छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं

अभिनेत्री Salma Agha हिला ‘निकाह’ मधील गाणी गायची संधी कशी मिळाली?
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला ख्यातनाम निर्माते आणि दिग्दर्शक बी आर चोप्रा एक मुस्लिम सोशल सिनेमा बनवत होते. या सिनेमासाठी त्यांनी त्या काळात पाकिस्तानात गाजत असलेल्या सलमा आगा या गायिका अभिनेत्रीला कॉन्टॅक्ट केले. त्या काळात तिची गाणी पाकिस्तानात प्रचंड गाजत होती. ती दिसायला खूप देखणी होती. बी आर चोप्रा यांनी तिला आपल्या ‘निकाह’ या सिनेमांमध्ये नायिका म्हणून घ्यायचे ठरवले. तिची स्क्रीन टेस्ट घेतली आणि तिला सांगितले या चित्रपटातील सर्व गाणी देखील तुलाच गायची आहेत. सलमा आगा प्रचंड खूश झाली.

बी आर फिल्म सारख्या बॅनरमध्ये नायिका – अभिनेत्री म्हणून तिला लाँच केलं जात होतं. हा तिच्यासाठी खूप सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण होता. तिची स्क्रीन टेस्ट तर ओके झाली होती; पण तिच्या गायकीसाठी संगीतकार रवि यांनी तिची रिहर्सल घ्यायचे ठरवले. त्यांनी गीतकार हसन कमाल यांच्याकडून एक गाणे लिहून घेतले आणि त्या गाण्याच्या दोन ट्यून बनवल्या. एक लो पीच मध्ये आणि एक हाय पीच मध्ये. गाण्याचे बोल होते ‘दिल के अरमां आंसुओ मे बह गये…’ बी आर चोप्रा, त्यांचा मुलगा रवी चोप्रा, गीतकार हसन कमाल आणि संगीतकार रवि हे सलमा आगा यांच्या घरी गेले आणि तिला ते गाणे गाऊन दाखवायला सांगितले. सुरुवातीला त्यांनी हाय पीच मधील ट्यून ऐकवली आणि त्यावर गायला सांगितले. तिने ते गाणे गायले पण ते गाणे कुणालाच आवडले नाही.
बी आर चोप्रा यांना तर अजिबात आवडले नाही. सर्वांची चर्चा सुरू झाली. जर अशा पद्धतीने ही गाणे गाणार असेल तर चित्रपटाच्या यशामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ही रिस्क कोणीही घेऊ शकणार नव्हते. त्यामुळे आता चित्रपटातील सर्व गाणी आशा भोसले यांच्याकडून गाऊन घ्यावी. यावर जवळपास सर्वांचं एकमत झालं. तसा निरोप देखील सलमा आगा हिला देण्यात आला. सलमा आगा हा निर्णय ऐकून खूपच नाराज झाली आणि तिथेच रडायला लागेली. पण सर्वांचा नाईलाज होता. कारण प्रश्न सिनेमाच्या यशाचा होता. बी आर चोप्रा म्हणाले की,” या सिनेमाची नायिका तूच असशील फक्त गाणी आपल्याला आशा भोसले यांच्याकडून गाऊन घ्यावी लागतील.” (Entertainment News Update)
================================
हे देखील वाचा : अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!
=================================
खरंतर सलमा आगा हिचा पहिला इंटरेस्ट हा गाण्यातच होता. हिरोईन बनण्यात तिला फारसा रस नव्हता. पण बी आर फिल्म्स ने तिला ऑफर दिल्यामुळे तिने ती स्वीकारली. पण आता जे काम करण्यासाठी ती इथे आली होती तेच इथे नाकारले जात होते. ती रात्रभर रडत राहीली. रात्री बी आर चोप्रा यांनी पुन्हा त्यांनी संगीतकार रवि यांना विचारलं ,” तुम्हाला काय वाटते या गायिकेच्या स्वराबद्दल? त्यावर रवि म्हणाले की,” मला तिचा आवाज अपील झाला नाही. फारसा प्रॉमिसिंग वाटत नाही . आपण आशा भोसले या पर्यायाचा विचार करायला पाहिजे.”
बी आर चोप्रा सांगतात “ त्या रात्री मी थोडासा नाराज होऊन झोपलो . सकाळी मला एकदम पाच वाजता जाग आली. त्यावेळेला माझं एक मन मला सांगत होते चोप्रा, तू कुछ गलत कर रहा है. वो लडकी यहा अपना करिअर बनाने के लिये आई है. और तू उसके करिअर को शुरू होने से पहले उसको खतम करने जा रहा है. कुछ तो गलत हो रहा है. उसे और एक मोका देना चाहिए.” बी आर चोप्रा यांना देखील ते पटलं त्यांनी सकाळी सहा वाजताच संगीतकार रवि यांना फोन केला आणि त्यांना विचारले,” तुम्ही आशा भोसलेंना या गाण्याबद्दल काही फोन वगैरे केला नाही ना?” त्यावर रवी म्हणाले ,” नाही. पण आता सकाळी करणार आहे.” तेव्हा चोप्रा म्हणाले ,” थांबा. आपण आणखी एकदा सलमा आगाला भेटू आणि मग काय तो निर्णय घेऊ.” (Retro Bollywood News)

