Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

IIFA Awards 2025 :‘अमर सिंह चमकिला’ ‘पंचायत ३’ने गाजवला सोहळा!

 IIFA Awards 2025 :‘अमर सिंह चमकिला’ ‘पंचायत ३’ने गाजवला सोहळा!
मिक्स मसाला

IIFA Awards 2025 :‘अमर सिंह चमकिला’ ‘पंचायत ३’ने गाजवला सोहळा!

by रसिका शिंदे-पॉल 10/03/2025

जयपूरमध्ये संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री IIFA Awards 2025 साठी एकत्र पोहोचली होती. करीना कपूर-खान, शाहरुख खान, रेखा, माधुरी दिक्षीत, कार्तिक आर्यन अशा अनेक दिग्गज कलाकारांनी आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत ग्लॅमर अधिक वाढवलं. एकीकडे भारताने २०२५ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याचा आनंद सगळे साजरा करत होते; तर दुसरीकडे कलाविश्वातूनही वर्षभर केलेल्या कामाची पोचपावती IIFA पुरस्कारांमधून कलाकारांना मिळत होती. जाणून घेऊयात २०२५ च्या IIFA पुरस्कारावर कोणत्या, चित्रपट, वेब सीरीज आणि कलाकारांनी नावं कोरली आहेत.

IIFA Awards 2025 मध्ये Parineeti Chopra आणि दिलजीत दोसांझ यांच्या ‘अमर सिंह चमकीला’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून ‘पंचायत ३’ (Panchayat season 3) ही सर्वोत्कृष्ट वेब सीरीज ठरली आहे. याशिवाय, पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या क्रिती सेनॉनच्या ‘दो पत्ती’ चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; तर ‘सेक्टर ३६’ मध्ये पहिल्यांदाच सायको किलरची भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देत गौरवण्यात आले आहे. (Best Actor And Actress for IIFA 2025)

IIFA Awards 2025 विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे

चित्रपट विभागातील विजेते :

सर्वोत्कृष्ट चित्रपट – अमर सिंह चमकीला

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सेनॉन ( दो पत्ती )

सर्वोत्कृष्ट अभिनेता – विक्रांत मॅसी ( सेक्टर २६ )

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – इम्तियाज अली ( अमर सिंह चमकीला )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अनुप्रिया गोयंका ( बर्लिन )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – दीपक डोबरियाल ( सेक्टर ३६ )

सर्वोत्त्कृष्ट मूळ कथा – कनिका ढिल्लों ( दो पत्ती )

वेब सीरीज विभागातील विजेते :

सर्वोत्कृष्ट वेब सीरिज – पंचायत सीझन ३

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रेया चौधरी ( बंदिश बँडिट्स सीझन २ )

सर्वोत्कृष्ट अभिनेता – जितेंद्र कुमार ( पंचायत सीझन ३)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – दीपक कुमार मिश्रा ( पंचायत सीझन ३)

===========

हे देखील वाचा : Indian Cinema : शुटींगसाठी लागली २३ वर्ष; वर्ल्ड रेकॉर्ड आणि बरंच काही….

===========

सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – संजीदा शेख ( हीरामंडी: द डायमंड बाजार )

सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेता – फैसल मलिका ( पंचायत सीझन ३)

सर्वोत्कृष्ट मूळ कथा – कोटा फॅक्ट्री सीझन ३

इतर महत्वाचे पुरस्कार

सर्वोत्कृष्ट रिॲलिटी किंवा नॉन-स्क्रिप्टेड शो – फॅब्युलस लाइव्स VS बॉलीवूड वाइव्स

सर्वोत्कृष्ट माहितीपट/डॉक्यु-फिल्म – यो यो हनी सिंह: फेमस

सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – अनुराग सॅकिया, इश्क है ( मिसमॅच्ड )

जयपूरमध्ये आयफा पुरस्कार सोहळा का झाला?

आत्तापर्यंत आयफा पुरस्कार सोहळा साऊथ अफ्रिका, मलेशिया, कॅनडा अशा जगातील विविध देशांमध्ये संपन्न होत होता. पण याचवर्षी तो जयपूरमध्ये का झाला याचं कारण जाणून घेऊयात…यंदाचं आयफा पुरस्कार सोहळ्याचं हे २५वं वर्ष आहे. याच विशेष कारणामुळे भारतीय चित्रपटसृष्टीची संस्कृती जपण्यासाठी आणि आपलं मुळ घट्ट धरुन ठेवण्यासाठी यंदाचा २५ वा आयफा पुरस्कार सोहळा भारतात संपन्न झाला. शिवाय, जयपूर या शहाला कला, संस्कृती, प्रथा यांची थोर परंपरा असल्यामुळे प्रत्येक कलाकाराला पुरस्कार स्वीकारताना नक्कीच आपलेपणा अधिक वाटला असेल. (IIFA 2025 held at Jaipur)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amar singh chamkila IIFA awards 2025 kriti sanon madhuri dixit panchayat 3 shahrukh khan vikrant massey
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.