Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ashi Hi Banwa Banwi :चित्रपटातील लीलाबाई काळभोर यांचा बंगला नेमका

एकुलत्या एका मुलाच्या लग्नपत्रिकेवर Ramesh Bhatkar यांचं नाव का नव्हतं?

Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले

Bodybuilder Suhas Khamkar:  ‘राजवीर’ मधून बॉडीबिल्डर सुहास खामकरचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण

Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

Subodh Bhave दिसणार ‘सकाळ तर होऊ द्या’ या नव्या चित्रपटात!

Hum Aapke Hain Koun..! ३१ वर्षांचा झाला….

Telugu Film Industry मधील कामगारांचा संप; टॉलिवूड इंडस्ट्री कशामुळे अडकली

‘श्वास’ फेम Ashwin Chitale ‘या’ कारणामुळे अभिनयापासून लांब

Ramayana : टीव्हीच्या राम-सीताची प्रतिक्रिया, म्हणाले- “चित्रपटाकडून एवढीच अपेक्षा आहे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जिला सिनेमात करीयर करायचे होते तिला मोठी इनिंग खेळता आली नाही, तर…

 जिला सिनेमात करीयर करायचे होते तिला मोठी इनिंग खेळता आली नाही, तर…
बात पुरानी बडी सुहानी

जिला सिनेमात करीयर करायचे होते तिला मोठी इनिंग खेळता आली नाही, तर…

by धनंजय कुलकर्णी 11/09/2023

ही सिनेमाची दुनिया म्हणजे मोठी अजब दुनिया आहे! इथे ज्यांना खरंच करिअर (Career) करायचं असतं त्यांना मोठी इनिंग खेळता येत नाही, तर ज्यांना सिनेमात अजिबात काम करायची इच्छा नसते ते मोठे इनिंग खेळून जातात. असाच काहीसा प्रकार दोन बहिणी बाबत झाला होता. आपल्या हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात बहिणी बहिणी सिनेमात असल्याची खूप जुनी परंपरा आहे. साठच्या दशकामध्ये नूतन आणि तनुजा या दोन बहिणी लोकप्रिय होत्या नंतर करिष्मा कपूर आणि करीना कपूर या नव्वद च्या दशकामध्ये चांगल्याच लोकप्रिय ठरल्या. दरम्यानच्या काळात ऐंशीच्या दशकात दोन बहिणी सिनेमाच्या क्षेत्रात आल्या होत्या. अभिनेत्री फराह आणि अभिनेत्री तब्बू! या दोघी मूळच्या हैदराबादच्या. फराह दिसायला अतिशय सुंदर. तर तब्बू ही तिच्या मानाने स्त्री सौंदर्याच्या व्याख्येत न बसणारी. थोडीशी टॉम बॉईश, सावळी, उंचीने अधिक, तर मोठ नाक असलेली! दोन बहिणीत सुंदरतेत जमीन आस्मानचा फरक.  फराह मात्र ‘पोर पंध्राची कोर चंद्राची’ अशी होती. चवळीच्या शेंगेसारखी नाजूक आणि कोवळी कोवळी.  त्यामुळे साहजिकच घरात तिच्याबद्दल, तिच्या सौंदर्याबद्दल, तिच्या करिअरबद्दल सर्वत्र चर्चा होत असे. ही पोरगी सिनेमात जाऊन नाव काढणार याची सर्वांना जणू खात्री झाली होती. देखणी  फराह त्या काळात तिच्या शाळेमध्ये सर्वात देखणी मुलगी होती. तिचा नखरा, तिचा तोरा, तिची ऐट ‘जबरा’ होती. तिच्या तुलनेत धाकटी बहिण तब्बू  म्हणजे  ‘किस झाड की पत्ती!’. (Career) 

फराहाची आई आणि दिग्दर्शक विजय आनंद यांची पत्नी सुषमा आनंद या दोघी चांगल्या मैत्रिणी होती. फराह आणि तब्बू  अभिनेत्री शबाना आजमीच्या भाच्या  होत्या. त्यामुळे फिल्मी पार्ट्यांना जाणं ही एक कॉमन गोष्ट होती. तब्बू लहान असतानाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी फराह आणि तब्बू मुंबईला एका फिल्मी पार्टीमध्ये गेल्या  असताना तिथे देव आनंदची नजर या दोघींवर पडली. पार्टीत देव आनंद येणार आहे हे ऐकून फराहला खूप आनंद झाला होता आणि ती जास्तच नटून सजून पार्टीला गेली होती. तब्बू त्यावेळेला अवघ्या १४ वर्षाची होती. ती आपल्या मोठ्या बहिणीला सोबत म्हणून तिथे गेली होती. सिनेमात काम करण्याचा तिचा कुठलाही इरादा नव्हता कारण तिला माहीत होते की, आपल्याकडे सिनेमात काम करण्यासाठी लागणारे सौंदर्य नाही. ‘फराहाच्या सुंदरते पुढे तब्बू काहीच नाही.’ हे वाक्य ती लहानपणापासून ऐकत होती. ‘होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक…’ अशीच तिची अवस्था होती. त्यामुळे आपल्याकडे कोणी पाहणार नाही याची तिला खात्री होती.  पण म्हणतात ना, जो ‘खरा’ ‘जोहरी’ असतो त्याची बरोबर नजर ‘हिऱ्या’वर पडते. त्या पार्टीत देवआनंद ची नजर तब्बू वर पडली. त्यावेळी देव आनंद त्याच्या नव्या चित्रपटाची ‘हम नौजवान’ स्टार कास्ट फायनल करत होता. या चित्रपटात त्याच्या मुलीच्या भूमिकेसाठी त्याला एका नव्या चेहऱ्याची गरज होती. तब्बूला त्याने पाहिले आणि त्याने मनोमन ठरवले की तिला आपल्या सिनेमासाठी साइन करायचे! (Career)

