घरातून त्यासाठी खूप पाठींबा मिळाला आहे. त्याबद्दल हृतानं तिच्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. याबाबत बोलताना हृतानं सांगितलं की, ‘मी 17 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली, पण कधीच असं व्हायचं नाही की दरवाजा उघडल्यानंतर अंधार असायचा. माझी आई नेहमी थांबलेली असायची. माझे बाबा, भाऊ किंवा आता माझा नवरा… ते झोपतात. आता शूटिंगनंतर उशिरा घरी गेल्यानंतर मीच दार उघडून जाते. अशा खूप गोष्टी आहेत, ज्यासाठी मी तिचे आभार मानलेच नाहीत…’(Hruta Durgule On Motherhood)
===============================
================================
हृतादुर्गुळेनं मुलाखतीत बोलताना आई होण्याचाविचार करण्याबाबतही एक वक्तव्य केलं आहे. हृतानं अगदी स्पष्टपणे सांगितलं की, “आईच्या प्रेमाबद्दल कितीही बोललं तरी कमीच… मला आणि माझ्या आईला पिझ्झा खायला खूप आवडतो. जेव्हा आम्ही पिझ्झा घरी ऑर्डर करतो, तेव्हा सर्वांनी खाऊन झाल्यावर तो थोडा तरी उरतोच… मग तो उरलेला पिझ्झा आई नेहमी मला किंवा माझ्या भावाला खायला देते. ज्या दिवशी मला हे करावंसं वाटेल ना, त्या दिवशी मी आई होईन. कारण, स्वत:च्या आवडीची गोष्ट मुलाला द्यावी, हा नि:स्वार्थीपणा फक्त आईमध्येच असतो. हे मी कधीच करू शकत नाही…”