जाताना गाडीत त्यांनी असं ठरवलं की त्या गाण्याची जी दुसरी एक लो पिच ट्यून आहे त्यावर आपण आता तिला गायला सांगू शकतो.” सलमा आगाच्या घरी गेल्यानंतर त्यांनी बघितले रात्रभर सलमा आगा झोपली नाही. तिचे डोळे रडून रडून खूप सुजले आहेत हे लक्षात आलं. तिने थंडपणे त्यांचं स्वागत केले. त्यानंतर चोप्रा म्हणाले की,” बेटा, हम और एक बार आपसे गाना गवाना चाहते है ये वही गाना है लेकिन उसकी ट्यन थोडी लो पिच मे बनाई है” सलमा आगाने नाराजीने सहमती दिली. दुसऱ्या दिवशी गाण्याची रिहर्सल झाली. आज मात्र चमत्कार झाला. सलमा आगाने गायलेलं गाणं सर्वांना प्रचंड आवडलं. संगीतकार रवी तर खूप खूश झाले.
दुसऱ्या दिवशी हेच गाणं महेंद्र कपूर यांच्या आवाजात देखील रिहर्सल झालं आणि दोन दिवसांनी महेंद्र कपूर आणि सलमा आगा या दोघांचही गाणं रेकॉर्ड झालं. रेकॉर्डिंग झाल्यानंतर चोप्रा यांनी रेकॉर्डिंस्टला विचारले,” गाणे कसे झाले?” त्यांनी सांगितलं,” अति सुंदर. मागच्या अनेक वर्षात मी इतका फ्रेश आणि वेगळा आवाज ऐकला नव्हता.” बी आर यांना वाटलं हे रेकॉर्डिंस्ट कुणाचे पण कौतुकच करतात म्हणून त्यांनी त्यांच्या मॅनेजरला ते गाणं ऐकवलं त्याने देखील कौतुक केलं. आणखी काही मित्रांना गाणे ऐकवलं त्यांना देखील तो आवाज आवडला.
आता मात्र मात्र चोप्रा यांनी निर्णय घेतला की काही झालं तरी सलमा आगा यांच्याकडूनच आपण चित्रपटाची सर्व गाणी गाऊन घ्यायची . ‘दिल की ये आरजू थी कोई दिलरुबा मिले, फजा भी है जवां जवां हवा भी है रवा रवा… ‘ हि सलमाची गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. गंमत म्हणजे सलमा आगाने निकाह या चित्रपटात गायलेल्या तिन्ही गाण्यांना फिल्मफेअर चे नॉमिनेशन मिळाले. त्यापैकी ज्या गाण्यांसाठी सलमा आगाला खूप त्रास झाला त्याच ‘दिल के अरमांआंसूओ हमे बह गये … या गाण्यासाठी फिल्मफेअर बेस्ट प्लेबॅक फिमेल सिंगरचा पुरस्कार मिळाला! (Bollywood)
================================
हे देखील वाचा : ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
अशा पद्धतीने ट्यून बदलल्यामुळे सलमा आगा यांना गाण्याची संधी मिळाली. पुढे सलमा आगा यांनी अनेक चित्रपटातून आपला आवाज दिला. काही चित्रपटातून तर त्यांनी पार्श्वगायन देखील केले तिच्या आवाजाने भारतीय रसिकांना एक वेगळा स्वर मिळाला!