ही बातमी ऐकून फराह नाराज झाली. कारण खरंतर तिला शंभर टक्के खात्री होती की, आपणच सिनेमात जाऊ पण देव आनंदला मात्र तब्बूमध्ये हिरोईनचे मटेरियल दिसले. आपली निवड झाली नाही या पेक्षा तब्बूची निवड झाली याचा तिला भयंकर राग आला होता!  नवकेतनच्या टीमने तब्बूची स्क्रीन टेस्ट घेतली आणि तिचे सिलेक्शन देखील झाले! तब्बूने त्यावेळी  देव  आनंदला फराह देखील सिनेमात इंटरेस्टेड आहे असं सांगितले.  देव आनंदने  दिग्दर्शक यश चोप्रांना फराह बाबत सांगितले. यश चोपडा त्यावेळी त्यांच्या  नवीन चित्रपट ‘फासले’ जुळवाजुळवीत व्यस्त होते. या सिनेमात महेंद्र कपूर यांचे चिरंजीव रोहन कपूर नायक म्हणून असणार होते. यश चोप्रानी फराह खानची स्क्रीन टेस्ट घेतली. तिचं आरस्पानी  सौंदर्य त्यांना खूपच आवडलं आणि लगेच त्यांनी तिला या सिनेमाची नायिका बनवून टाकले. अशा पद्धतीने फराहला ‘फासले’ या चित्रपटातून तर तब्बूला ‘हम नौजवान’ या चित्रपटातून एन्ट्री झाली. (Career)

यानंतर फराहला लागोपाठ सिनेमे मिळत गेले परंतु तब्बू मात्र फारशी कोणाच्या लक्षात आली नाही. पण दिग्दर्शक बोनी कपूर यांनी त्यांचा धाकटा भाऊ संजय कपूरसोबत तिला ‘प्रेम’ सिनेमासाठी साईन केले. हा सिनेमा तब्बल आठ वर्ष निर्मिती अवस्थेत होता. त्यापूर्वीच तब्बूने एका तेलगू चित्रपटातून नायिकेच्या भूमिकेतून पदार्पण केले. नंतर बॉलीवूडमध्ये तिचा प्रवेश झाला. फराहकडे खरंतर सौंदर्य होतं पण अभिनयात ती फारशी निपुण नव्हती. त्यामुळे तिची रुपेरी पडद्यावरील इनिंग लवकर संपली. तिने दारासिंगचा मुलगा बिंदू त्याच्यासोबत लग्न केले नंतर ती छोट्या पडद्याकडे वळली आणि जिला म्हणजे तब्बूला सिनेमामध्ये करिअर करण्याचे अजिबात इच्छा नव्हती तिने मात्र जबरदस्त करिअर सिनेमाच्या दुनियेत केले. ‘माचिस’ आणि ‘ चांदनी बार’ साठी तब्बूला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तर ‘विजयपथ’, ’विरासत’, ’हुतूतू’ ,’अस्तित्व’, ’चीनी कम’, ’हैदर’ या सिनेमातील भूमिकांसाठी फिल्म फेअर अवार्ड मिळाले. तिचा दृश्यम-२ हा या वर्षी प्रदर्शित झालेला सिनेमा चांगलाच गाजला. 

=========

हे देखील वाचा : ‘या’ हिरोला किसिंग शॉटच्या वेळी घाम फुटला होता!

=========

काय गंमत असते पहा लहानपणी जिची सौंदर्यावरून कायम हटाळणी व्हायची; ती तब्बू सिनेमाच्या दुनियेत मोठे करिअर (Career) करून गेली पण सौंदर्यवती म्हणून जिची लहानपणी कायम प्रशंसा व्हायची  ती फराह मात्र आपली आटोपशीर इनिंग करून निवृत्तही झाली! नशीब दुसरं काय?

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Actress Farah Actress Tabu career
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.